सारथी, महाज्योती, बार्टी, आर्टी, टीआयटीआर, अमृत व इतर सर्व संस्था अंतर्गत मिळणाऱ्या विद्यार्थी योजना एकसारख्या होणार?

 महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक दहा सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), पुणे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर व महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), मुंबई व इतर तत्सम स्वायत्त संस्थामार्फत कार्यान्वित असलेल्या अथवा करण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती, प्रशिक्षण, कौशल्य विकास व विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती या योजनेमध्ये आवश्यक समानता आणण्याकरीता सर्वंकष धोरण निश्चित करणे बाबत- अधिछात्रवृत्ती शासन निर्णय निर्गमित करून पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 



प्रस्तावना:-


मा. मंत्रिमंडळाच्या दि.१९.१०.२०२३ रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार सामाजिक न्याय विभागाच्या दि.३०.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), पुणे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर व महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), मुंबई व इतर तत्सम स्वायत्त


शासन निर्णय क्रमांकः सान्यावि-२०२४/प्र.क्र.७७/बांधकामे


संस्थामार्फत कार्यान्वित असलेल्या तसेच, भविष्यात प्रस्तावित करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, वसतिगृह व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयंम अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये एकसमानता रहावी यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले आहे. याकरीता अ.मु.स. (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे कायमस्वरूपी समिती गठीत करण्यात आलेली आहे.

अपर मुख्य सचिव, वित्त विभाग

अध्यक्ष

अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग

सदस्य

अपर मुख्य सचिव, इ.मा.ब.क. विभाग

सदस्य

अपर मुख्य सचिव, आदिवासी विकास विभाग

सदस्य

प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग

सदस्य

प्रधान सचिव, अल्पसंख्यांक विभाग

सदस्य

सचिव, सा.न्या. व वि.स. विभाग

सदस्य सचिव

२. विभागाच्या दि.२५.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या सन २०२२ च्या अधिछात्रवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांना ५० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर निर्णयाच्या अनुषंगाने, बार्टीच्या संशोधक विद्यार्थी संघटनांकडून १०० टक्के दराने अधिछात्रवृत्ती मंजूर करण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. त्यानुषंगाने दि. २५.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील निकषांमध्ये बदल करणेबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :-

एकसमान धोरणाच्या अनुषंगाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या सन २०२२ च्या अधिछात्रवृत्ती योजनेतील संशोधक विद्यार्थ्यांना ५० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय दि.११.०७.२०२४ रोजीच्या मा. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तथापि, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या व मागणीच्या अनुषंगाने, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), पुणे व महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेंतर्गत सन २०२२ च्या विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती मंजूर केल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती योजनेतील सन २०२२ च्या ७६३ विद्यार्थ्यांची जाहिरातीनुसार आलेल्या अर्जामधील कागदपत्रांची पडताळणी करून व शपथपत्र घेऊन पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून १०० टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

याकरीता येणारा खर्च हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या निधीतून करावा. याकरीता शासनाकडून अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४०९१०१४५०२७७०२२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(सो. ना. बागुल) 

सह सचिव, महाराष्ट्र शासन


संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.