शिक्षण आयुक्तालयातील दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार पवित्र प्रणालींतर्गत नव्यने रुजू झालेलया शिक्षकांना शिक्षण सेवक ऐवजी शिक्षक पदी रूजू करुन घेण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
-१. आपले पत्र क्र. शिउसं/उमाशि/८१४०/२०२२ दि.२२/०९/२०२२
२. शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१०/(२७७/१०)/माशि-२ दिनांक १५/०९/२०११
३. शासन पत्र क्रमांक वेतन-१२२१/प्रक्र १०/टिएनटी-३ दिनांक २५/०६/२०२१
उपरोक्त संदर्भाधिन विषयान्वये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीअंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांपैकी कांही उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्था अथवा शासन अनुदानित पदांवर शिक्षक पदी कार्यरत होते, त्यामुळे त्यांचे यापुर्वीच शालार्थ प्रणालीमध्ये शालार्थ आयडी उपलब्ध आहेत. अशा शिक्षक कर्मचारी यांना संदर्भ क्रमांक ३ मध्ये नमूद केल्यानुसार संदर्भीय क्रमांक २ वरील शासन निर्णय दिनांक १५/०९/२०११ मधील अट क्रमांक १ व २ ची पुर्तता होत असल्यास त्यांना पुन्हा शिक्षण सेवक योजना लागू न करता रुजू झलेल्या पदांच्या वेतनश्रेणीतील मुळ वेतन (आरंभीचे वेतन) देण्यात यावे, कोणत्याही परिस्थितीत सद्यस्थितीत त्यांच्या चालू असलेल्या वेतनास संरक्षण देण्यात येवू नये. याबाबतचे आदेश प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या बाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचारी यांच्याबाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी निर्गमित करावेत.
वरील प्रमाणे आदेश निर्गमित केल्यानंतर अशा शिक्षक कर्मचारी यांना नव्याने शालार्थ आयडी न देता यापुर्वीच्या शाळेतून डिटॅच करुन नवीन शाळेच्या शालार्थ लॉगीनमध्ये अटॅच करण्याची कार्यवाही संबंधित वेतन पथक कार्यालयाने करावी.
(डॉ. श्रीराम पामझाडे)
शिक्षण सहसंचालक
म.रा.पुणे-१
प्रतिलिपी :
कक्ष अधिकारी, (टिएनटी-३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ यांना माहितीस्तव
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग
२ . शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक सर्व जिल्हे
३. शिक्षण निरिक्षक, (पश्चिम/उत्तर/दक्षिण) बृहन्मुंबई
४. अधीक्षक, पथक वेतन व भविष्या निर्वाह निधी /- (प्राथमिक/माध्यमिक) सर्व जिल्हे
यांना आवश्यक त्या कार्यवाहीसाठी माहितीसाठी
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments