राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ने दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी १४ ऑगस्ट हा दिवस "Partition Horrors Remembrance Day" ("फाळणीच्या मीषण आठवणींचे स्मरण करण्यासाठी स्मृती दिन" म्हणून साजरा करणे बाबत दिलेल्या सूचना.
संदर्भ -१. D.O. No. १७-३२/२०२४-Coord, शालेय्य शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचेकडील पत्र दि. ०९/०८/२०२४
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार १५ ऑगस्ट २०२१ रोजी माननीय पंतप्रधान यांनी आपल्या भाषणात लाल किल्ल्यावर १४ ऑगस्ट हा दिवस" फाळणीच्या भीषण आठवणींचे स्मरण करण्यासाठी स्मृती दिन" म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. या स्मृती दिनाचा उद्देश लाखो फाळणीग्रस्त नागरिकांच्या व्यथा, दुःख आणि वेदना प्रकाशात आणणे, तसेच ज्या विस्थापनामुळे हजारोंचे प्राण गेले अशा लोकसंख्येच्या सर्वात मोठ्या विस्थापनाच्या स्मृतींना उजाळा देणे हा आहे. दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले जातात या वर्षी फाळणीग्रस्त लोकांच्या भावनांना उजाळा देण्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) या संस्थेच्या वतीने एका नाटकाची संहिता तयार करण्यात आली आहे. फाळणीच्या घटना, त्याचा हजारोंच्या जीवनावर झालेला विपरीत परिणाम, सदर घटनेचे महत्व आदी बाबींविषयी विद्यार्थ्यांना शिक्षित करणे, व त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करणे हा या नाटकाच्या संहितेचा उद्देश आहे. नाटकाची संहिता डाऊनलोड करण्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
https://drive.google.com/drive/u/1/folders/1Eakk7hIRSOkIAmkHuytDKuAj4lg-IbHA
सदर संहिता ही सूचक असून शाळांना त्यांच्या परिस्थितीनुसार उचित बदल करता येईल. तसेच शाळांना काही सर्जनशील बदल सुद्धा करता येईल. या संदर्भात आपण आपले अधिनस्त क्षेत्रीय यंत्रणा संस्था व क्षेत्रीय अधिकारी यांना "फाळणीच्या भीषण आठवणींचे स्मरण करण्यासाठी स्मृती दिन" या दिनाबाबत अवगत करावे. तसेच सदर नाटकाच्या संहितेची हिंदी व इंग्रजी प्रत व त्याची लिंक ही सर्व शाळांपर्यंत पोहोचेल या दृष्टीने सदर क्षेत्रीय यंत्रणा व अधिकारी यांना उचित सूचना निर्गमित कराव्यात, तसेच सदर संहितेचा स्थानिक भाषेमध्ये अनुवाद करण्याची बाब ही सूचित करण्यात यावी.
तसेच "फाळणीच्या भीषण आठवणींचे स्मरण करण्यासाठी स्मृती दिन" यासाठी फाळणीवर एक प्रदर्शन आयोजित करणे हेही सूचित केले आहे. Indian Council of Historical Res.earch (CHR) आणि Indira Gandhi National Centre for the Arts (IGNCA) यांनी संयुक्तपणे तयार केलेले हे प्रदर्शन पुढील लिंकवर उपलब्ध आहे.
https://amritmahotsav.nic.in/partition-horror-remembrance-day.htm
प्रदर्शन आयोजित करण्यासाठी सूचना देखील सोबत दिलेल्या आहेत, समस्येची संवेदनशीलता लकात घेऊन संयम आणि गांभीर्याने सदर प्रदर्शन आयोजित करावे. समाजातील कोणत्याही घटकाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, याची दक्षता घेऊन केंद्र शासनाच्या सूचनांन्वये प्रत्येक जिल्हयातील एक प्रमुख शाळा ज्यात जवळपासच्या शाळांमधील विद्यार्थी देखील जाऊन प्रदर्शन पाहू शकतात अशा मध्यवर्ती शाळांमध्ये प्रदर्शनाचे आयोजन करावे.
प्रदर्शनाचे आयोजनाबरोबरच सदर विषयाच्या अनुषंगाने चर्चा, वादविवाद सारख्या लहान कार्यक्रमांच आयोजनही करता येईल. आणि स्थानिक माध्यमांना सदर कार्यक्रमास आमंत्रित करता येईल. हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थां आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे.
तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील अधिव्याख्याता यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल म्हणजे घेतलेले उपक्रम, सहभागी शाळा संख्या, सहभागी विद्यार्थी संख्या, सहभागी शिक्षक संख्या, अशा स्वरूपात परिषदेतील सामाजिक शास्त्र विभागाच्या socialsciencedept@maa.ac.in या ईमेलवर दि. २० ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करावा. अधिक माहितीसाठी संदर्भिय पत्राचे अवलोकन करावे. सोबत - संदर्भीय पत्र व नाटकाच्या संहिता.
(डॉ. माधुरी सावरकर)
उपसंचालक
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments