विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अपडेट - निवडणूक प्रशिक्षण ऑनलाईन होणार?

मतदान केंद्राध्यक्ष (Presiding Officer) वं मतदान अधिकारी (Polling Officer) यांना IGOT KARMAYOGI पोर्टलद्वारे प्रशिक्षण देणेबाबत.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय दिनांक : १८ ऑक्टोबर, २०२४

आगामी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूको २०२४ च्या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष (PAO) व मतदान अधिकारी (FPO) यांना विहीत प्रशिक्षण देण्यापूर्वी ऑनलाईन कोर्स द्वारे प्रशिक्षण झाल्यास सदर अधिकाऱ्यांची निवडणूकीसंबंधी कामकाजासाठी चांगली पार्श्वभूमी तयार होवू शकते. ही बाब विचारात घेवून सदर अधिकाऱ्यांना Physica! Training पुर्वी IGOT KARMAYOGI पोर्टलच्या माध्यमातून ध्वनीचित्रफितीच्याद्वारे (Audio-Visual) प्रशिक्षण देण्याची योजना राबवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.

२. IGOT KARMAYOGI पोर्टलवर तयार करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफिती या Handbook For Presiding officer-२०२३ मधील प्रकरणानुसार राज्यातील उत्कृष्ट NLMT व SLMTs यांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या आहेत. अशा एकूण मराठी भाषेतील १४ ध्वनीचित्रफितीचा समावेश असलेला ऑनलाईन कोर्स दोन भागात IGOT KARMAYOGI पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन कोर्स आयोगाच्या सूचनांनुसार घेण्यात येणाऱ्या विहीत प्रशिक्षणाला पर्याय नसून निवडणूक कामकाजाशी संबंधीत विहीत केलेले प्रशिक्षण प्रत्यक्षरित्या घेणे अनिवार्य आहे. सदर ऑनलाईन कोर्सचा हेतू केवळ विहित प्रशिक्षणाआधी विषयाची पार्श्वभूमी तयार होणे असा आहे. तसेच निवडणूक कामकाजाच्या दृष्टीने Handbook For Presiding officer- २०२३ मधील तरतुदी अंतिम असतील ही बाब लक्षात घ्यावी.

3. सबब आपल्या अधिपत्याखालील सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना तसेच या कामासाठी Election duty लागण्याची शक्यता असलेल्या सर्वांना वरील बाब निदर्शनास आणून द्यावी. तसेच निवडणूक कामकाजाशी संबंधीत ज्ञान व कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने सदर ध्वनीचित्रफिती पाहण्याबाबत आपल्यास्तरावरूनं सुचना देण्यात याव्यात.

४. सदर ध्वनीचित्रफिती भारत सरकारच्या I GOT KARMAYOGI पोर्टलवर पाहता येणार आहेत. त्यासाठी नोंदणीकरीता सोबतच्या Flow Chart चा अवलंब करावा. सदर पोर्टलवर लॉगिन होण्यासाठी gov.in किंवा nic.in यापैकी एक ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. ज्या अधिकारी/ कर्मचारी यांच्याकडे gov.in किंवा nic.in चा ई-मेल आयडी आहेत त्यांनी I GOT KARMAYOGI पोर्टलवर वर सदर कोर्स पुर्ण करावा. तसेच ज्या अधिकारी/ कर्मचारी यांच्याकडे gov.in किंवा nic.in चा ई-मेल आयडी नाहीत त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.

आपला,
 (शरद दळवी)
अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य





 मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कार्यालयात परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक तयारी व्हिडिओ कॉन्फरन्स बाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम नजीकच्या काळात जाहीर होणार आहे. सदर निवडणुकीच्या पूर्वतयारीचा मा. मुख्य निवडणूक अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्स (VC) द्वारा आढावा घेणार आहेत. सदरची VC मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ रोजी खाली दर्शविलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे.


१ सकाळो ०९.३० ते १०.०० वाजेपर्यंत

नागपूर विभागातील ६ जिल्हे

२ सकाळी १०.१० ते १०.३५ वाजेपर्यंत

अमरावती विभागातील ५ जिल्हे

सकाळी १०.४५ ते ११.२५ वाजेपर्यंत

औरंगाबाद विभागतील ८ जिल्हे

सकाळी ११.३५ ते १२.०० वाजेपर्यंत

नाशिक विभागातील ५ जिल्हे

दुपारी १२.१० ते १२.३५

पुणे विभागातील ५ जिल्हे

दुपारी १२.४५ ते ०१.१० वाजेपर्यंत

कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी.

७ दुपारी ०१.२० ते ०१.३० वाजेपर्यंत

रायगड, पालघर व ठाणे

मुंबई शहर व मुंबई उपनगर


सदर VC मध्ये प्रामुख्याने पुढील कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे- १. मतदान कर्मचारी वर्गाची निश्चिती

२. कायदा-सुव्यवस्थेबाबत आढावा (Vulnerability mapping, सेक्टर ऑफोसर, सेक्टर पोलीस ऑफिसरची नियुक्ती, पोलीस कर्मचारी आवश्यकता इत्यादी)

३. मतदान केंद्राची तपासणी

४. मतमोजणी केंद्राचे प्रस्ताव

५. मतदान साहित्याचा आढावा. (EVM व अन्य साहित्य)

६. मतदारयाद्यांच्या निरंतर अद्ययावतनाचा आढावा.

७. NGRS

८. स्वीप विषयक आढावा

९. Control Room/Media Room/Communication Plan/Nodal Officer नियुक्तीबाबत.

१०. निवडणूक अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण


सदर VC करिता जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दालनात, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपस्थित राहावे.


आपला,


(म. रा. पारकर)

उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी

महाराष्ट्र राज्य


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ही वेबसाईट.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.