राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कार्यालयातून दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व व उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरणे मुंबई यांना SCERT च्या संचालकांनी समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रम सन २०२४-२५ साठी मागविण्यात आलेल्या साहित्य पाठविण्यासाठीच्या कलावधीतील वाढीबाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
संदर्भ : १. समग्र शिक्षा PAB केंद्रीय प्रकल्प मान्यता मंडळाचे सन २०२४-२५ चे इतिवृत्त दि.१/०३/२०२४
२. जीवन शिक्षण मासिकासंदर्भातील बैठक दि.२६/०६/२०२४
३. मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांनी HPC कार्यशाळेत सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना दि.२८/६/२०२४ ४. जा.क्र. राशैसंवप्रपम/प्रमा/ग्रंथालय उपक्रम/०३३५२ दि.१०/०७/२०२४
५. जा.क्र. राशैसंवप्रपम/प्रमा/ग्रंथालय उपक्रम/०३९६४ दि.२३/०८/२०२४ ६. शिक्षक भारती, जिल्हाध्यक्ष, धाराशिव यांचे पत्र दि. १८/०८/२०२४
७. राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य, हिंगोली या कार्यालयाचे पत्र दि.१८/०८/२०२४
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सन २०२४-२५ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रमासाठी विविध विषयानुसार/स्तरानुसार पुस्तकांची निर्मिती करून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विविध माध्यमांच्या शाळांना पुस्तके वितरीत करण्याचे प्रस्तावित आहे.
संदर्भ क्र. ५ नुसार आपल्या कार्यालयाकडे जमा करण्यात आलेले सर्व साहित्य १५ सप्टेंबर, २०२४ पूर्वी प्रसारमाध्यम विभाग, प्रस्तुत कार्यालयाकडे हस्तेपोहोच पाठविण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या परंतु संदर्भ क्र. ६ व ७ अन्वये पुस्तक स्वीकार करण्याबाबत एक महिन्याची मुदत वाढ मिळण्याबाबत मागणीचे पत्र प्राप्त झाले आहे.
संदर्भ क्र.४ नुसार समग्र शिक्षा सन २०२४-२५ अंतर्गत ग्रंथालय पुस्तक निर्मिती आढावा सर्व जिल्ह्यांनी प्रस्तुत उपक्रमासाठी Google Sheet वर दि. २८ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अद्यावत केलेली पुस्तकांची संख्या २०५ इतकीच आहे तथापि ही संख्या अल्पप्रमाणात असल्यामुळे तसेच पुस्तक स्वीकार करण्याबाबत महिन्याची मुदतीत वाढ मिळण्याबाबतची मागणी या दोन्ही गोष्टी विचारात घेता दि. ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत आपल्या जिल्ह्याचे सर्व साहित्य जमा करून दि. १५ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत निवड प्रक्रिया राबवून प्रसारमाध्यम प्रस्तुत कार्यालयाकडे हस्तेपोहोच पाठवावे.
राहुल रेखावार, (भा.प्र.से.)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर :
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments