२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती २०२४ निमित्त तंबाखू मुक्तीची शपथ घेण्याबाबत आदेश

प्राथमिक शिक्षण अधिकारी


दिनांक :- ०१/१०/२०२४


विषय :- २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त तंबाखू मुक्तीची शपथ घेण्याबाबत.


संदर्भ : मा. संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांचे पत्र के सजास/एन.टी.सी.पी /नं.क्र ७४/४५७६/४६९३/२० दिनांक:- ३०/०९/२०२४


उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास सविनय सादर करण्यात येते कि दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी होत आहे. तरी याचे अवचित्त साधून आपण राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो त्या अनुषंगाने राज्य तंबाखू मुक्त करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो तरी तंबाखू मुक्त आरोग्य शिक्षण जनजागृती करणे नितांत आवश्यक आहे.


ग्लोबल & टोबॅको सर्वे २०१६-२०१७ च्या सर्वेक्षणानुसार गुटका व धुम्रपान करणात्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. प्रमाण १५ टक्यानी कमी करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्यातच एक भाग म्हणून महात्मा गांधी जयंती निमित्त दिनांक २ ऑक्टोबर रोजी आपल्या कार्यालयामध्ये तंबाखू मुक्ती करिता जनजागृती कार्यक्रम व तंबाखू मुक्तीची शपत घेण्याविषयी आपल्या आधिपत्याखालील विभागांना सूचना देण्याविषयी आपणास नम्र विनंती आहे.


टिप- सदरील कार्यक्रमाचे फोटो ntcpbuldana@gmail.com या मेल वरती पाठवावे.



जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्हा रुग्णालय, बुलडाणा

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम


भारत सरकारचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ तसेच E-cigarette बंदीबाबतचा दि. १८/०९/२०१९ चा अध्यादेश यांची प्रभावी अंमलबजावणी होनेकारिता आज दि."०२ ऑक्टोंबर २०२४ रोजी "महात्मा गांधी जयंती निमित्त" तंबाखू मुक्तीची शपथ घेत आहोत-


"शपथ"


तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई - हुक्का, ई - सिगारेट यांच्या दुष्परीणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर, या व्यसनांपासून. दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर, आणि माझा परिसर तंबाखूमुक्त रहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा, यासाठी मी प्रयत्न करेन.


भारत सरकारच्या, २००३ च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत 'प्रयत्नशील राहीन.


माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त तसेच ई - सिगारेटमुक्त करेन. मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि, माझा महाराष्ट्र तंबाखु मुक्त करण्याचा प्रयत्न करेन


द्या तंबाखू व ई-सिगारेटला नकार, करा सुदृढ आरोग्याचा स्विकार! 





 राज्यभरात " दोन ऑक्टोबर 2024" 'तंबाखू मुक्त शपथ' घेण्याबाबत शासन आदेश.


सन 2016 17 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्य तंबाखूमुक्त करण्याचे हेतूने सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यस्तरावरून 34 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.


सन 2016 17 च्या ग्लोबल एडल्ट सभा टोबॅको सर्वे दोन च्या अहवालानुसार राज्यात सहा टक्के पुरुष व 1.4% महिला असे 3.8% प्रौढ व्यक्ती धुरासहित तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात 31 टक्के पुरुष व 16 टक्के महिला असे एकूण 24% रोड व्यक्ती धूर विरहित तंबाखूचे सेवन करतात हे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मध्ये कमी असले तरी धूर विरहित तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त आहे.

तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयरोग मुख कर्करोग यासारखे अनेक दुर्धर आजार होतात जागतिक आरोग्य संघटनेच्या 2004 च्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी आठ ते नऊ लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे होतो.


सन 2019 च्या जागतिक युवा तंबाखू च्या अहवालानुसार राज्यात 5.1% विद्यार्थी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात त्यापैकी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची सेवन करणाऱ्यांचे प्रमाण मुलांमध्ये 5.8% तर मुलींमध्ये 4.4% इतके आहे हे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहणानंतर तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात यावी.

धूम्रपान करणारे व धूम्रपान न करणारे यांच्याकरिता तंबाखूमुक्ती विषयी जनजागृती होणे व आपला परिसर व शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त होणे गरजेचे आहे त्यासाठी जनजागृती करण्यासाठी तंबाखू मुक्तीची शपथ हे प्रभावी माध्यम आहे.

त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक ध्वजारोहणानंतर तंबाखू मुक्तीची शपथ आपण सर्वांना द्यावी तसेच आपल्या जिल्ह्यातील अधिनिष्ठ सर्व कार्यालयीन प्रमुखांनी सदर शपथ घेण्यासाठी तसेच प्रभात फेरी पथनाट्य व शिबिर इत्यादी प्रकारे जनजागृती कार्यक्रम घेण्यासाठी आपल्या स्तरावरून सूचित करावे.

सोबत दिलेल्या सहपत्रांमध्ये तंबाखूमुक्तीची शपथ व इतर उपक्रमांचा अहवाल आपल्या अधिनिस्त असलेल्या सर्व विभागांना दिनांक 17 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्याबाबत सूचित करावे ही विनंती.. 


वरील प्रमाणे विनंती सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सहसंचालक आरोग्य सेवा तथा राज्य नोडल अधिकारी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आयुक्तालय मुंबई यांनी केले आहेत.




आरोग्य सेवा आयुक्तालयाची वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.