राज्यातील जिल्हा परिषद वेळ शासन आदेशानुसार शनिवारी नऊ वाजता किंवा नऊ वाजेनंतर न भरता पूर्वीप्रमाणे?

शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अकोला कार्यालयातून दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित आदेशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा सकाळ सत्रात घेणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळा दर शनिवारी सकाळी ९ वाजे नंतर भरविण्याबाबत निर्देशीत करण्यात आले होते.

परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्हा परिषद अकोला शिक्षण समिती तसेच जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आलेल्या ठरावा नुसार या आदेशापासून जिल्हा परिषद अकोला अंतर्गत असलेल्या सर्व जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा दर शनिवारी तसेच संदर्भ क्रमांक ०५ मध्ये निश्चित केल्यानुसार शाळा पूर्वी प्रमाणे सकाळी ७ ते सकाळी ११.२०. वाजे पर्यंत घेणे बाबत संदर्भ क्र.१ मधील शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक ३ मधील अ.ब.व क. मध्ये दिलेल्या निर्देशानुसार येणाऱ्या शनिवार पासून सकाळ सत्रातील शाळा पूर्वी प्रमाणे घेण्यासाठी आदेशीत करण्यात येत आहे. करिता आपल्या स्तरावरून जिल्हा परिषद अकोला व्यवस्थापनाच्या शाळांना अवगत करून अहवाल या कार्यालयास तत्काळ उलट टपाली सादर करावा.


(रतनसिंग रा. पवार) 

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

 जिल्हा परिषद, अकोला.


प्रतिलिपी :-

१) मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद अकोला यांना माहितीस्तव सविनय सादर.

२) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय म.रा. पुणे-१ यांना माहितीस्तव सविनय सादर. ४

३) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अकोला यांना माहितीस्तव सविनय सादर.

४) मा. शिक्षण सभापती जि.प. अकोला यांना माहितीस्तव सविनय सादर.

५) मा. शिक्षण उप संचालक अमरावती विभाग अमरावती यांना माहितीस्तव सविनय सादर.

६) मा. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोला यांना माहितीस्तव सविनय सादर.

७) मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक / योजना) जि.प. अकोला यांना माहितीस्तव.


इतर जिल्ह्यातही वरील प्रमाणे शिक्षण समितीचा ठराव घेऊन शाळेची वेळ पूर्ववत करण्यात येऊ शकते. 


 राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती यांनी दिनांक 19 जून 2024 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

संदर्भ : १) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२४/प्रक्र२७/ एसडी-४ मंत्रालय, मुंबई दि.०८ फेब्रुवारी २०२४


२) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, पुणे यांचे दिनांक १९/०६/२०२४ रोजी चे व्ही. सी. मधील निर्देश. उपरोक्त विषयान्वये संदर्भीय शासन परिपत्रकातील निर्देशांची अंमलबजावणी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून


करणेबाबत अमरावती जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळा मुख्याध्यापकांना कळविण्यात यावे, शासन परिपत्रकातील मुद्यांच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.


१) जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याची वेळ सकाळी ०९ वाजता अगोदरची आहे. त्या शाळांनी नवीन येणार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंत


वर्ग भरवण्याची वेळ सकाळी ०९ किया ०९ नंतरची निश्चित करायी व केलेल्या कार्यवाहीबाबत शाळा मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी मनपा, प्रशासन अधिकारी न.प./ न.पा. यांना लेखी कळवावे.


२) शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन व अध्यापनाच्या निश्चित केलेला कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी.


३) ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदी शक्य होत नसेल त्यांनी त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी गशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी मनपा, प्रशासन अधिकारी न.प./न.पा. यांचेकडे अर्ज योग्य कारण नमूद करून आवश्यक पुरावा दर्शक दस्तऐवजासह सादर करावा, सदर प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी मनपा, प्रशासन अधिकारी न.प./न.पा.यांनी प्रत्यक्ष शहानिशा/पडताळणी करून आपल्या अभिप्नायासह शिक्षणाधिकारी (प्राथ) कार्यालय जि.प. अमरावती यांचेकडे संबंधित व्यवस्थापनाने अर्ज दिनांक २६/०६/२०२४ पर्यंत शाळा सुरू होण्यापूर्वी सादर करावे.


४) संबंधित व्यवस्थापनाच्या अर्जाच्या अनुषंगाने जिल्हा कार्यालयाचे लेखी मार्गदर्शन मिळाल्यानंतरच संबंधित शाळेने त्याप्रमाणे कार्यवाही करावी.


५) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा शनिवारी / आठवड्यातून एक दिवस सकाळी भरत असतील त्यांचेही शाळेच्या वेळेत बदल करून सकाळी ०९ किंवा ०९ नंतर भरविण्यात याव्या.

वरील सूचनांचे व संदर्भीय शासन परिपत्रकातील सूचनांचे पालन जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा करतील याबाबतची दक्षता आपण सर्वानी घ्यावी.


सहपत्र संदर्भ क्र. १ ची प्रत


(बुद्धभूषण सोनोने)

 शिक्षणाधिकारी (प्राथ) 

जिल्हा परिषद, अमरावती




अर्थात वरील शिक्षणाधिकारी यांचा आदेश हा अमरावती जिल्ह्याचा असला तरी संदर्भित शासन आदेशानुसार इतर जिल्ह्यात सुद्धा शनिवारची शाळा नऊ वाजता किंवा नऊ वाजेनंतर भरवण्याबाबत आदेश संबंधित शिक्षणाधिकारी देऊ शकतात.. 

संदर्भित शासन आदेशासह वरील आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.