राज्यातील सर्व सरकारी शाळांना सुरक्षेसाठी होमगार्ड मिळणार?

 महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रका नुसार विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांना विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरु होण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी होमगार्ड यांची सेवा राज्यातील सर्व शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका) शाळांत उपलब्ध करुन देण्याविषयी निर्णय घेण्याबाबत  पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

संदर्भः


१. मा. शिक्षण आयुक्तालय यांचे पत्र क्र. आस्था-अ/टे.क्र.१०६/प्राथ/ २०२२/२०८७, दि. ०८/०४/२०२२.

२. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.३९/एसडी-४, दि. ०६/०४/२०२२. उपरोक्त संदर्भिय पत्रांचे कृपया अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न).

मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली दि. ०४/०४/२०२२ रोजी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत शालेय विद्यर्थ्यांना सुरक्षा पुरविण्यकरिता शाळा सुरु होण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी किंवा दिवसभर शाळेत पूर्ण वेळासाठी होमगार्डची मदत घेता येईल असे मा. प्रधान सचिव यांनी सूचित केले.

त्यास सुनसरुन राज्यातील सर्व शासकिय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका) शाळांना प्रत्यक्षात किती होमगार्डची आवश्यकता आहे ते तपासून विस्तृत माहिती संचालनालयास त्वरीत दिलेल्या प्रपत्र अ व प्रपत्र व मध्ये सादर करावी.


(दिनकर टेमकर)

संचालक, 

प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे १.


प्रत- मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१, यांना माहितीस्तव सविनय सादर. प्रत योग्य त्या कार्यवाहीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. सर्व



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.