महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025 ऑनलाइन आवेदन पत्रे भरण्याबाबतच्या सूचना.
१. फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाचे नव्याने तयार करण्यात आलेले संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर Institute Login या Tab मधून भरावयाची असून त्याचा Login Id व Password हा मार्च २०२४ परीक्षेचे प्रात्यक्षिक /अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी देण्यात आलेला Login Id a Password आहे तोच राहील.
२. फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी प्रात्यक्षिक गुण भरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या Maker- Checker या दोन्ही Login मधून आवेदनपत्रे भरता येतील, पंरतू Pre-List काढणे, Challan तयार करणे इत्यादी कामे फक्त प्राचार्य/मुख्याध्यापक यांचे Checker Login (Sxxxxxxx_1) मधूनच करता येतील.
३. कोणत्याही User चा पासवर्ड विसरला असल्यास Login Page वर Forget Password ची लिंक देण्यात आलेली असून त्याद्वारे Registered Mobile वर प्राप्त झालेल OTP दिल्यास Registered Mobile व E-Mail वर Message द्वारे नवीन Password उपलब्ध होईल.
४. क. महाविद्यालय/शाळा च्या प्राचार्य/मुख्याध्यापक यांचा मुख्य Login (Sxxxxxxx_1) चा Password विसरला असल्यास तसेच Registered Mobile व E-Mail देखील उपलब्ध नसल्यास संबधीत विभागीय मंडळाशी संपर्क करून नवीन Mobile No व E-Mail Registered करण्यात येवून विभागीय मंडळामार्फत विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून नविन Password Mobile व E-Mail वर Message द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
५. क. महाविद्यालय/शाळा यांना Registered Mobile/E-Mail ID मध्ये बदल करावयाचा असल्यास संबधीत विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
६. पुनर्परिक्षार्थी किंवा CIS विद्यार्थ्यां करीता मागील ३ परीक्षांचा Data उपलब्ध करून दिलेला आहे. विद्यार्थ्याना त्या त्या परीक्षेचा बैठक क्रमांक टाकून त्यांची जुनी माहिती उपलब्ध करून घेता येईल. CIS विद्यार्थ्यांसाठी त्यांचा बैठक क्रमांक त्या वर्षाच्या Online Data मध्ये उपलब्ध असणे आवश्यक आहे त्याशिवाय आवेदनपत्र भरता येणार नाही. मागील परीक्षेच्या बैठक क्रमांकावरून प्राप्त झालेल्या माहितीची पडताळणी करून आवश्यक त्या दुरूस्त्या करूनच आवेदनपत्र Submit करावे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४ खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज
• प्रकटन •
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
इ. १०वी व इ. १२वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत. तसेच अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी/शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
१ फेब्रु मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत
नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा
विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरुन अर्जाची प्रत (print out), ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत / कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे.
मंगळवार दि. १३/०८/२०२४ सोमवार दि. ते ३०/०९/२०२४
विद्यार्थ्यांनी विलंब शुल्काने नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरुन अर्जाची प्रत (print out), ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे.
मंगळवार दि. ०१/१०/२०२४ ते
बुधवार दि. ३०/१०/२०२४
२ खाजगी विद्यार्थ्यांना इ. १० वी व इ. १२वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन (online) पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन (offline) अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
३ खाजगी विद्यार्थ्यांनी इ. १०वी/१२वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी ज्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातून मंडळाची परीक्षा दयावयाची आहे, त्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतांक, विषय योजना, माध्यम, शाखा (Stream) व इतर आवश्यक माहिती घेऊनच नोंदणी करावी.
४ नावनोंदणी अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील Student Corner या option चा वापर करावा, अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी /इंग्रजीमधून उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
५ विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता १) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र २) आधारकार्ड ३) स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो स्वतःजवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरतांना सदर मूळ कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. काही कारणास्तव विद्यार्थ्यांकडे दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे.
६ कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो (pdf) काढून ते upload करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल कमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
Va
ReplyDelete🙏
Delete