संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून "घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
संदर्भ :
१. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांका बीसीएच-२०.क्र.प्र/२४२५९२-शिक्षण / मंत्रालय विस्तार, मुंबई दिनांक: १०/१०/२०२४
२. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र संकीर्ण २०२४/प्र.क्र.३३४/एसडी-४ दि.२२/११/२०२४
३. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांची ऑनलाईन बैठक दि.१२/१२/२०२४
उपरोक्त संदर्भ क्र.१ व २ नुसार, दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मुल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास ७५ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव "घर घर संविधान" साजरा करणे संदर्भात कळविले आहे.
संदर्भ क्र.३ नुसार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांच्या दि.१२/१२/२०२४ च्या ऑनलाईन बैठकीतील मार्गदर्शक सूचनेनुसार दि.२६.११.२०२४ ते दि.२६.११.२०२५ या कालावधीत संविधान दिन साजरा करण्यासाठी सूचक उपक्रम देण्यात आले आहेत. तदनुषंगाने शालेय स्तरावर खालील उपक्रमांचे आयोजन दि.२६.११.२०२४ ते दि.२६.११.२०२५ या कालावधीत करावे.
संविधान दिन साजरा करण्यासाठी सूचक उपक्रम
प्रस्तावित उपक्रम
वर्षभर उपक्रम
तुमच्या राज्य/केंद्रशासित प्रदेशातील संविधान सभा सदस्यांना ओळखाः संविधान सभा सदस्यांची जयंती साजरी करा आणि त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या, जीवनशैली इत्यादींवर चर्चा/अधिनियम करा.
विद्यार्थ्यांसाठी NCERT DIKSHA प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजन. लिंक: https://ncert.nic.in/constitution day.php
हे उपक्रम वर्षभर राबवावेत.
सकाळ/परिपाठ (नोव्हेंबर, २०२४)
प्रास्ताविक वाचनः लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सकाळी परिपाठाच्या दरम्यान एकत्रितपणे संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करावे. गट चर्चाः शिक्षक आणि विद्यार्थी NCERT द्वारे तयार केलेल्या आणि DIKSHA वर अपलोड केलेल्या सामग्रीसह संविधानात अंतर्भूत केलेल्या तत्त्वांची निर्मिती आणि मार्गदर्शक तत्त्वे यावर चर्चा करावी.
भित्तिचित्र प्रकल्प (डिसेंबर, २०२४)
भित्तिचित्र प्रकल्पः विद्यार्थ्यांनी शाळेच्या भिंतींवर प्रस्तावना रंगवावी. संविधाना भोवती असलेले सेल्फी पॉइंट्स/संविधान कोपरे स्थापित करावे.
चर्चा/वेबिनार/स्पर्धा (जानेवारी, २०२५)
प्रमुख पाहुणे व्याख्यानेः प्रतिष्ठित व्यक्ती, वकील, इतिहासकार किंवा न्यायाधीश संविधानाच्या निर्मितीबद्दल आणि त्याचे महत्त्व याबद्दल कथाकथन करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, गटचर्चा: विद्यार्थी घटनात्मक अधिकारांच्या समकालीन प्रासंगिकतेवर चर्चा करावी.
वेबिनारः लोकशाही प्रक्रिया आणि नागरी जबाबदाऱ्यांबद्दल तज्ञांसह onilne प्रश्नोत्तरे.
साहित्यिक उपक्रम (फेब्रुवारी, २०२५)
ऐका आणि चर्चा कराः संविधान सभेचे वादविवाद ऐका आणि त्यांच्याभोवती चर्चा करा. कथाकथन सत्रेः राज्यघटना तयार करताना घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे वर्णन,
चित्रपट प्रदर्शन/प्रदर्शन (मार्च, २०२५)
चित्रपट/व्हिडिओ स्क्रीनिंगः राज्यघटनेच्या निर्मितीवर चित्रपट दाखवा
https://ncert.nic.in/constitution day.php
संविधान निर्मितीवरील प्रदर्शनी आयोजन करावे.
मॉडेल संविधान सभा/इतर स्पर्धा (एप्रिल, २०२५)
भूमिका निभावणेः संविधान सभेचे अध्यक्ष, मसुदा समितीचे अध्यक्ष इत्यादी भूमिका नियुक्त करा आणि त्यांना एक नाटक म्हणून कार्यान्वित करा. उदा. पहिली घटना सभेची बैठक. कवित्ता वाचनः न्याय, स्वातंत्र्य, बंधुत्त्व इत्यादी विषयांवर. रांगोळी बनवणेः विद्यार्थी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विषयावर रांगोळी तयार करतील.
कला उपक्रम (मे, २०२५)
रेखाचित्र आणि घोषवाक्य लेखनः घटनात्मक आदर्शाचे वर्णन करून सर्जनशीलता प्रदर्शित करा आणि "आम्ही, भारताचे लोक..." सारख्या प्रभावी घोषणा तयार करणे. पोस्टर मेकिंग: विद्यार्थी "सर्वांसाठी समानता" किंवा "आमचे हक्क, आमचे अभिमान."
निबंध लेखन स्पर्धा (जून, २०२५):
खालीलपैकी एका विषयावरः-
"हमारा संविधान, हमारा स्वाभिमान" किवा
"मी संविधान निर्माता असतो तर"
अभिरूप संसद (जुलै, २०२५)
लोकशाही प्रक्रियेचा अनुभव घेत विद्यार्थीचे समकालीन विषयांवर वादविवाद आयोजित करावेत.
समुदाय जागरूकता उपक्रम (ऑगस्ट, २०२५)
प्रभातफेरी/रॅली: संविधानात्मक जागृतीचा प्रचार करणाऱ्या बॅनरसह पहाटे रॅली काढावी. मानवी साखळी: विद्यार्थी एकता आणि समानतेवर भर देणारी प्रतीकात्मक साखळी तयार करावी. पथनाट्ये: घटनात्मक अधिकार आणि कर्तव्ये यांच्याशी संबंधित संदर्भात प्रकाश टाकणारी नाटके, संविधानासाठी धावणे/चालणे, हाफ मॅरेथॉन इ.
१२. सांस्कृतिक उपक्रम (सप्टेंबर, २०२५)
रॅप्स/गाणी: तरुणांना गुंतवून ठेवण्यासाठी आधुनिक वाद्यासह देशभक्तीचे मिश्रण करणारे सादरीकरण.
नृत्य आणि वेशभूषा : भारतातील सांस्कृतिक विविधता आणि एकतेने प्रेरित कामगिरी.
वाद/विवाद/बुकमार्क (ऑक्टोबर, २०२५)
संविधाना विषयी माहिती असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद /उत्कृष्ट स्पर्धा आयोजित करावी.
भारतीय संविधानाने प्रेरित बुकमार्क किंवा कोलाज डिझाइन करावेत.
परिपाठामधील मधील विशेष बाबी (नोव्हेंबर, २०२५)
सकाळच्या परिपाठामध्ये मध्ये संविधानाचे महत्त्व, प्रतिज्ञा घेणे, मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्ये इत्यादींवर चर्चा करावी.
उपयुक्त संसाधने: https://ncert.nic.in/constitution day.php
उपरोक्तप्रमाणे सर्व शाळांनी आयोजित केलेले विविध उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ काढून (Geo Tagging Camera चा वापर करून) MyGov पोर्टलवर अपलोड करावे.
मा. संचालक यांनी मूळ टिपणी मान्य केली आहे.
(डॉ. माधुरी सावरकर)
उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ३०
दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिननिमित्त उपक्रमाचे आयोजन
संविधान उद्देशिका वाचन, संविधानाचे महत्त्व, विविध स्पर्धा, प्रभात फेरी इत्यादी उपक्रमाचे आयोजन करावे.
उपक्रम निहाय सहभागी शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक व समुदाय सहभाग याबाबत उपक्रमनिहाय संख्या केंद्रस्तरावर कळवावी.
सर्व संबंधित फोटोसह लिंक वर प्रत्येक शाळेतील माहिती भरावी.
Constitution Day Celebration Report (26.11.2024 - 26.11.2025) link
https://forms.gle/8nPTF1mZvDnWbdcB7
घर घर संविधान कार्यक्रमांतर्गत उपरोक्त लिंक भरणे व फोटो व्हिडिओ अपलोड करणे बाबत सर्व शाळांना सूचित करावे.
विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांनी दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान अमृत महोत्सव सन 2024 25 पासून घर घर संविधान कार्यक्रम साजरा करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र कार्यालयातून दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित आदेशानुसार संविधान अमृत महोत्सव सन 2024 25 पासून घरघर संविधान कार्यक्रम साजरा करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मुल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / विगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास ७५ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव "घर घर संविधान" साजरा करणे संदर्भात कळविले आहे.
तदनुषंगाने शालेय स्तरावर खालील उपक्रमांचे आयोजन दि. २६ नोव्हेंबर, २०२४ ते दि.२६ जानेवारी, २०२५ या कालावधीत करावे.
अ.क्र. उपक्रम
स्वरूप / कार्यवाही
शाळा/महाविद्यालय / वसतिगृहे यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे.
कायम स्वरूपी लावण्यात यावी.
शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका/उद्देशिकचे वाचन विद्यार्थ्यांकडून करवून घेणे.
कायम चालू ठेवणे आवश्यक आहे.
शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करवून देणे
शालेय ग्रंथालयात इंग्रजी / मराठी किमान ५ प्रती ठेवण्यात याव्यात.
भारतीय संविधान बाबत सर्वसाधारण माहिती देणे, जसे, निर्मिती, निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषता, कर्तव्ये यावर व्याख्यान (किमान ६० ते ९० मिनिटे)
तज्ञ मार्गदर्शक किंवा शाळेतील शिक्षक यांनी माहिती देणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे, हक्क, आणि कर्तव्ये यांवर मार्गदर्शन करणे.
तज्ञ मार्गदर्शक किंवा शाळेतील शिक्षक यांनी माहिती देणे आवश्यक आहे.
कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्त्वज्ञान आणि मूल्ये समजावून सांगणे.
विषय तज्ञांचा एक गट तयार करून त्यांनी कार्यशाळेत घेण्यात येणारे उपक्रम प्रथमतः तपासावेत व प्रमाणित करावेत.
संविधान मुल्ये यावर पथनाट्य तयार करणे.
विषय तज्ञांचा एक गट तयार करून त्यांनी संविधान मूल्ये यावर तयार केलेले पथनाट्य प्रथमतः तपासावे व प्रमाणित करावे.
शाळा/महाविद्यालयात संविधानाच्या विविध मुद्यांवर फलक, पोस्टर, आणि प्रदर्शन आयोजित करणे.
विषय तज्ञांचा एक गट तयार करून त्यांनी संविधानासंबंधित फलक, पोस्टर व प्रदर्शन प्रथमतः तपासावे व प्रमाणित करावे.
संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे, ज्यात पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन याचा समावेश करावा.
विषय तज्ञांचा एक गट तयार करून त्यांनी संविधानासंबंधित फलक, पोस्टर व प्रदर्शन प्रथमतः तपासावे व प्रमाणित करावे.
संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण, वादविवाद, चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करणे.
विषय तज्ञांचा एक गट तयार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद उपक्रम राबवावेत.
प्रजासत्ताक दिनी संविधानातील मुल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण. (जसे देशभक्तिपर गाणी, नाटक, आणि नृत्य)
विषय तज्ञांचा एक गट तयार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण करण्यात यावे.
संदर्भ क्र.३ नुसार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांच्याकडून २६ नोव्हेंबर, संविधान दिनी एक मॉड्यूल DIKSHA प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येणार आहे. दि. २६.११.२०२४ रोजी संविधान दिन साजरा करण्यासाठी आणि त्यानंतरच्या उपक्रमांसाठी हे मॉड्यूल संदर्भ म्हणून वापरण्यात यावे. तसेच PM-eVidya प्लॅटफॉर्मवर संविधान दिनानिमित्त एक व्हिडिओ देखील अपलोड केला जाईल, तो व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावा. त्याचप्रमाणे MyGov पोर्टलवर प्रश्नमंजुषा अपलोड केली जाईल. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी MyGov पोर्टलवर लॉग इन करून सदर प्रश्नमंजुषा सोडवावी. तसेच सर्व शाळांनी आयोजित केलेले विविध उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ काढून (Geo Tagging Camera चा वापर करून) MyGov पोर्टलवर अपलोड करावे.
(राहूल रेखावार, भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे३०.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातून दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित आदेशानुसार संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून "घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करणेबाबत प्राथमिक शिक्षणासंचालकांनी पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.
संदर्भ : १. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांकः बीसीएच-२०.क्र.प्र/२४२५९२-शिक्षण/ मंत्रालय विस्तार, मुंबई दिनांक: १०/१०/२०२४
२. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र संकीर्ण २०२४/प्र.क्र.३३४/एसडी-४ दि.२२/११/२०२४
३. शालेय शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.२१/११/२०२४
दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता, तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबददल सर्व नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" साजरा करण्यासाठी संदर्भ क्र १ अन्वये कळविले आहे. तसेच संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" अंतर्गत घ्यावयाचे स्पर्धा व उपक्रम याबाबत विस्तृत सूचना दिलेल्या आहेत.
संदर्भ क्र ३ अन्वये संविधान अमृत महोत्सवी वर्षात शाळास्तरावर घ्यावयाच्या विविध उपक्रमांबाबत सूचना दिलेल्या आहेत. संदर्भ क्र.१ व ३ नुसार दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधीतांना आपल्या स्तरावरुन निर्देश देण्यात यावेत.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून "घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
प्रस्तावना :-
दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
२. भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मुल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास ७५ वर्ष पुर्ण झाल्याानिमित्त सन २०२४-२५ या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:-
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक/बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे, ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था तसेच महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल सर्व नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" साजरा करण्याचा उद्देश खालीलप्रमाणे आहे:-
१. संविधानाची जागरूकताः-
संविधानाचे महत्व, त्यातील मूल्ये आणि त्याची अंमलबजावणी याबाबत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसेच भावी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे.
२. शिक्षण:-
संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये, आणि विविध तरतुर्दीचे शिक्षण देणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाची भावना रुजवणे.
३. मूल्यसंस्कारः-
भारतीय संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविधतेतून एकता आणि समता या संकल्पनांचा विकास होईल. ४. सक्रिय सहभागः-
विद्यार्थ्यांना संविधानाच्या अध्ययनामुळे आणि चर्चेद्वारे त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकारांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या जबाबदा-यांचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे.
व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट होईल.
५. राष्ट्रीय एकात्मताः-
२. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय व अनुदानित वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा / आश्रमशाळा व वसतिगृहे ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था व महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ "घर घर संविधान" साजरा करण्याच्या अनुषंगाने खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ "घर घर संविधान" अंतर्गत घ्यावयाचे स्पर्धा / उपक्रम :-
प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे.
१. शाळा/महाविद्यालय / वसतिगृहे यांच्या दर्शनी भागात संबंधित सर्व विभाग संविधानाची उद्देशिका लावणे
२. शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका/उद्देशिकचे वाचन विद्यार्थ्यांकडून करवून घेणे.
३. शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करवून देणे
४. भारतीय संविधान बाबत सर्वसाधारण माहिती देणे, जसे, निर्मिती, निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषता, कर्तव्ये यावर व्याख्यान (किमान ६० ते ९० मिनिटे)
५. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे, हक्क, आणि कर्तव्ये यांवर मार्गदर्शन करणे
६. कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्त्वज्ञान आणि मूल्ये समजावून सांगणे.
७. संविधान मुल्ये यावर पथनाट्य तयार करणे
८. शाळा/महाविद्यालयात संविधानाच्या विविध मुद्यांवर फलक, पोस्टर, आणि प्रदर्शन आयोजित करणे
9. संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे, ज्यात पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन याचा समावेश करावा.
१०. संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण, वादविवाद, चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करणे.
११. प्रजासत्ताक दिनी संविधानातील मुल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण. (जसे देशभक्तिपर गाणी, नाटक, आणि नृत्य)
ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्थाच्या वेळोवेळी होणाऱ्या वार्षिक ग्राम सर्वसाधारण सभा, मासिक सभा, ग्रामसभा इत्यादी सभांची विभाग सुरूवात भारतीय संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करावी. महाराष्ट्र विधानपरिषद/ विधानसभा विकास /नगर विकास विभाग
महाराष्ट्र विधानपरिषद / विधानसभा यांच्या सत्रांची सुरूवात संसदीय कार्ये भारतीय संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करावी यासंदर्भात विभाग संसदीय कार्ये विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात. संविधान संमेलन राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये संविधानाचे प्रबोधन होण्याकरिता संबंधित संविधान संमेलनाचे आयोजन करावे. सर्वजिल्हाधिकारी
३. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित / विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा / आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता निर्माण व्हावी. तसेच भारतीय संविधानाच्या मुलभुत तत्वांची माहिती समाजातील उपेक्षित घटकास व्हावी यासाठी सदर कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करुन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन व सल्ला देण्याच्या अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे राज्यस्तरीय घर घर संविधान समिती स्थापन करण्यात येत आहे.
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
अध्यक्ष
प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग
सदस्य
प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग
सदस्य
प्रधान सचिव, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग
सदस्य
प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग
सदस्य
प्रधान सचिव, नगरविकास विभाग
सदस्य
सचिव, आदिवासी विकास विभाग
सदस्य
सचिव, दिव्यांग कल्याण विभाग
सदस्य
सचिव, महिला व बालविकास विभाग
सदस्य
सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग
सदस्य
सचिव, संसदीय कार्ये विभाग
सदस्य
सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
सदस्य सचिव
उपरोक्त गठीत राज्यस्तर घर घर संविधान समितीमार्फत जिल्हास्तरावरील समित्यांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या संविधान कायक्रमांबाबत नियमितपणे आढावा घेण्यात येईल.
४. घर घर संविधान कार्यक्रम जिल्हास्तरावर राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येत आहे:
जिल्हाधिकारी
अध्यक्ष
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सदस्य
सर्व मुख्याधिकारी, नगरपंचायत/नगरपरिषद / नगरपालिका
सदस्य
शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
सदस्य
महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद
सदस्य
सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण,
सदस्य
निवासी उपजिल्हाधिकारी,
सदस्य सचिव
जिल्हास्तरीय समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या घर घर संविधान या कार्यक्रमांची अंमलबजावणी, देखरेख व संनियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यातील इतर आवश्यक अधिकारी यांचा समितीमधील सदस्य प्रतिनिधी म्हणून समावेश संबंधित जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर करावा.
जिल्हास्तरीय समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील:-
संविधान मंचाच्या कार्याची वार्षिक योजना तयार करणे, ज्यामध्ये विविध उपक्रम, कार्यक्रम, चर्चा सत्रे, आणि स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन करणे.
संविधान दिन (२६ नोव्हेंबर) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) यासारख्या महत्वाच्या तारखावर तसेच महिनावार वेळापत्रक आखून विशेष कार्यक्रम आयोजित करणे.
सदर समितीने उपरोक्त मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त आपल्या स्तरावरून नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करून अधिक चांगल्या रीतीने कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी.
संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ "घर घर संविधान" हा कार्यक्रम २६ नोव्हेंबर, २०२४ पासून साजरा करावा.
५.संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" हा कार्यक्रम दि.२६ नोव्हेंबर,२०२४ पासून पुढील प्रत्येक वर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याकरिता संबंधित जिल्हाधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचे वार्षिक वेळापत्रक तयार करून अंमलबजावणी करावी. तसेच संबंधित जिल्ह्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची खात्री व सनियंत्रण संबंधित विभागीय आयुक्त यांनी करावे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुल्यमापन करून त्याबाबतची नोंद संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व विभागीय आयुक्त, यांच्या वार्षिक मुल्यांकन अहवालात घेण्यात यावी.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४१०१०१९०८११९३२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(विजय वाघमारे)
सचिव, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments