Teachers Recruitment Update - राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत सुधारणा? शासन आदेश

 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास गट गठीत करणे बाबत शासनाने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


प्रस्तावनाः

सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. परंतु शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्हयात काम करावे लागते. तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत असते. तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शुन्य सेवाजेष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते. यास्तव शिक्षकांना स्वतः च्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करुन देणे आवश्यक आहे. जेणेकरुन, विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन, शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निश्चितच मदत होईल, या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करुन जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करुन शिक्षक भरतीची उचित कार्यपध्दती सूचविण्याकरीता एक अभ्यास गट नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे:


शासन निर्णयः

राज्यात जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपध्दती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे अभ्यास गट गठीत करण्यात येत आहे:-


१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे

अध्यक्ष

२. उपसचिव (शिक्षक व शिक्षकेत्तर), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

:- सदस्य

३. संबधित उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई

:- सदस्य

. संबधित उपसचिव, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई ४

:- सदस्य

५. संबधित उपसचिव, ग्राम विकास व पंचायत राज विभाग, मंत्रालय, मुंबई 

६. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

:- सदस्य

७. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

:- सदस्य सचिव

आयुक्त, शिक्षण यांना सदर अभ्यासगटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांचा समावेश करण्याचे अधिकार असतील.

०२. समितीची कार्यकक्षाः-

प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करुन विभाग वा जिल्हा स्तरावर शिक्षक भरतीकरीता आयुक्त (शिक्षण) यांनी सूचविलेल्या पर्यायांचा अभ्यास करुन सुयोग्य कार्यपध्दतीची शिफारस करणे.


०३. कालावधी :-

अभ्यास गटाने आपला अहवाल १ महिन्यात शासनास सादर करावा.


०४ खर्चासाठी तरतूद :-

सदर अभ्यास गटाच्या सदस्याला कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या आस्थापनेच्या तरतुदीतून भागवावा.

०५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०८२०१६१०२६८६२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(तुषार महाजन)

उप सचिव, महाराष्ट्र राज्य


 वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.