५२ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन २०२४-२५ च्या आयोजनाबाबत प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था) कार्यालयातून निर्गमित दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
संदर्भ :- १. रा.वि.शि.स. (प्राविप्रा) / ५२ वेराविप्र/२०२४-२५/५४०/२०२४ दिनांक २७.०९.२०२४
२. रा.वि.शि.स. (प्राविप्रा)/५२ वेराविप्र/२०२४-२५/६२५/२०२४ दिनांक ०६.११.२०२४
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये सन २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षातील ५२ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाची पुर्वतयारी म्हणून आपल्या स्तरावर तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय प्रदर्शनी आयोजित करण्याबाबत सुचित करण्यात आलेले आहे. तरी आपल्या जिल्हयातील जिल्हास्तरीय प्रदर्शनी लवकरात लवकर आयोजित करून विहित प्रपत्रात माहिती दिनांक ०५.०१.२०२५ पुर्वी या कार्यालयात सादर करावी.
राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२४-२५ चे आयोजन माहे जानेवारी २०२५ च्या दुस-या आठवडयात करण्यात येणार आहे. त्याबाबत शासन स्तरावर तयारी सुरू करण्यात आलेली आहे. आयोजन स्थळ व दिनांक लवकरच आपल्याला कळविण्यात येईल.
सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, यांनी आपल्या अधिनस्त यंत्रणेकडून तालुकास्तर व जिल्हास्तर प्रदर्शनी बाबत आढावा घ्यावा व तसा अहवाल या कार्यालयाला कळविण्यात यावा.
(डॉ. हर्षलता बुराडे)
संचालक
राज्य विज्ञान शिक्षण संस्था
(प्रादेशिक विद्या प्राधिकरण) • रविनगर नागपुर
प्रादेशिक विद्या प्राधिकरण तथा राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर कार्यालयातील निर्गमित दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी च्या आदेशानुसार ५२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण २०२४-२५ आयोजित करणेबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
संदर्भ :- १) एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली, भारत सरकार यांचे दिशानिर्देश २०२४-२५
उपरोक्त संदर्भाकित विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे ५२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक ०१ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ (अंदाजित कालावधी) या दरम्यान ५ दिवस कालावधीचे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे.
यावर्षी एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली यांच्या संदर्भीय दिशानिर्देशान्वये विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान " (SCIENCE AND TECHNOLOGY FOR SUSTAINABLE FUTURE) असा निश्चित केला आहे. सामाजिक, पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून पुढीलप्रमाणे एकूण सहा उपविषय निर्धारित केलेले आहेत.by
१ अन्न, आरोग्य आणि स्वच्छता (A Food, Health and Hygiene.)
२ वाहतुक आणि दळणवळन (Transport And Communication.)
३ नैर्सगिक शेती (Natural Farming.)
४ आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management.)
५ गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार (Mathematical Modelling and Computational Thinking.)
६ कचरा व्यवस्थापन (Waste Management)
७ संसाधन व्यवस्थापन (Resource Management)
उपरोक्त उपविषयापैकी कोणत्याही एका उपविषयावर आधारित उच्च प्राथमिकस्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या (इयत्ता ९ वी ते १२ वी) शालेय विद्यार्थ्यांकडून प्रदर्शनीयवस्तु, प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प तयार करण्याचे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि खेळण्यांमधील नवकल्पनांचा समावेश असलेली प्रदर्शनीय वस्तू विकसित करण्याचे स्वातंत्र्य आहे.
महत्वाची सूचना: प्रतिकृतीची निवड करतांना दोन्ही गटात दिलेल्या प्रत्येक उपविषयामधून प्रतिकृतीची
निवड करावी.
सहभाग: एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली यांच्या संदर्भीय दिशा निर्देशान्वये या विज्ञान प्रदर्शनात आपल्या जिल्हयातील
मान्यता प्राप्त शाळेतील पुढील दोन गटातील विद्यार्थी
सर्व (1)
(ii) माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तर (इयत्ता ९वी ते१२ वीचे विद्यार्थी) सहभागी होऊ शकतात, या विद्यार्थ्यांनी
उच्च प्राथमिकस्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी)
त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि शाळेतील प्रयोगशाळा परिचर/सहाय्यक यांच्या मदतीने वरील उपविषयापैकी एका उपविषयावर आधारित प्रदर्शनीय वस्तू / प्रतिकृती/ वैज्ञानिक प्रकल्प तयार करणे अभिप्रेत आहे. या व्यतिरिक्त विद्याष्यर्थ्यांना मूळ संकल्पनेवर आधारित कोणताही उपविषय निवडण्याचे स्वातंत्र्य असेल.
(HH) जर दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाल्यास त्यांच्यामधून एका विद्याथ्यांची निवड करून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पाठविण्यात यावे. या दिव्यांग विद्यार्थ्यांजवळ सक्षम अधिकाऱ्यांचे अपंगत्वाबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
NCERT यांचे उपरोक्त संदर्भीय दिशानिर्देशान्वये राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाकरिता मूल्यमापनासाठी (1) उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत) (ii) माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तर (इयत्ता ९ वी ते १२ वी) असे दोन गट निश्चित केलेले आहेत.
विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी यापूर्वीच्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेले
वैज्ञानिक प्रकल्प/ प्रदर्शनीय वस्तूंचे पुन्हा यावर्षीच्या विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण व पुनरावृत्ती होणार नाही. तसेच INSPIRE Award प्रदर्शनात सहभाग घेतलेले विज्ञान प्रकल्प/वैज्ञानिक प्रतिकृती तालुकास्तरीय /जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पुन्हा मांडले जाणार नाहीत, त्याचप्रमाणे बाजारातून रेडीमेड साहित्य विकत घेऊन विज्ञान प्रदर्शनात सादर करण्यात येणार नाही, याची दक्षता घ्यावी.
व्याप्ती :- या विज्ञान प्रदर्शनात राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा सहभागी होतील, मान्यता प्राप्त शाळा म्हणने (१)
शासकीय (२) माजी शासकीय जिल्हा परिषद (३) महानगर पालिका / नगर पालिका नगर परिषदेच्या शाळा (४) खाजगी अनुदानित/विना अनुदानित/ कायम विना अनुदानित शासन मान्य शाळा (५) मिशनरी शाळा (६) आश्रम शाळा इत्यादी प्रकारच्या शाळा होय. प्रत्येक शाळेतून वरीलपैकी एका गटात एका वैज्ञानिक प्रकल्पासह फक्त एकच विद्यार्थी सहभाग घेऊ शकेल.
प्रदर्शन कालावधी :
(१) राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाची पूर्व तयारी म्हणजे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होय. आपल्या जिल्हयात पुढील कालावधीत प्रदर्शनाचे आयोजन करावे.
विज्ञान प्रदर्शनाचा स्तर
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
दिनांक: ११ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२४
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनदिनांक:
१० डिसेंबर ते ०५ जानेवारी २०२४
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक (संभाव्य कालावधी):
१० जानेवारी ते ३० जानेवारी २०२५
२) राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (माध्यमिक शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धा २०२४-२५ :- दरवर्षी प्रमाणे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य (माध्यमिक शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत फक्त माध्यमिक शिक्षक सहभागी होतील, माध्यमिक शिक्षक म्हणजे इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत शिकविणारे शिक्षक, या स्पर्धेतून जिल्हास्तरावर एका उत्कृष्ट अशा माध्यमिक शिक्षकाच्या शैक्षणिक साहित्याची निवड करण्यात यावी. सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांनाही याबाबत कळवावे.
३) राज्यस्तरीय अध्यापक निमित शैक्षणिक साहित्य (प्राथमिक शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धा-२०२४- २५:- सन २००६-०७ या वर्षापासून राज्यस्तरावर प्राथमिक शिक्षकांनी तयार केलेल्या (गणित व विज्ञान) शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. या चालू वर्षात राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (प्राथमिक शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धा २०२४-२५ आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. प्राथमिक शिक्षक म्हणजे इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिकविणारे शिक्षक, तरी आपल्या जिल्हयातील सर्व शाळांना या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कळवावे, या स्पर्धेतून जिल्हास्तरावर एका उत्कृष्ट अशा प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याची निवड करण्यात यावी. ४) राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांचे प्रायोगिक साधनांचे प्रदर्शन व स्पर्धा २०२४-२५
:- सन २००६-०७ या वर्षापासून राज्यस्तरावर प्रयोगशाळा सहाय्यक/ परिचर यांनी तयार केलेल्या (गणित व विज्ञान) वैज्ञानिक उपकरण प्रतिकृतीचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक /परिचर यांचे प्रायोगिक साधनांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हास्तरावर वरील प्रमाणे प्रदर्शन आयोजित करावे व सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील प्रयोगशाळा सहाय्यक /परिचर यांना प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करावे,
निवड प्रक्रिया : १) विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनीय वस्तु राज्यातील आदिवासी भाग असलेल्या जिल्हयांनी उच्च प्राथमिक स्तरापर्यतच्या गटातून (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत) तीन (३), दिव्यांग एक (०१) व आदिवासी गटातून एक (०१)
असे एकूण पाच (०५) माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून (इयत्ता ९ वी ते १२ वी) तीन (३), दिव्यांग एक (०१)
व आदिवासी गटातून एक (०१) असे एकूण पाच (०५) असे दोन्ही गटातून एकूण दहा (१०) प्रदर्शनीय वस्तू आणि बिगर आदिवासी जिल्हयांनी उच्च प्राथमिक स्तरापर्यतच्या गटातून (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी) तीन (३) व दिव्यांग एक (०१) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून (इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी) तीन (३) व दिव्यांग एक अशा एकूण आठ (०८) प्रदर्शनीय वस्तूंची मूल्यमापनाच्या निकषानुसार ५२ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाकरीता निवड करावी.
२) जिल्हास्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (इयत्ता ९ वी ते १२ वी ला शिकविणारे माध्यमिक शिक्षक) प्रदर्शन या स्पर्धेमधून एका उत्कृष्ट शैक्षणिक साहित्याची राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धेकरीता निवड करावी.
३) राज्यस्तरावर अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (इयत्ता १ ते ८ ला शिकविणारे प्राथमिक शिक्षक) प्रदर्शन या स्पर्धेतून एका उत्कृष्ट शैक्षणिक साहित्याची राज्यस्तरीय अध्यापक निर्मात शैक्षणिक साहित्याची राज्यस्तरीय प्रदर्शन व स्पर्धेसाठी निवड करावी.
(४) जिल्हास्तरावर प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर यांच्या वैज्ञानिक साधनाच्या प्रदर्शन व स्पर्धेमधून प्रयोगशाळा सहाय्यक /परिचर-पांच्या एका उत्कृष्ट वैज्ञानिक साधनांची निवड करावी. उपरोक्त १ ते ४ मुद्यात नमुद केल्याप्रमाणे निवड यादी शिफारशीसह या संस्थेस पाठवावी.
प्रदर्शनीय वस्तूंची मांडणीः प्रदर्शनीय वस्तूंच्या मांडणीकरीता प्रत्येक गटातील प्रदर्शनीय वस्तूसाठी साधारणपणे
१२२ cm x ७६.cm x २७४ एवढी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. विज्ञान प्रदर्शन शक्यतो शाळांच्या इमारती अथवा सार्वजनिक इमारतीमध्ये भरविण्यात यावे. आवश्यक सूचना :
१) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सर्व जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई यांनी जिल्हयातील सर्व शासन मान्यता प्राप्त उच्च प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांना परिपत्रक त्वरीत पाठविण्याची कार्यवाही करावी. परिपत्रक शाळांना उशिरा मिळाल्यामुळे शिक्षकांना, विद्यार्थ्यांना विचार करण्यास फार बोडा वेळ मिळतो, त्याकरीता शाळांना लवकरात लवकर परिपत्रक पाठवावे जेणे करून दर्जेदार व नवनवीन प्रदर्शनीय वस्तू प्रकल्प
तयार करण्यास पुरेसा वेळ मिळेल. २) गणित, विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाबाबतची माहिती प्रसार माध्यमांमार्फत जनसामान्यापर्यंत पोहचवावी. ३) तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन तीन (३) दिवस कालावधीचे (नमूद कालावधीतील) आयोजित
करावे ४) जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कालावधीत विज्ञानरंजन कार्यक्रमाचे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे. .५) प्रदर्शनाबाबतची माहिती प्रसार माध्यमाशिवाय चित्रपट गृह, व्हिडीओ गृह, रेडिओ, टी. व्ही व सिटी केबल द्वारे प्रसिद्धीला देण्यात यावी. प्रदर्शनाबाबतची माहिती ग्रामीण जनतेला, विद्याव्यांना, शिक्षकांना होण्यासाठी शिक्षण परिषद चर्चासत्रातून दवंडीद्वारे माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करावे. विज्ञान
प्रदर्शन हे केवळ औपचारिकता राहणार नाही याची गांभीयाने नोंद घ्यावी.
६) प्रदर्शन वस्तूंची निवड तज्ज्ञांमार्फत करतांना पुनरावृत्ती (Repetitions) होणार नाही याची दक्षता घ्यावी.
वासाठी मागील पाच वर्षातील निवड झालेल्या तालुका व जिल्हास्तरावरील निवड याद्या तज्ज्ञांना पुरवाव्यात म्हणजे पुनरावृत्ती (Repetitions) टाळता येईल. प्रदर्शनीय वस्तूंचे मूल्यमापन निकषानुसार वस्तुनिष्ठ व्हावे. याबाचत पालक व विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी. (७) सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे बालकांकरिता राज्यस्तरीय विज्ञान, गणित आणि पर्यावरण प्रदर्शनी २०२४-
२५ तथा ५२ वे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन २०२५ चे आयोजन होत आहे. त्या निमित्याने जनतेत जनजागृती करावी. राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन स्थळ व संबंधित राज्याचे नाय यथावकाश कळविण्यात येईल.
सांख्यिकीय माहिती : अ) जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आटोपताच निधर्धारित प्रपत्रात माहिती भरुन त्वरीत सादर
करावी. घ) तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, प्राथमिक शिक्षक व माध्यमिक
शिक्षक यांचे शैक्षणिक साहित्य व प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर यांची वैज्ञानिक साधने याबाबत सहभागी झालेल्या विद्याध्यांची / शिक्षकांची/ प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर यांच्या उपस्थितांची माहिती तात्काळ या संस्थेकडे पाठवावी. उपरोक्त प्रमाणे नमूद केलेल्या मुद्यांकडे अधिक लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी. आपल्या सुलभ संदर्भाकरिता विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासंबंधी नियमावली व मूल्यमापनाचे निकष यासोबत जोडलेले आहेत, त्याप्रमाणी आवश्यक ती कार्यवाही करून प्रदर्शन आटोपताच २७ डिसेंबर २०२४ पर्यंत अहवाल, सांख्यिकीय माहिती, इत्यादी सर्व माहिती विहित प्रपत्रात या संस्थेस न चुकता सादर करावी, अधिक माहितीसाठी NCERT ची वेबसाईट (www.ncert.nic.in) पहावी.
(डा. हर्षलता बुराडे)
संचालक,
प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान शिक्षण संस्था। रविनगर, नागपूर,
प्रदर्शनीय वस्तूंचे मूल्यमापन करण्याकरिता परीक्षकांकरिता आवश्यक सूचना :-
प्रदर्शनीय वस्तूंचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ आणि निःसंदिग्ध होण्याकरिता परीक्षकांच्या कामात कोणतीही ढवळाढवळ न करता विषय- उपविषय व मूल्यांकनाचे निकषाप्रमाणे गुणानुक्रमे प्रत्येक उपविषयास न्याय मिळेल यापद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करून निरपेक्ष आणि न्यायोचित असे मूल्यमापन परीक्षकाने करणे आवश्यक आहे. परीक्षक हे उप विषयाचे तज्ञ असावेत,
मूल्यांकनाचे बाबतीत एकसूत्रता आणण्यासाठी एन.सी.आर.टी., नवी दिल्ली यांनी पाठविलेल्या मार्गदर्शनानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांनी मूल्यांकन करावे. राज्यस्तरीय प्रदर्शनातून राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाकरिता प्रदर्शनीय वस्तूंची निवड करताना प्रत्येक उप-विषयावर आधारित तीन उत्कृष्ट प्रदर्शनीय वस्तूंना प्राधान्य देण्यात येईल.
प्रदर्शनीय वस्तूंचे दोन गटात विभाजन करावे.
अ) उच्च प्राथमिक स्तरापर्यंतचे विद्यार्थी (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत) (सर्व शासन मान्यता प्राप्त शाळा) ब) माध्यमक व उच्च माध्यमिक गट: इयत्ता ९ वी ते १२ वी (सर्व शासन मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा)
परीक्षकांनी उपविषयकनिहाय प्रदर्शनीय वस्तूंचे मूल्यमापन करताना पुढील गुणदान तक्ता उपयोगात आणावा
मूल्यमापनाचे निकष / गुणदान तक्ता
१) सहभागी विद्यार्थ्यांचे सृजनशीलता व कल्पनाशक्तीचा सहभाग
(Involvement of children's own creativity and imagination)
२) प्रदर्शनीय वस्तूंची मौलिकता व वैज्ञानिक आणि गणितीय नाविन्यता
(Originality and scientific and Mathematical Innovations in the exhibit/model)
3) वैज्ञानिक विचार तत्व, उपागम (प्रणाली)
(Scientific thought/principle/approach)
) तांत्रिक, कौशल्य, कारागिरी, शिल्पकौशल्य-
(Technical skill, workmanship and craftsmanship)
५) समाजासाठी उपयोगीला, मापनीयता
(Utility for Society and Scalability)
६) अल्प खचिक, हस्तवाह्यता, टिकाऊपण
(Economic (low cost), portability, durability etc.)
) सादरीकरणाचे पैलू जसे प्रयोग दिग्दर्शन, स्पष्टीकरण आणि प्रदर्शन- ७
(Presentation aspects like demonstration, explanation and display)
अ) ग्रामीण तथा मागास क्षेत्रातील प्रदर्शित वस्तूंना ५% अतिरिक्त भारांश देण्यात यावा.
ब) अर्थशहरी क्षेत्रातील प्रदर्शित वस्तूंना तीन टक्के अतिरिक्त भारांश देण्यात यावा
१) विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता व कल्पनाशक्तीचा सहभागः प्रदर्शनीय वस्तूंचे मूल्यांकन करताना पुढील बाबीचा विचार करून त्यात सृजनशीलता व कल्पनाशक्तीच्या सहभागाबाबतचे वैशिष्ट्य आहे काय? हे पहावे अ) प्रतिकृतीची / प्रदर्शनीय वस्तूंची उभारणी करताना उपयोगात आणलेली कल्पना ब) अडचणींचे निवारण करण्यासाठी वापरलेली पद्धत
क) पृथःकरण
ड) नवीन उपकरणांचा आराखडा व रचना.
विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीयदृष्ट्या सृजनशीलता येण्यासाठी वरील मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. अर्थात वरील सर्व मुद्यांचा विचार प्रत्येक प्रदर्शनीय वस्तूंबाबत करता येईल असे नाही. उदाहरणार्थ बऱ्याच विद्याच्यर्थ्यांनी एका संकल्पनेचा उपयोग करून त्यावर आधारित वस्तू तयार केली असेल. परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांची अडचण निवारण्याचा मार्ग व पद्धत वेगवेगळी असू शकेल. अर्थात अंतिम निर्णय हा परीक्षकांचा असेल.
२) प्रदर्शनीय वस्तूंची मौलिकता व नाविन्यताः
विद्याथ्यांनी निवडलेली संकल्पना स्पष्ट व निःसंदिग्ध मांडलेली आहे काय? किंवा त्यावर शास्त्रीय विचार झालेला
आहे काय ? तयार केलेली वस्तु पारंपारिक आहे काय? किंवा त्यात सुधारणा घडवून आणली आहे काय? तयार केलेली वस्तू संपूर्णपणे नवीन आहे काय? या गोष्टीचा मूल्यमापन करताना विचार होणे आवश्यक आहे. ३) वैज्ञानिक विचार तत्व उपागमः प्रदर्शनीय वस्तू तयार करताना उपयोगात आणलेल्या वैज्ञानिक विचार, तत्व व वैज्ञानिक उपागम यांचा विचार होणे आवश्यक आहे,
४) तांत्रिक कौशल्य कारागिरी शिल्प कोशल्य प्रदर्शनीय वस्तू तयार करताना उपयोगात आणलेली निरनिराळे तांत्रिक कौशल्य, कारागिरी व शिल्प कौशल्य यांचा विचार करणे आवश्यक आहे.
) उपयोगिता आणि विद्यार्थी व सामान्य व्यक्ती यांचे करिता शैक्षणिक मूल्यः ५ प्रदर्शनीय वस्तूंचे व्यवहारात उपयोग करता येते किंवा कसे? त्याला शैक्षणिक मूल्य आहे काय? याचा विचार होणे आवश्यक आहे.
६) अल्प खचिक, हस्तवाह्यता, टिकाऊपणा प्रदर्शनीय वस्तू विद्याथ्यांनी स्वतः तयार केलेली असावी. ती अल्पखर्चीक असावी. प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी सुटसुटीत व टापटीप असावी. ते टिकाऊ स्वरूपाची असावी. इत्यादी बाबीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे,
७) सादरीकरणाचे पैलू जसे प्रयोग, दिग्दर्शन, स्पष्टीकरण आणि प्रदर्शन प्रदर्शनीय वस्तू बनविण्यामागे असलेले तत्व, सुबक वस्तू तयार करण्यामागे असलेली कल्पकता व अभिनव कल्पना याच प्राधान्य देण्यात यावे. तसेच प्रदर्शनीय वस्तूंची माहिती, प्रयोगदिग्दर्शन व स्पष्टीकरण या बाबींकडे लक्ष केंद्रित करावे.
विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतांना पुढील मुद्यांवर भर द्यावा : विद्यार्थी वस्तूंचे विवेचन स्पष्टपणे आणि न अडखळता करतो काय? सर्वसाधारण माणसाला त्याने दिलेले स्पष्टीकरण समजू शकेल काय? विचारलेल्या प्रश्नांचे तो समर्पक उत्तर देतो काय? पाठांतर केलेले स्पष्टीकरण आहे काय? जर पाठांतर केलेले असल्याचे आढळल्यास त्यास कमी दर्जाचे समजून मुल्यांकनही त्याप्रमाणात कमी राहील याचीही परीक्षकांनी नोंद घ्यावी.
विज्ञान प्रदर्शन आयोजनाबाबतची नियमावली
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन ०५ जानेवारी २०२४ पूर्वी आयोजित करावे नियोजना करिता पुढील नियमावलीचा अवलंब करावा.
१) प्रदर्शनीय वस्तूची ।) उच्च प्राथमिक स्तरापर्यंतचे इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी आणि ii) माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी अशा दोन गटात विभागणी करावी.
२) वरील दोन्ही विभागाचे प्रदर्शन एकाच वेळी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये किंवा इमारतीमध्ये आयोजित करावे.
३) जिल्हा परिषद व तेथील पदाधिकाऱ्यांचे आणि स्थानिक स्तरावर उच्च प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थाप्रमुख, विज्ञान संघटनेचे प्रतिनिधी व विज्ञान विषयात आवड असणाऱ्या समाजातील नागरिकांचे सहाय्य घेऊन प्रदर्शन आयोजनाबाबतचा तपशील ठरविण्याकरिता सभा आयोजित करावी.
४) प्रदर्शनीय वस्तूंची निवड : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनानंतर गुणानुक्रमे निवडलेल्या विद्याथ्यांची यादी अविलंब या कार्यालयात सादर करावी. प्रत्येक जिल्ह्यातून उच्च प्राथमिक स्तरापर्यंतच्या विभागातून तीन आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून तीन अशा एकूण सहा प्रदर्शनी वस्तूंची निवड करावी. आदिवासी भाग असलेल्या जिल्ह्याचे बाबतीत वरील सहा (६) प्रदर्शनीय वस्तू व्यतिरिक्त उच्च प्राथमिक स्तरापर्यंतच्या गटातून आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रत्येकी एक याप्रमाणे दोन जादा प्रदर्शनी वस्तू निवडाव्या म्हणजे आदिवासी भाग असलेल्या
7
जिल्ह्यातून उच्च प्राथमिक स्तरापर्यंतच्या गटातून तीन आणि एक आदिवासी अशा एकूण चार आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून तीन बिगर आदिवासी आणि एक आदिवासी अशा एकूण चार याप्रमाणे दोन्ही गटातून एकूण आठ प्रदर्शनीय वस्तूंची निवड करावी. जर दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाल्यास त्यांच्यामधून एका विद्यार्थ्यांची निवड करून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पाठविण्यात यावे. या दिव्यांग विद्यार्थ्यांजवळ सक्षम अधिकाऱ्यांचे अपंगत्वाबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक यांच्या शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धेतून प्रथम क्रमांक येणाऱ्या प्रत्येकी फक्त एका शिक्षकांची निवड करावी. तसेच प्रयोगशाळा सहाय्यक / परिचराच्या प्रायोगिक साधनाच्या प्रदर्शन व स्पर्धेमधून फक्त एकाच प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर यांची निवड करावी, निवड प्राप्त विद्यार्थी / शिक्षकांची / प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर यांची नावे जिल्हा विज्ञान प्रदर्शन आटोपल्यानंतर तात्काळ वर निर्देशित कालावधीत या कार्यालयास निर्धारित प्रपत्रात सादर करावी. ज्या विद्यार्थी/ शिक्षकांची निवड जिल्हा स्तरावर करण्यात आलेली आहे; त्यांनाच राज्यस्तरीय प्रदर्शनाकरिता पाठवावे. यात कोणताही बदल करू नये; असा बदल आढळल्यास नवीन विद्यार्थी / शिक्षकास राज्य विज्ञान प्रदर्शनात कोणत्याही परिस्थितीत सहभाग घेता • येणार नाही; याची नोंद घ्यावी.
(डॉ. हर्षलता बराडे)
संचालक
राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रवीनगर, नागपूर.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments