राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांसाठी बँड कॉम्पिटिशन आयोजित करणेबाबत १. प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई २. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) ३. शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. (सर्व) ४. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
संदर्भ: भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र D. O. No. F. 1-2/2022- Sch.3 दि १२ जुलै २०२४
उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार, महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांतील इयत्ता ९ वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील बैंड कॉम्पिटिशन आयोजित करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, बँडच्या माध्यमातून कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे अशा उद्देशाने या राष्ट्रीय स्तरावरील बँड कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर स्पर्धा राज्यस्तर, झोनल स्तर (राष्ट्रीय उपांत्य), राष्ट्रीयस्तर या ३ स्तरांवर आयोजित करण्यात येणार आहे. सदर स्पर्धा सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना खुली आहे. ज्यामध्ये CBSE, ICSE, KVS, NVS, PM- SHRI, व सैनिकी शाळा सुद्धा समविष्ट होणे अपेक्षित आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई आणि प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांनी आपल्या जिल्ह्यात शिक्षणाधिकारी (माध्य.) व शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांचे सहकार्याने उपरोक्त नमूद सर्व प्रकारच्या सर्व शाळांना याबाबतचे परिपत्रक काढून परिषदेकडील पत्रात दिलेल्या लिंकवर नोंदणी करणे आणि बँडचे व्हिडीओ अपलोड करणे याबाबत सूचित करावयाचे आहे. दि.१ सप्टेंबर २०२४ ही जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम तारीख आहे. आपल्या जिल्ह्यांतील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार
https://forms.gle/QSMIEJH94898YC4T9 या लिंकमध्ये माहिती भरून व मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार पाईप बँडचा विद्यार्थी ग्रुप/विद्यार्थिनी ग्रुप आणि ब्रास बँडचा विद्यार्थी ग्रुप/विद्यार्थिनी ग्रुप अशा ४ प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या एक किंवा प्रत्येक प्रकारातील एक अशा संघाची नोंदणी करून व्हिडीओची लिंक पेस्ट करणे हे
दि.१ सप्टेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत करणे अपेक्षित आहे. (व्हिडीओची लिंक पेस्ट करताना त्याला access देणे महत्त्वाचे आहे.)
यासाठी आपल्या अधिनस्त सर्व कार्यालये व शाळांना याबाबत सविस्तर माहिती कळवून जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतील असे पाहावे, यासाठीची मुदत कोणत्याही कारणासाठी वाढविण्यात येणार नाही याबाबत सर्व शाळांना सूचित करण्यात यावे. बैंड स्पर्धांच्या पुढील स्तरांवरील स्पर्धाच्या सूचना आपणास स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील.
बैंड स्पर्धेच्या आयोजनासंबंधित मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी.
सोबत- १. मार्गदर्शक सूचना
२. संदर्भिय पत्र
मा. संचालक यांचे मान्यतेने
(डॉ. माधुरी सावरकर)
उपसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद महाराष्ट्र, पुणे ३०
परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.
बैंड कॉम्पिटिशन २०२४-२५ मार्गदर्शक सूचना
१. शालेय विद्यार्थ्यांमध्ये एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, बँडच्या माध्यमातून कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे अशा उद्देशाने भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली आणि संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील बैंड कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे.
२. स्पर्धेची पहिली आंतरशालेय फेरी ही राज्यांमध्ये होईल. त्यामधून ४ संघ निवडण्यात येतील. ज्यांना झोनल स्तरावरील स्पर्धेसाठी नोव्हेंबर महिन्यात मध्यप्रदेश येथे उपस्थित राहावे लागेल. आणि झोनल स्तरावरील अंतिम ४ विजेत्या संघांना राष्ट्रीय स्तरासाठी नवी दिल्ली येथे जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून सादरीकरण करावे लागेल.
३. राष्ट्रीय स्तरावर मुले व मुली यांच्यासाठी ग्रुपमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
४. एका शाळेतून एका वेळी जास्तीत जास्त प्रत्येक प्रकारातील एक विद्यार्थ्यांचा बैंड ग्रुप आणि एक विद्यार्थिनींचा बैंड ग्रुप (एकूण४) स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील. परंतू शाळेमध्ये कोणताही एकच ग्रुप असेल तर तो एकच ग्रुप स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकेल. एकदा राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त झाले असेल त्या संघास पुढील ३ वर्षे स्पर्धेत सहभागी होता येणार नाही,
५. बैंड स्पर्धेसाठी २ प्रकार आहेत.
१. पाईप बैंड (यामध्ये सिम्बल असता कामा नये)
२. ब्रास बैंड
(स्कूल बैंड अपेक्षित नाही.)
६. राज्यस्तरावर स्पर्धा प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित केली जाईल. त्यासाठी जिल्हास्तरावरून निवडलेल्या संघांना स्वतंत्ररित्या कळविले जाईल. महाराष्ट्रातून ४ प्रथम क्रमांकांच्या बैंड ग्रुपची नामांकने झोनल (राष्ट्रीय उपांत्य) स्पर्धेसाठी पाठविण्यात येतील. राज्यस्तरावर प्रथम प्रत्येक प्रकारातील एका संघास ट्रॉफी आणि सर्व सहभागी संघांना प्रमाणपत्रे मिळतील. विभागीय स्तरावरील स्पर्धेत सर्व राज्यांमधून एकूण १६ बैंड ग्रुपची निवड केली जाईल. ७. झोनल (राष्ट्रीय उर्पात्य) स्तरावर प्रत्येक प्रकारातील विजयी बैंड संघांना प्रथम पारितोषिक रु. १००००/-, द्वितीय पारितोषिक रु. ७०००/- आणि तृतीय पारितोषिक रु. ५०००/- अशी पारितोषिके आणि प्रमाणपत्रे मिळणार आहेत.
८. या अंतिम विजयी १६ बैंड संघांना नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अंतिम स्पर्धांमध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळेल. ज्यांचे परीक्षण केंद्रीय शिक्षा मंत्रालय यांनी नियुक्त केलेल्या संरक्षण दलातील तज्ज्ञ व्यक्ती करतील.
९. राष्ट्रीय स्तरावर विजयी सर्व १६ बैंड ग्रुपला पुढीलप्रमाणे रोख पारितोषिके दिली जातील, प्रथम पारितोषिक - रु. २१०००/-, द्वितीय पारितोषिक रु. १६०००/- आणि तृतीय पारितोषिक रु. ११०००/- आणि ज्या संघांना पारितोषिक मिळणार नाही त्यांना रु. ३०००/- प्रत्येकी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळेल. तसेच त्यातील प्रत्येक विद्यार्थ्यास राष्ट्रीय स्तराचे प्रमाणपत्र दिले जाईल.
१०. संघांना मिळालेली रोख पारितोषिके ही वैयक्तिकरित्या नसून ती शाळांना असतील, ज्यामधून शाळा बैंड संघाचे सक्षमीकरण (साहित्य खरेदी, दुरुस्ती किंवा संबंधित खर्च) करण्यासाठी खर्च करतील.
११. झोनल स्तरावरील स्पर्धेस जाण्यायेण्याचा खर्च परिषदेकडून दिला जाईल.
१२. राष्ट्रीय स्पर्धांसाठी नवी दिल्ली येथे जाण्यायेण्याचा खर्च, राहणे व भोजन खर्च हा आयोजकांकडून केला जाईल.
स्पर्धेच्या अटी व शर्ती
१. बॅड स्पर्धा ह्या सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांसाठी खुल्या आहेत,
२. बँड ग्रुपमध्ये कोणत्याही व्यावसयिक व्यक्तीचा सहभाग किंवा साथ मान्य करण्यात येणार नाही.
३. बैंड ग्रुपमध्ये २५ ते ३३ विद्यार्थी (ड्रग मेजर धरून) सहभागी होऊ शकतील.
४. बैंड ग्रुप हा फक्त विद्यार्थी किंवा फक्त विद्यार्थिनींचा असावा. एकत्र असू नये.
५. बैंड ग्रुपबरोबर २ साथीदार शिक्षक (बैंड प्रशिक्षकासाहित) जाऊ शकतील.
६. पाईप बैंड ग्रुपमधील वादकांची संख्या पुढीलप्रमाणे असेल. तशीच ब्रास बैंड ग्रुपमधील वादकांची संख्या असावी.
१. पाईप - १२
२. साईड ड्रम्स - ८
३. टेनर ड्रम्स - २
४. बास ड्रग्स - १
५. कंडकटर (लीडर स्टिक) - १
७. बैंड सादरीकरणात कोणतीही देशभक्तीपर गाण्याची धून किंवा शास्त्रीय संगीतातील धून किंवा लोकसंगीतातील धून वाजविणे अपेक्षित आहे. सादरीकरणाचा कालावधी १० ते १५ मिनिटे आहे.
८. राष्ट्रीय गीत वाजविता येणार नाही.
९. बैंड ग्रुपमध्ये कोणतेही बॅनर, सुरी, कुकरी किंवा झेंडा वापरता येणार नाही.
१०. बँडचा पोशाख परिधान करणे गरजेचे आहे.
११. राष्ट्रीय स्तरावरील सादरीकरणासाठी जास्तीत जास्त १० ते १५ मिनिटे वेळ दिला जाईल.
१२. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल, आणि त्याबाबत कोणतेही म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही.
१३. ड्रेस आणि साहित्य (वाद्य), मार्निंग, (Quick March, Slow March) फॉर्मेशन, धून सादरीकरण, सादरीकरणाचा वेळ आणि एकूण परिणाम यासाठी गुण दिले जातील. यासंबंधी जास्त माहिती केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये वाचावी.
स्पर्धेचे वेळापत्रक
१. दि.२५ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत सर्व जिल्ह्यांमधून शाळांनी राज्यस्तरावरील लिंकवर नोंदणी करणे व व्हिडीओ पाठविणे.
२. राज्यस्तर स्पर्धेची तारीख स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
३. दि.१५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यस्तरावरून झोनल (राष्ट्रीय उपांत्य) स्पर्धेसाठी नोंदणी केली जाईल.
४. दि. २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत झोनल (राष्ट्रीय उपांत्य) स्पर्धा होतील.
५. झोनल (उपांत्य) फेरीतील विजेत्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी जानेवारी २०२५ महिन्यात नवी दिल्ली येथे उपस्थित व्हावे लागेल.
बैंड कॉम्पिटिशन २०२३-२४ मार्गदर्शक सूचना
१. शालेय विद्यार्थ्यांमध्ये एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, बँडच्या माध्यमातून कृत्ती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे अशा उद्देशाने भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली आणि संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील बैंड कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे.
२. स्पर्धेची पहिली आंतरशालेय फेरी ही राज्यांमध्ये होईल. त्यानंतर विभागीय स्तरावर स्पर्धा होईल. आणि राष्ट्रीयस्तरासाठी नॅशनल स्टेडीयम, नवी दिल्ली येथे अंतिम ४ विजेत्या संघांना दि. २१ व २२ जानेवारी (अंदाजे) या कालावधीत प्रत्यक्ष उपस्थित राहून सादरीकरण करावे लागेल.
३. राष्ट्रीय स्तरावर मुले व मुली यांच्यासाठी ग्रुपमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
४. एका शाळेतून एका वेळी जास्तीतजास्त प्रत्येक प्रकारातील एक विद्यार्थ्यांचा बैंड ग्रुप आणि एक विद्यार्थिनींचा बैंड ग्रुप (एकूण४) स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील. परंतू शाळेमध्ये कोणताही एकच ग्रुप असेल तर तो एकच ग्रुप स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकेल.
५. बैंड स्पर्धेसाठी २ प्रकार आहेत.
१. पाईप बैंड (यामध्ये सिम्बल असता कामा नये)
२. ब्रास बैंड
६. राज्यस्तरावर स्पर्धा प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित केली जाईल. त्यासाठी जिल्हास्तरावरून निवडलेल्या संघांना स्वतंत्ररीत्या कळविले जाईल. महाराष्ट्रातून ४ प्रथम क्रमांकांच्या बैंड ग्रुपची नामांकने विभागीय (राष्ट्रीय उपांत्य) स्पर्धेसाठी पाठविण्यात येतील. राज्यस्तरावर प्रथम प्रत्येक प्रकारातील एका संघास ट्रॉफी आणि सर्व सहभागी संघांना प्रमाणपत्रे मिळतील. विभागीय स्तरावरील स्पर्धेत सर्व राज्यांमधून एकूण १६ बैंड ग्रुपची निवड केली जाईल.
७. विभागीय (राष्ट्रीय उपांत्य) स्तरावर प्रत्येक प्रकारातील विजयी बैंड संघांना प्रथम पारितोषिक - रु. १००००/-, द्वितीय पारितोषिक रु. ७०००/- आणि तृतीय पारितोषिक रु. ५०००/- अशी पारितोषिके आणि प्रमाणपत्रे मिळणार आहेत.
८. या अंतिम विजयी १६ बैंड संघांना नॅशनल स्टेडीयम, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अंतिम स्पर्धामध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळेल, ज्यांचे परीक्षण केंद्रीय शिक्षा मंत्रालय यांनी नियुक्त केलेल्या संरक्षण दलातील तज्ज्ञ व्यक्ती करतील.
९. राष्ट्रीय स्तरावर विजयी सर्व १६ बैंड ग्रुपला पुढीलप्रमाणे रोख पारितोषिके दिली जातील. प्रथम पारितोषिक रु. २१०००/-, द्वितीय पारितोषिक रु. १६०००/- आणि तृतीय पारितोषिक रु. ११०००/- आणि ज्या संघांना पारितोषिक मिळणार नाही त्यांना रु. ३०००/- प्रत्येकी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळेल. तसेच त्यातील प्रत्येक विद्यार्थ्यास राष्ट्रीय स्तराचे प्रमाणपत्र दिले जाईल.
१०. संघांना मिळालेली रोख पारितोषिके ही वैयक्तिकरित्या नसून ती शाळांना असतील, ज्यामधून शाळा बैंड संघाचे सक्षमीकरण (साहित्य खरेदी, दुरुस्ती किंवा संबंधित खर्च) करण्यासाठी खर्च करतील.
११. राष्ट्रीय स्पर्धांसाठी नवी दिल्ली येथे जाण्यायेण्याचा खर्च, राहणे व भोजन खर्च हा आयोजकांकडून केला जाईल.
स्पर्धेच्या अटी व शर्ती
१. बैंड स्पर्धा ह्या सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांसाठी खुल्या आहेत.
२. बैंड ग्रुपमध्ये कोणत्याही व्यावसयिक व्यक्तीचा सहभाग किंवा साथ मान्य करण्यात येणार नाही.
३. बैंड ग्रुपमध्ये २५ ते ३३ विद्यार्थी (ड्रम मेजर धरून सहभागी होऊ शकतील,
४. बैंड ग्रुपबरोबर २ साथीदार शिक्षक (बैंड प्रशिक्षकासाहित) जाऊ शकतील.
५. पाईप बैंड ग्रुपमधील वादकांची संख्या पुढीलप्रमाणे असेल. तशीच ब्रास बैंड ग्रुपमधील वादकांची संख्या असावी.
१. पाईप - १२
२. साईड ड्रम्स - ८
३. टेनर ड्रम्स २
४. बास ड्रम्स - १
५. कंडक्टर (लीडर स्टिक)- १
६. बैंड सादरीकरणात कोणतीही देशभक्तीपर गाण्याची धून किंवा शास्त्रीय संगीतातील धून किंवा लोकसंगीतातील धून वाजविणे अपेक्षित आहे. सादरीकरणाचा कालावधी १० ते १५ मिनिटे आहे.
७. राष्ट्रीय गीत वाजविता येणार नाही.
८. बँड ग्रुपमध्ये कोणतेही बॅनर, सुरी, कुकरी किंवा झेंडा वापरता येणार नाही.
९. बँडचा पोशाख परिधान करणे गरजेचे आहे.
१०. सादरीकरणासाठी येणे व जाणे हा वेळ धरून जास्तीत जास्त ९ मिनिटे वेळ दिला जाईल.
११. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल. आणि त्याबाबत कोणतेही म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही.
१२. ड्रेस आणि साहित्य (वाद्य), मार्निंग, फोर्मेशन, धून सादरीकरण, सादरीकरणाचा वेळ आणि एकूण परिणाम यासाठी गुण दिले जातील.
१३. वेळापत्रक
१. दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी पर्यंत सर्व जिल्ह्यांमधून शाळांनी राज्यस्तरावरील लिंकवर नोंदणी करणे व व्हिडीओ पाठविणे.
२. राज्यस्तर स्पर्धेची तारीख स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
३. दि.२० नोव्हेंबर २०२३ पर्यंत राज्यस्तरावरून विभागीय (राष्ट्रीय उपांत्य) स्पर्धेसाठी नोंदणी केली जाईल.
४. दि. ५ डिसेंबर २०२३ पर्यंत विभागीय (राष्ट्रीय उपांत्य) स्पर्धा होतील.
५. विभागीय (उपांत्य) फेरीतील विजेत्या स्पर्धकांना दि. २० जानेवारी २०२४ रोजी नवी दिल्ली येथे उपस्थित व्हावे लागेल.
६. राष्ट्रीय स्तर अंतिम स्पर्धा आणि नॅशनल स्टेडीयम, नवी दिल्ली येथे सादरीकरण दि. २१ व २२ जानेवारी २०२४ या कालावधीत असेल.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments