Diksha Blended Courses Update - दीक्षा ॲप अनिवार्य ब्लेंडेड कोर्सेस पूर्ण करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ! कोर्स वर डायरेक्ट जाण्यासाठी लिंक किंवा QR कोड..येणाऱ्या अडचणी वरील उपाय.

STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्ससाठी मुदतवाढ देणे बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत. 

संदर्भ : प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. जा.क्र.राशैसंप्रपम/संशोधन / ब्लेंडेड मोड प्रशिक्षण/२०२४-२५/०४८४५ दि.०९/१०/२०२४ आणि ०५५०९ दि.१८/११/२०२४

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सादर करण्यात येते की, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी एकूण २० विषयांवर Online / Blended कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सन २०२३-२४ मध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत विभागाच्या वार्षिक कार्ययोजना व 

अंदाजपत्रक मधील मंजूर उपक्रमात सदर उपक्रमाचा समावेश आहे. स्टार्स प्रकल्पातील SIG ३ मधील ३.१ a

तरतुदींची पूर्तता होणेसाठी राज्यातील २० जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सदर 

कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सदरच्या सर्व कोर्सेसची अंतिम पडताळणी करण्यात आलेली आहे.

सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी, इंग्रजी, गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचे ब्लेंडेड कोर्सेस पूर्ण करण्यासाठी दि.११.१०.२०२४ ते दि.३०.११.२०२४ हा कालावधी देण्यात आलेला होता. तथापि आपल्या जिल्ह्याची कोर्स नोंदणी संख्या कमी असल्याने शिक्षकांना सदर कोर्स पूर्ण करण्यासाठी दि.१०.१२.२०२४ पर्यंतची मुदतवाढ देण्यात येत आहे.

आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांच्या ब्लेंडेड कोर्सेसला नाव नोंदणी करून कोर्स पूर्ण करतील याची दक्षता घ्यावी. यानंतर मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.


(अनुराधा ओक)

सहसंचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषद, महाराष्ट्र, पुणे.




प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी कोर्स वर डायरेक्ट जाण्यासाठी लिंक व क्यूआर कोड पीडीएफ डाउनलोड

Download


निवडणूक कामामुळे प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी मुदत वाढ.

ज्या सन्मा. प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले त्यांनी क्रुपया प्रशिक्षण पूर्ण झालं असे ग्रुप वर शेअर करावे.

  ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले नाही किंवा अजून सुरू केले नाहीत त्यांनी  क्रुपया दि.३०/११/२०२४ पर्यंत पूर्ण करावेत. या पुढे कुठल्याही परिस्थितीत वेळ वाढवून मिळणार नाहीत. याची सर्व सन्मा. प्रशिक्षणार्थ्यांनी नोंद घ्यावी.


सर्व शिक्षकांना सूचना

आज झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन मीटिंग नुसार जर शिक्षकांना ब्लेंडेड कोर्स संदर्भात काही अडचणी येत असतील तर त्यांना या आधी दिलेल्या सुचनेनुसार आपल्या ॲपची Cache memory डिलीट करावी. त्यासोबतच  clear storage करावे. App चे clear storage  क्लिअर केल्याने आपण त्या ॲप मधून फक्त लॉग आऊट होता. त्यानंतर पुन्हा App मध्ये आपण आधी login असलेल्या ईमेल आयडी चा वापर करून लॉग इन करावे. (काळजी म्हणून clear storage करण्या आधी आपण कोणत्या ईमेल ने लॉगिन आहोत तो एकदा बघुन घ्या) लॉगिन केल्यावर आपल्या पूर्वीचे सर्व फाईल,कोर्स , व प्रोफाइल माहिती आहे तशीच आपल्याला पाहायला मिळते. Clear storage केल्याने व्हिडिओ anable to play यांसारख्या समस्यां नाही होतील. शिवाय अनेबल टू व्ह्यू यांसारखे प्रॉब्लेम हे मुख्य करून नेटवर्क इशूमुळेच होत आहेत. तरी सर्व शिक्षकांनी ॲपची कॅच मेमरी व स्टोरेज क्लिअर करावे.विज्ञान विषयाच्या कोर्स ना स्टेट लेव्हल वरूनच थोडे प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्यात येतील.

शिवाय जर टेस्ट सोडवताना प्रॉब्लेम असेल तर तुम्ही वेबसाईट वरून लॉगिन करून ती टेस्ट सोडवता येते. असे सांगितले आहे. 🙏🏻🙏🏻


शिक्षकांनी कोर्सेस पूर्ण करण्यासाठी दीक्षा Application वर आपली Profile तयार करावी वर ती पूर्ण Update करावी Profile पूर्ण तयार केल्यावर Concent द्यावे म्हणजेच SCERT ला परवानगी द्यावी. 

आपली प्रोफाइल शिक्षक म्हणून तयार करावी लागेल. 

प्रोफाईल लॉगिन करून प्रोफाइल अपडेट केल्याशिवाय जर कोर्स सुरू केला तर तो परत परत करावा लागेल व प्रमाणपत्र मिळण्यास अडचण निर्माण होईल त्यासाठी तुमची प्रोफाइल एस सी ई आर टी ला शेअर करण्याचे कन्सेंट देणेदेखील आवश्यक आहे. 

दीक्षा ॲप वर डायरेक्ट गेस्ट म्हणून जर कोर्स ओपन करून पूर्ण केला तर तसे करून काहीही फायदा नाही. 

दीक्षा Application Open केल्यावर डाव्या बाजूचे तीन रेशा वर Click केल्यास  पुढील प्रमाणे विंडो Open होते चौकट केलेले प्रमाणे ४ क्रमांक वरील योग्य पर्याय निवडा त्यानंतरच आपल्याला कोर्सेस मध्ये ब्लेंडेड कोर्सेस दिसून येतील त्यामधील आपल्याला लागू असलेला कोर्स निवडून तो पूर्ण करा. 

कोर्स पूर्ण करताना प्राथमिक शिक्षकांनी प्राथमिक साठी असलेले कोर्सच निवडावे.

माध्यमिक शिक्षकांनी माध्यमिक साठी असलेले कोर्स निवडावे.

एका वेळेला एकच कोर्स निवडून तो पूर्ण करावा व त्यानंतर दुसरा कोर्स निवडावा.

एक कोर्स पूर्ण न करता दुसरा कोर्स जर सुरू केला तर अगोदरचा कोर्स बंद होऊ शकतो.


कोर्स पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसांनी त्याचे प्रमाणपत्र मिळते लगेच मिळत नाही.




सन्मानिय शिक्षकांनी इंग्रजी विषयाचा 98%कोर्स पुर्ण केला आहेत परंतु स्वाध्याय सोडवितांना आपल्याला अडचणी येत आहेत.स्वाध्याय सोडविण्याकरीता आपण कोणत्या ब्राऊजर वापरून Diksha website ओपन करा.त्यामध्ये आपला दिक्षा अँपचा login id व पासवर्ड टाकून login करा .तेथे तुम्हाला तुमचा झालेला कोर्स दिसेल.तेथे स्वाध्याय सोडवा.आपला कोर्स पुर्ण होईल.


दीक्षा ॲप वर लॉगिन करण्यासाठी लिंक

https://diksha.gov.in/auth/realms/sunbird/protocol/openid-connect/auth?client_id=portal&state=38b78df1-d28c-413d-8cc7-ddde9422ac14&redirect_uri=https%3A%2F%2Fdiksha.gov.in%2Fresources%3Fauth_callback%3D1&scope=openid&response_type=code&version=4


 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र द्वारे निर्गमित दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित आदेशानुसार STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स उपलब्ध करून देणे बाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.

संदर्भ : १. STARS प्रकल्प अंतर्गत संशोधन विभागाचे वार्षिक अंदाजपत्रक व कार्य योजना २०२४-२५

२) STARS प्रकल्प मान्यता मंडळ इतिवृत्त सन २०२४-२५ दि.३१ जानेवारी २०२४

३. प्रस्तुत कार्यालयाची मंजूर टिपणी दि. ३०/०९/२०२४


उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सादर करण्यात येते की, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी एकूण २० विषयांवर Online / Blended कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सन २०२३-२४ मध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत विभागाच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक मधील मंजूर उपक्रमात सदर उपक्रमाचा समावेश आहे. स्टार्स प्रकल्पातील SIG ३ मधील ३.१ a तरतुदींची पूर्तता होणेसाठी राज्यातील २० जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्यान सदर कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सदरच्या सर्व कोर्सेसची अंतिम पडताळणी करण्यात आलेली आहे.

त्यानुसार सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शाख या विषयांचे ब्लेंडेड कोर्सेस हे दि. ११/१०/२०२४ पासून ते दि.२०/११/२०२४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व शिक्षकांनी आपल्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी (सीपीडी) सदर कोर्स करणे आवश्यक आहे. यासाठी DIKSHA वर नाव नोंदणी करून विहित मुदतीमध्ये कोर्स पूर्ण करावा. तसेच सदरच्या कोर्सेससाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी. ऑनलाईन कोर्स पूर्ण केलेल्या शिक्षकांची त्यांच्या संबधित BRC/URC स्तरावर दि. २१/११/२०२४ ते दि.२९/११/२०२४ या कालावधीत एकदिवशीय PLC चे आयोजन करण्यात यावे. उपलब्ध कोर्स पूर्ण करणेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे.


* शिक्षकांसाठी सूचना :

1. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी सदर ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स साठी नोंदणी करावी.

2. सदर कोर्स मराठी माध्यमात उपलब्ध आहेत तथापि इतर माध्यमातील शिक्षक हा कोर्स करण्यास इच्छुक असल्यास सदर कोर्सला नोंदणी करू शकतात व तो पूर्ण करू शकतात.

3. इयत्ता पहिली ते आठवी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी प्राथमिक स्तर कोर्स साठी नोंदणी करावी.

4. इयत्ता नववी व दहावी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी माध्यमिक स्तर कोर्ससाठी नोंदणी करात्री.

5. सद्यस्थितीत एका शिक्षकाला एका वेळी एकाच कोर्ससाठी नोंदणी करता येईल.

6. सदर कोर्स पूर्ण करताना कोर्समधील सर्व व्हिडीओ पूर्णपणे पाहून विषयाची माहिती मिळवणे महत्वाचे आहे. सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावरच मूल्यमापनासाठी प्रश्न उपलब्ध होतील.

7. सदर ब्लेंडेड कोर्समध्ये पाच तास व्हिडिओ अवलोकन, मूल्यमापन व एक दिवसांची PLC पूर्ण करणे अनिवार्य आहे.

8. NEP २०२० च्या निर्देशानुसार सदरचा एक कोर्स पूर्ण केल्यानंतर एका शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी (सीपीडी) आवश्यक ५० तासांपैकी १० तास ग्राह्य धरण्यात येतील.

9. PLC सह कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना कोर्स पूर्णत्वाचे राज्यस्तरीच प्रमाणपत्र मिळेल व प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तकात घेण्यात येईल.

10. ब्लेंडेड कोर्स पूर्णत्वाचे प्रमाणपत्र राष्ट्रीयस्तर, राज्यस्तर, जिल्हास्तर शिक्षक पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येतील,


* गटसाधन केंद्र/शहर साधन केंद्र (BRC/URC) स्तरावरील समन्वयकांची भूमिका व जबाबदारी:

1. राज्यस्तर/जिल्हास्तर वरून प्राप्त झालेल्या व्लेंडेड कोर्स संदर्भातील पत्रांनुसार कार्यवाही करणे.

2. आपल्या बीआरसी/युआरसी कार्यक्षेत्रातील शिक्षकांनी ऑनलाईन ब्लेंडेड कोर्सला नोंदणी करण्यासंदर्भातील पत्र, व्हिडिओजची लिंक यांचा प्रसार करणे.

3. ब्लेंडेड कोर्ससाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांचे विषयनिहाय व्हाट्सअप गट तयार करून कोर्स बाबत वेळोवेळी मार्गदर्शन, आढावा व सनियंत्रण करणे,

4. वरिष्ठ स्तरावरून कोर्स संदर्भातील आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार PLC चे आयोजन करणे,

5. पीएलसी च्या वेळापत्रकाप्रमाणे संबंधित विषयाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची पीएलसी पूर्ण करणे.

6. सदर ब्लेंडेड कोर्स संदर्भात बॉरेष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित झालेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे.

* ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणी संदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथ. माध्य.) यांची भूमिका :

1 . शिक्षकांनी ब्लेंडेड कोर्स करण्यासंदर्भात जिल्ह्यामध्ये पत्र, व्हिडिओजची लिंक यांचा प्रसार करणे व शिक्षकांना प्रोत्साहन देणे.

2. ब्लेंडेड कोर्स संदर्भात नोंदणी, कोर्स माहिती, PLC माहिती बाबत केंद्र स्तरावर उद्बोधन सत्र आयोजन करणे,

3. ब्लेंडेड कोर्स मध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांना सूचित करणे,

4. ब्लेंडेड कोर्स शिक्षकांच्या सीपीडी साठी तयार करण्यात आलेला असून जे शिक्षक कोर्स पूर्ण करतील त्यांच्या प्रमाणपत्राची नोंद आपल्या अधिनस्त पर्यवेक्षीय यंत्रणेकडून सेवापुस्तकात घेण्याची कार्यवाही करणे.

5. जिल्हास्तरीय पर्यवेक्षण यंत्रणेने तालुकास्तरीय पीएलसीला भेटी देण्याचे नियोजन करणे,


* ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणी मध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची भूमिका :

1. ब्लेंडेड कोर्स संदर्भातील माहिती जिल्हास्तरावरून व्हाट्सअप, पत्र, ई-मेलद्वारे शिक्षकापर्यंत प्रसारित करणे.

2. ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणीसाठी वरिष्ठ अधिव्याख्याता / अधिव्याख्याता यामधून एक अधिकारी समन्वयक म्हणून नेमून त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपविणे.

3. ब्लेंडेड कोर्स संदर्भातील राज्यस्तरावरून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचना, नियोजन BRC/URC पर्यंत पोहोचवणे.

4. ब्लेंडेड कोर्स संदर्भात जिल्हास्तरीय आढावा मार्गदर्शन व सनियंत्रण करणे,

5. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील तालुका संपर्क अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यात पीएलसी चे नियोजन व आयोजन करणे.

6. तालुकास्तरीय पीएलसी भेटीसाठी नियोजन करणे.

उक्त नमूद सर्व बाबीच्या अधीन राहून प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी वेळोवेळी आढावा घेऊन आपल्या जिल्ह्यातील शिक्षकांना कोर्सेस पूर्ण करणेसाठी योग्य समन्वय साधावा.


सोबत - ब्लेंडेंड कोर्सची स्मार्ट Pdf.


संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


प्रत माहितीस्तव सविनय सादरः

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय, मुंबई.

२. मा. राज्य प्रकल्प संचालक, गहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई,

३. मा. आयुक्त (शिक्षण), आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. नाही होत

    ReplyDelete
    Replies
    1. ब्राउझर मधून ओपन करा

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.