Guidance and Counselling (DCGC-२०२५) या एक वर्षीय प्रमाणपत्र पदविका अभ्यासक्रमाबाबत SCERT च्या सूचना

 Guidance and Counselling (DCGC-२०२५) या एक वर्षीय प्रमाणपत्र पदविका अभ्यासक्रमाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


https://ncert.nic.in/dcgc.php


संदर्भ: RIE भोपाळ यांचे प्राप्त पत्र क्र.F.RIEB/DEE/PAC-२३.३६/२०२४/३१७, दि १८/१०/२०२४

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शाळा य संबंधित शैक्षणिक संस्थेत तज्ञ समुपदेशक तयार करण्यासाठी अनेक वर्षापासून मार्गदर्शन व समुपदेशन हा पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविला जात आहे. सदर अभ्यासक्रम NCERT मार्फत शालेय संस्थेमध्ये तज्ञ समुपदेशक उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व शालेय परीसंस्थेशी संबंधित व्यक्तीसाठी आहे. सदर अभ्यासक्रम हा दूरत्थ व प्रत्यक्ष पद्धतीने राबविला जातो. याप्त तीन टप्प्यांचा समावेश आहे मार्गदर्शित स्वयंअध्ययन (६ महिने दूरस्थ अध्ययन), अभ्यासकेंद्रावर संपर्क कार्यक्रम (३ महिने) आणि अंतरवासिता (३ महिने, अध्ययनार्थीच्या स्वजिल्ह्यात किंवा कार्यक्षेत्रामध्ये), सदर अभ्यासक्रम प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होतो.

यासाठी संदर्भीय पन्नानुसार राज्यातील किमान २० व्यक्तींनी नोंदणी करणे अपेक्षित आहे. संबंधित पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी संबंधित बाब शिक्षण क्षेत्रातील या संबंधात कार्य करू इच्छिणान्या इच्छुक व्यक्तींच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे.

यासाठीची घोषणा NCERT च्या www.ncert.nic.in या साईटवर लवकरच करण्यात येणार आहे असे संदर्भान्यये नमूद करण्यात आले आहे. या साठीची निवड चाचणी व मुलाखत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किया दुत्तऱ्या आठवड्यात होणार आहे. यासाठी संभाव्य अध्ययनार्थीची यादी NCERT ला प्राप्त झाल्यास त्यासंबंधात कार्यवाही करण्यासाठी NCERT ला पुढील कार्यवाही करणे सुकर होऊ शकते.

या प्रमाणपत्र पदविकेसाठी शासकीय, शासनमान्य विभागातील व्यक्तीसाठी नाममात्र रु ६०००/- इतकी फी आहे. यासाठी सदर व्यक्तींनी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. १. अध्ययनार्थी सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर या क्षेत्रात कार्य करण्यास इच्छुक असला पाहिजे.

२. अध्ययनार्थी संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठीच्या आवश्यक बावी पूर्ण करण्यासाठी तसेच अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अभ्यासकेंद्र येथे प्रवास करणे यासारख्या शारीरिक आरोग्य तसेच अनुषंगिक सर्व अटीची पूर्तता करण्यास सक्षम असला पाहिजे. ३. अध्यापनाचे माध्यम हिंदी व इंग्रजी असल्याने अध्ययनार्थीला इंग्रजी भाषेचे आवश्यक ज्ञान असणे आवश्यक आहे.

४. अध्ययनार्थीची १० वर्षे सेवा बाकी असणे आवश्यक आहे.

५. अध्ययनार्थीने हा अभ्यासक्रम यापूर्वी केला असू नये. 

६. केवळ अभ्यासक्रमाचे शुल्क रुपये ६०००/असून इतर अनुषंगिक बाबी उदा. प्रवास खर्च, अभ्यासकेंद्र येथे राहणे व तत्संबंधित सर्व अध्ययनार्थीने करण्याची तयारी असली पाहिजे.

७. सदर अध्ययनार्थीला ३ महिने अभ्यासकेंद्र येथे अध्ययन करणे अपेक्षित असल्याने संबंधित संस्थेची परवानगी आवश्यक आहे.

सदर सुचनेसह जिल्ह्यातील इच्छुक व्यक्तींना सदर अभ्यासक्रमाची नोंदणी करण्यासाठी नमूद नोंदणी लिंकवर सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने ५ नोव्हेंबर पर्यंत भरणे आवश्यक असल्याने त्यासंबंधित माहिती जिल्ह्यातील शिक्षकांपर्यंत पोहोचवणे तसेच सदर अध्ययनार्थीची नोंदणी FRIE. भोपाळ येथे होणार असल्याने अभ्यास केंद्राची निवड योग्यपणे करण्यास आपल्या स्तरावरून सूचित करावे.


संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषद महाराष्ट्र, पुणे


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

ऑनलाइन अर्ज लिंक

https://dcgc.ncert.org.in/login

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.