Shalarth Portal New Update - सेवानिवृत्त शिक्षक/शिक्षकेत्तर/केंद्रप्रमुख कर्मचारी यांचे 7 व्या वेतन आयोगाचा हप्ते व महागाई भत्ता फरकाचे देयके SHALARTH प्रणालीमधून Online पद्धतीने सादर करणेबाबत मार्गदर्शन

 सेवानिवृत्त शिक्षक / शिक्षकेत्तर / केंद्रप्रमुख कर्मचारी यांचे 7 व्या वेतन आयोगाचा हप्ते व महागाई भत्ता फरकाचे देयके SHALARTH प्रणालीमधून Online पद्धतीने सादर करणेबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमीत करणेबाबत  शिक्षणाधिकारी प्राथमिक बुलढाणा यांनी दिनांक 31 जुलै 2024 रोजी पुढील प्रमाणे सूचना निर्मित केल्या आहे. 



1) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्रक्र. प्राशिसं/वे. आ. हप्ते/2024/4836 दिनांक 12.07.2024

2) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे ज्ञापन क्र. 9 अंदाज/2024-25/ वेतन अनु. / 201/4985 दिनांक 22.07.2024

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कार्यरत सेवानिवृत्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे 7 व्या वेतन आयोगाचे हप्ते व महागाई भत्ता फरकाचे देयके SHALARTH प्रणालीमधून ONLINE पद्धतीने सादर करणेबाबतचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यानुषंगाने संदर्भ क्रमांक 02 नुसार अनुदान प्राप्त झालेले आहे.

त्यानुषंगाने आपल्या पंचायत समिती / हायस्कूल अंतर्गत सेवानिवृत्त झालेले शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे 7 वा वेतन आयोग फरकाचे 5 वा हप्ता तसेच माहे जाने 2024 ते जून 2024 पर्यंतचे महागाई भत्ता फरकाचे देयके SHALARTH प्रणालीमधून SHALARTH_2.0 या टॅब मधील Pending Bill या सुविधेचा उपयोग करून जिल्हा स्तरावर Online पद्धतीने सादर करावी. याकरिता शालार्थ जिल्हा समन्वयकांनी तयार केलेल्या मार्गदर्शनपर User Manual For Pendin Bill Facility In Shalarth उपयोग करावा,

देयके SHALARTH प्रणालीमधून Online पद्धतीने सादर करतांना खालील मार्गदर्शक सुचनानुसार कार्यवाही करण्यात यावी.

• सेवानिवृत्त / मयत कर्मचारी यांचे 7 वा वेतन आयोग फरकाचा 5 वा हप्ता (प्रलंबीत असलेला 1 ला ते 4 था हप्ता) यापैकी जो देय असेल तो हप्ता चे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे

* SHALARTH मध्ये Entry केलेल्या Claim ID ची प्रिंट. • 7 वा वेतन आयोग फरकाचे माहे जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 पर्यंतचे विवरणपत्र

• सेवानिवृत्ती आदेशाची झेरॉक्स प्रत

• मयत कर्मचारी बाबतीत मृत्यू प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत

• सेवापुस्तकाच्या वेतन निश्चिती पडताळणी झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत

• सदर देयक यापुर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

* देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.

सेवानिवृत्त कर्मचारी यांचे महागाई भत्ता फरकाचे देयक चे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे

• SHALARTH मध्ये Entry केलेल्या Claim ID ची प्रिंट.

• माहे जाने 2024 ते जून 2024 पर्यंतचे महागाई भत्ता फरकाचे विवरणपत्र,

* सेवानिवृत्ती आदेशाची झेरॉक्स प्रत.

• सदर देयक यापूर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

• देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी,

उपरोक्त प्रमाणे मुख्याध्यापकांचे लॉगीन (DDO-1) मधून Claim Entry करून पंचायत समिती अंतर्गत सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांचे लेखाशिर्ष निहाय (शिक्षकांचे वेगळे व केंद्रप्रमुखांचे वेगळे) 7 वा वेतन आयोग फरकाचे स्वतंत्र एकत्र देयक नमुना 26 व महागाई भत्ता फरकाचे स्वतंत्र एकत्र देयक नमुना 26 तयार करून त्यासोबत वरील प्रमाणे सर्व विवरणपत्र व प्रमाणपत्र जोडून पंचायत समिती निहाय खालील नमुन्यातील यादीसह जिल्हा कार्यालयास खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावे.


• Claim सादर करावयाचे वेळापत्रक

कार्यवाही

नियोजीत कालावधी


DDO-1 (मुख्याध्यापक) यांनी DDO-3 कडे Claim फॉरवर्ड करणे

06 ऑगष्ट 2024

हायस्कूल मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी Hard Copy प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती स.ले. अ. यांना सादर करणे

08 ऑगष्ट 2024

हायस्कूल मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी Hard Copy लेखा शाखा शिक्षण विभाग (प्राथमिक) येथे सादर करणे

13 ऑगष्ट 2024

उपरोक्त सुचनेनुसार विहीत कालावधीमध्ये कार्यवाही पूर्ण करावी. सदर बाबतीत विलंब झाल्यास व आपले पंचायत समिती शाळेअंतर्गत एकही शिक्षकांचे देयक प्रलंबीत राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांची राहील.


शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्हा परिषद, बुलडाणा.


वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download 

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.