Seventh Pay Installment New Update - NPS, DCPS खाते नाही अश्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते रोखीने? आदेश

NPS, DCPS खाते नाही अश्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते रोखीने देण्याबाबत दिनांक : १६.०८.२०२४ चा शालेय शिक्षण विभागाचा आदेश पुढील प्रमाणे. 


संदर्भ:- १) शासन निर्णय क्रमांक वेतन-१२१९/प्र.क्र.१०५/टिएनटी-३, दिनांक १०.०१.२०२०

२) मा.माजी वि.प.स. श्रीकांत देशपांडे यांचे दिनांक १९.०२.२०२४ रोजीचे पत्र

उपरोक्त विषयावरील मा. माजी वि.प.स. श्रीकांत देशपांडे यांचे दिनांक १९.०२.२०२४ रोजीच्या पत्रान्वये NPS, DCPS खाते नाही अश्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते रोखीने देण्याबाबत विनंती केली आहे.


२. सन २००५ पूर्वी विनाअनुदान / अंशतः अनुदान तत्वावर कार्यरत असलेले परंतु सन २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना (DCPS) / राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS) लागू असून यापैकी काही शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांनी तांत्रिक अडचणींमुळे राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे ((NPS) खाते उघडले नसल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना खाते / परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना खाते नसल्याने शासन निर्णय दिनांक १०.०१.२०२० मधील तरतुदीनुसार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करता येत नाही. तथापि, ज्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांनी राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे ((NPS) खाते उघडले नाहीत व ते सेवानिवृत्त झालेले आहेत फक्त अशा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते रोखीने देण्यात यावे.


कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन






 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 12 जुलै 2024 रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) २. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व ३. अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (प्राथमिक) सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


संदर्भ :- १.शा.नि. वेपूर-२०१९/प्र.क्र.८/सेवा-९ दिनांक २०/०६/२०२४


२. शासनपत्र क्रमांक वेतन१२१९/प्र.क्र.१०५/टीएनटी-३ दि.११ जुलै, २०२४ उपरोक्त विषयान्वये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत कर्मचारी यांना १ जुलै, २०२३ रोजी देय असलेल्या सातवा वेतन आयोग थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करणेबाबत शासन निर्णय वित्त विभाग वेपूर/२०१९/प्र.क्र.८/सेवा-९ दि.२०.६.२०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शासन अनुदानित शाळा, महानगरपालिका/नपा/नप/कटकमंडळे सर्व शासन अनुदानित संस्थामधील पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत वेतन धारकांना थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून-२०२४ च्या वेतन/निवृती वेतन सोबत अदा करावे असे नमूद आहे. तथापि, थकबाकीच्या रक्कमेच्या प्रदानासंबंधी संदर्भिय शासन निर्णयातील वाचा क्रं. १ ते ५ येथील शासन आदेशातील अन्य तरतूदीचे पालन करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत.

संदर्भिय शासन निर्णयातील क्रं.२,३ व ४ अन्वये ही तरतूद योग्य त्या फरकासह जिल्हा परिष्दा व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थाना लागू राहील असे नमूद आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरुन मान्यताप्राप्त १०० टक्के खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा, जि.प शाळा मधील सेवानिवृत शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सन २०२४-२५ मध्ये ७ वा वेतन आयोग ५ वा हप्ता अदा करणेसाठी पर्याप्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सदयस्थितीत मंजूर अनुदानाच्या ४२ टक्के अनुदान माहे जुलै, २०२४ अखेरच्या खर्चासाठी शासन परिपत्रक वित्त विभाग अर्थसं २०२४/प्र.क्र.३४/अर्थ- ३ दि.१.४.२०२४ नुसार वितरीत करण्यात आले असून प्राप्त अनुदानातून माहे जुले, २०२४ अखेरपर्यतचे नियमित वेतन अदा करणे क्रमप्राप्त असल्याने नियमित वेतन अदा करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.


क्षेत्रिय स्तरावरुन सन २०२४-२५ मधील खर्चाची बाब निहाय माहिती संकलित करण्यात आली असून त्यानुसार लेखाशीर्ष - २२०२००४८,२२०२०१७३-३६/०४, २२०२०१८२, २२०२३७०८, २२०२०२०८-३६/०४ २२०२३२६१ मध्ये वेतन घेणा-या कर्मचारी यांचे माहे जुलै, २०२४ चे वेतन सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता व काही कारणास्तव राहिलेला १,२,३ व ४ चा हप्तासह अदा करणे शक्य असल्याने उपरोक्त लेखाशीर्षामध्ये वेतन घेणा-या पात्र कर्मचारी यांचे माहे जुलै, २०२४ चे वेतन सातवा वेतन आयोगाच्या हात्यासह उपलब्ध करुन दिलेल्या अनुदानातून अदा करावे. कोणत्याही परिस्थितीत निर्यामत वेतन प्रर्लोबत राहणारी याची दक्षता घ्यावी.

लेखाशीर्ष २२०२००४८,२२०२०१७३-३६/०४, २२०२०१८२, २२०२३७०८, २२०२०२०८-३६/०४ २२०२३२६१ मध्ये प्राप्त अनुदानातून नियमित वेतनाचा खर्च प्राधान्यक्रमाने भार्गावणे क्रमप्राप्त असल्याने अनुदान स्थितीनुसार किंवा अनुदान उपलब्धतेनुसार सातवा वेतन आयोग फरकाच्या हप्त्याबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील.


शरद गोसावी

शिक्षण संचालक प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे-०१


प्रत माहितीस्तव सविनय सादरः-

१. मा. उपसचिव, टीएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

२. मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे


संपूर्ण परिपत्रक पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक कर. 

Download


शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 11 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता माहे जुलै 2024 च्या वेतनासोबत अदा करणे बाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


राज्य शासकीय व ईतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना दि.०१ जूलै २०२३ रोजी देय असलेल्या सातवा वेतन आयोग थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करणे बाबत शासन निर्णय वित्त विभाग वेपुर/२०१९/प्र.क्र.०८/सेवा-९ दि.२०/०६/२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. त्या नुसार जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा, सर्व शासन अनुदानित संस्थिा मधील पात्र कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारकांना थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून २०२४ च्या वेतन/ निवृत्ती वेतनासोबत अदा करावे असे नमूद आहे. तथापि थकबाकीच्या रक्कमेच्या प्रदानासंबधी संदर्भिय शासन निर्णयातील वाचा क.०१ ते ०५ येथिल शासन आदेशातील अन्य ततूदीचे पालन करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत.

संदर्भिय शासन निर्णयातील संदर्भ क्र.०२ ०३ व ०४ अन्वये ही तरतूद योग्य योग्य त्या फेरफारासह जिल्हा परिषदा व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थानां लागू राहिल असे नमूद आहे.

माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून मान्यताप्राप्त १०० टक्के खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सन २०२४-२५ मध्ये ७ वा वेतन आयोग ०५ वा हप्ता अदा करणेसाठी पर्याप्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सद्यास्थितीत मंजूर अनुदानाच्या ४२ टक्के अनुदान माहे जूलै अखेरच्या खर्चासाठी शासन परिपत्रक वित्त विभाग अर्थसं २०२४/प्र.क्र-३४/अर्थ- ०३/दि.०१/०४/२४ नुसार वितरीत करण्यात आले असून प्राप्त अनुदानातून माहे जुलै अखेरपयर्तचे नियमित वेतन अदा करणे क्रमप्राप्त असल्याने नियमित वेतन अदा करणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. क्षेत्रिय स्तरावरून सन २०२४-२५ मधील खर्चाची बाब निहाय माहिती संकलित करण्यात आली असून त्यानुसार लेखाशिर्ष२२०२०४४२,२२०२०४७८,२२०२३३७९,२२०२०५७६,२२०२०५४९,२२०२०५३१, २२०२०५५८,

E:\tandale 24-25\corrospondance 24-25\to dyde EO and other.docx

२२०२०४६९,२२०२०५०२, मध्ये वेतन घेणा-या कर्मचारी यांचे माहे जूले २०२४ चे वेतन सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता व काही कारणास्तव राहिलेला १,२,३,४ था हप्ता सह अदा करणे शक्य असल्याने उपरोक्त लेखाशिर्षमध्ये वेतन घेण्या-या पात्र कर्मचारी यांचे माहे जूलै-२४ चे वेतन सातवा वेतन आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून अदा करण्यात यावे कोणत्याही परिस्थितीत नियमित वेतन प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

लेखाशिर्ष २२०२३३६१,२२०२०५११,२२०२१९०१,२२०२१९४८,२२०२एच९७३ मध्ये प्राप्त अनुदानातून नियमित वेतनाचा खर्च प्राधान्य क्रमाणे भागविणे क्रमप्राप्त असल्याने अनुदान स्थितीनुसार किंवा अनुदान उपलब्धतेनुसार ७ वा वेतन आयोग फरकाच्या हप्त्याबाबत स्वंतत्र सूचना देण्यात येतील.


(दिपक चवणे)

शिक्षण उपसंचालक (अं. व नि)

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)


प्रत -१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-०१ यांना माहितीस्तव सविनय सादर.

. विभागीय शिक्षण उपसंचालक संबधित सर्व २ ३

. मुख्य लेखा व वित्त अधिकारी संबधित सर्व



वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.