राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे सोबत आज बैठक!

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, दिनांक : ०३ सप्टेंबर २०२४ 

प्रति,

१. अ.मु.स., गृह विभाग, मंत्रालय, मुंबई

२. अ.मु.स. (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई

३. अ.मु.स. (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

४. अ.मु.स. ग्रामविकास व पंचायत राज विभाग, मंत्रालय, मुंबई

५. प्रधान सचिव, (ले. व को.) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

६. प्रधान सचिव, नगर विकास विभाग (नवि-२), मंत्रालय, मुंबई

७. प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

८. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई

९. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ,

१०. अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र

११. अध्यक्ष, राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटना


विषय : राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत बैठक... 

संदर्भ :- शासनाचे समक्रमांकाचे दिनांक १६.०८.२०२४ रोजीचे पत्र.

महोदय,

उपरोक्त विषया संदर्भाधिन पत्रान्वये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या विविध मागण्यांबाबतची निवेदने आपणांस दिनांक २९.०८.२०२४ रोजीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पाठविण्यात आली आहेत. तसेच यासंदर्भात वस्तुस्थिती अवगत करण्याबाबत आपणांस कळविण्यात आले होते.

उक्त संघटना तसेच अन्य संघटनांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदय यांचे समवेत बुधवार, दिनांक ०४.०९.२०२४ रोजी सांयकाळी ०७.३० वाजता, सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यास्तव आपल्याशी संबंधित मागणीबाबतच्या वस्तुस्थितीसह कृपया सदर बैठकीच्या वेळी आपण उपस्थित रहावे, अशी आपणास विनंती आहे.


आपला,

(अ.म.चेमटे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन


प्रत :- मा. मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२

मा. उपमुख्यमंत्री (गृह) / मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई ३२

सचिव (साविस), सामान्य प्रशासन विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई ३२

उप सचिव (आरक्षण-१), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई


वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.