राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करण्यासाठी सूचना/अभिप्राय नोंदविणे गुगल फ़ॉर्म लिंक.

 राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करणेबाबत समाजातील विविध घटकातून विद्यार्थी सुरक्षाबाबत सूचना / अभिप्राय मागविणे 

संदर्भ : १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: बैठक २०२४/ प्र.क्र.२४६/एस.डी. ४ दिनांक २३.०८.२०२४

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक सुरक्षा २०२४/ प्र.क्र.२८४/एस.डी. ४ दिनांक १९.०९.२०२४

३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: सुरक्षा २०२४/ प्र.क्र.२८४/एस.डी. -४ दिनांक २६.०९.२०२४

४. या कार्यालयाचे समक्रमांक ६४२५ दिनांक ०३.१०.२०२४


राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी शासन निर्णय / परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. मा. उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल सु-मोटो याचिका क्र ०१/२०२४ च्या अनुषंगाने दिनांक ०३.०९.२०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार संदर्भ क्रमांक ३ अन्वये दिनांक १९.०९.२०२४ अन्वये गठीत केलेल्या समितीचा विस्तार व कार्यकक्षेबाबतची निश्चिती केली आहे. त्यानुसार समितीची विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांच्या शिफारशीचा अहवाल दोन महिन्यांच्या आत शासनास सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. संदर्भ क्र ३ मधील निर्देशानुसार समितीची बैठक दिनांक ०१.१०.२०२०४ रोजी आयोजित करण्यात आलेली होती.


दिनांक ०१.१०.२०२४ रोजी समितीच्या बैठकीमध्ये मा. अध्यक्ष यांनी विषयांकीत प्रकरणी दिलेल्या सूचनेनुसार समाजातील विविध घटकातून विद्यार्थी सुरक्षाबाबत सूचना/अभिप्राय मागविण्यासाठी कार्यालयाने नागरीकांसाठी https://forms.gle/JDcKbVaouhc7A5BT7 या लिंकवर सूचना / अभिप्राय देण्यासाठी आवाहन केलेले आहे. या लिंकवर अभिप्राय नोंदविण्याचा कालावधी हा दिनांक ०४.१०.२०२४ ते १२.१०.२०२४ रोजी असा आहे. सदर माहितीस विनामुल्य जाहीर प्रसिध्दी राज्य/विभाग/जिल्हा स्तरावर वर्तमानपत्रात प्रसिध्दी देण्यासाठी मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क कार्यालय, मुंबई यांना संदर्भ क्र ४ अन्वये विनंती केली आहे.

आपणास कळविण्यात येते की, आपणही समाजातील विविध घटकातून विद्यार्थी सुरक्षाबाबत सूचना / अभिप्राय मागविण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील नागरीकांना https://forms.gle/JDcKbVaouhc7A5BT7 या लिंकवर सूचना / अभिप्राय देण्यासाठी नागरीकांना आवाहन करावे.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे


प्रत- मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.