शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याबाबत व त्यासाठी असलेल्या मुदतीबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत
वाचा :
१. शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. आरटीई २०१०/प्र.क्र.५७२/प्राशि-१. दि.१३.०२.२०१३.
२. शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१५/प्र.क्र.३०३/टिएनटि-१, दि.२०.०१.२०१६.
३. ग्राम विकास विभागाचे पत्र क्र. अकपा २०२१/ प्र.क्र.२४८/आस्था-१४, दि.११.१०.२०२२.
४. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१५/प्र.क्र.३०३/टिएनटि-१, दि.०२.०९.२०२४.
शासन शुध्दीपत्रकः-
उक्त संदर्भाधीन शासन निर्णय दि.०२.०९.२०२४ मधील परिच्छेद क्र.२ मधील तीन वर्षाच्या कालावधीत" याऐवजी "पाच वर्षाच्या कालावधीत", परिच्छेद क्र. ३ मधील ३ वर्षाच्या आत" याऐवजी "पाच वर्षाच्या कालावधीत" व परिच्छेद क्र.४ मधील "तीन वर्षाच्या कालावधीनंतर" याऐवजी "पाच वर्षाच्या कालावधीनंतर" असे वाचण्यात यावे.
०२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०९२३१६०९३७९४२१ असा आहे.
हे शासन शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र राज्य
प्रत,
१) मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई..
२) मा. सभापती / उपसभापती महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
३) मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
४) मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
प्रस्तावना -
केंद्र शासनाने दिनांक ३१.०३.२०१० च्या अधिसूचनेव्दारे शिक्षक पदांवर नियुक्तीसाठी पात्रता व सेवाशर्ती ठरविण्याकरीता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने दिनांक २३ ऑगस्ट, २०१० च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरीता (इ.१ ली ते इ.८ वी) किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक १३.०२.२०१३ व शुद्धिपत्रक दिनांक ०६.०३.२०१३ द्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांकरीता (इ.१ ली ते इ.८ वी) शिक्षकांची किमान व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासनाद्वारे घेण्यात येत असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. शासन निर्णय दिनांक २०.०१.२०१६ अन्वये अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या अर्हतेशी विसंगत आहे. यास्तव अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याबाबतची तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय -
अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे तरतूदी करण्यात येत आहेतः-
१. शासन निर्णय दि.२०.०१.२०१६ मधील परिच्छेद क्र. ३ मधील "मात्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व केंद्रिय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यांस सवलत राहील" हा मजकूर वगळण्यात येत आहे.
२. शासन निर्णय दिनांक १३.०२.२०१३ अन्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने, शासन निर्णय दिनांक २०.०१.२०१६ अन्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी देण्यात आला आहे, अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (TET) वा केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण झालेले नाहीत, अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत धारण करावी.
३. ग्राम विकास विभागाच्या संदर्भाधीन दि.११.१०.२०२२ च्या पत्रान्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. तथापि, शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेली आहे. परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ आयडी दिलेला नाही, अशा उमेदवारांना देखील ३ वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता धारण करण्याच्या अटीवर अनुकंपा तत्वावर मान्यता/शालार्थ आयडी देण्यात यावा.
४. तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET) किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) ही अर्हता धारण करु शकणार नाहीत, अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी. तथापि, अशी नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देणेबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी. अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता. सदर प्रवर्गात ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहील.
०२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०९०२१८३७०८०३२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत,
१) मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई,
२) मा. सभापती/ उपसभापती महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई. ) मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई. ३
४) मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
५) मा मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
आदिवासी विकास विभागात विशेष भरती प्रक्रीयेद्वारे नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
प्रस्तावना:-
आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या आश्रमशाळा दुर्गम, अतिदुर्गम व डोंगराळ भागात असून, अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर पदे रिक्त राहत होती. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता, सदरहू पदे स्थानिक उमेदवारांमधून तासिका / रोजंदारी तत्वावर भरण्यात येत होती. सबब, दुर्गम आदिवासी भागातील आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने मा. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने विभागाच्या दिनांक ०१/१२/२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये विशेष भरती प्रक्रीया राबविण्यात आली होती. सदर विशेष भरती प्रक्रीयेद्वारे अगोदरच शासकीय आश्रमशाळेमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून तासिका तत्वावर शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या उमेदवारांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाल्यास, अशा उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण करण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी देण्यात आला होता.
२. सदर विशेष भरती प्रक्रीयेद्वारे निवड झालेल्या प्राथमिक शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण होण्यासाठीची ३ वर्षांची मुदत माहे जुलै-ऑगस्ट, २०२२ मध्ये संपुष्टात आली आहे. तथापि, राज्यात उद्भवलेल्या कोविड-१९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सन २०२० मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (TET) झाली नाही. सन २०२०- २०२२ या कालावधीत केवळ दोन वेळाच शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आयोजित करण्यात आली होती. सबब, सदरहू भरती प्रक्रीयेद्वारे निवड झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण होण्यासाठी पुरेशा संधी न मिळाल्याने, अशा प्राथमिक शिक्षकांना TET/CTET उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दिनांक ०१/१२/२०१८ अन्वये राबविण्यात आलेल्या विशेष भरती प्रक्रीयेद्वारे नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षक पात्रता परीक्षेसंबंधी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
१ ) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दिनांक ०१/१२/२०१८ अन्वये राबविण्यात आलेल्या विशेष भरती प्रक्रीयेद्वारे नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण होण्यासाठी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन वर्षे मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून पुढील अनुज्ञेय सेवाविषयक लाभ देण्यात यावेत.
२) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दिनांक ०१/१२/२०१८ अन्वये देण्यात आलेली मुदत संपुष्टात आल्यांनतर व सदरची मुतदवाढ देण्यापूर्वी, दरम्यानच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण केल्याच्या दिनांकापासून पुढील अनुज्ञेय सेवाविषयक लाभ देण्यात यावेत.
३) सदर मुदतवाढ केवळ एक वेळची बाब म्हणून देण्यात येत आहे. यापुढे अशा प्रकारची कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. सदर मुदतवाढीनंतरही शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण न केलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात.
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आला असून, त्याचा संगणक क्रमांक २०२४०८२०११५९५७००२४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(पवनकुमार बंडगर)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.
प्रति,
१) मा. राज्यपाल यांचे सचिव
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments