शासकीय कामकाजात संदेस (Sandes) इन्स्टंट मेसेजिंग ॲपचा वापर करण्याबाबत शासन आदेश डाऊनलोड लिंक मार्गदर्शिका.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 26 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या एका शासन आदेशानुसार शासकीय कामकाजात संदेस (Sandes) इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना निर्मिती केल्या आहेत. 

शासकीय कामकाजामध्ये सध्या व्हाट्सअप या डायरेक्ट मेसेजिंग ॲप्स चा वापर केला जातो परंतु व्हाट्सअप न वापरता संदेस इन्स्टंट मेसेजिंग ॲप चा वापर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय निर्गमित करून त्याबाबत अधिकची माहिती दिली आहे. 


संदेश ॲप डाऊनलोड लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.gimkerala

संदेश ॲप कसे वापरावे यासाठी मार्गदर्शिका. 

Download



प्रस्तावना-

केंद्र शासन आणि राज्य शासन, शासकीय कार्यालये व स्थानिक संस्थांमध्ये हजारो संदेश आणि संप्रेषणांची देवाणघेवाण होते. हे संदेश प्रामुख्याने मजकूर स्वरूपात असले तरी, ऑडिओ/व्हिडिओ क्लिप आणि नस्ती इत्यादींमधील माहितीचीदेखील सुरक्षितपणे देवाणघेवाण होत असते. संदेस अॅप हे डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक उपक्रम असून शासन ते शासन-G २G (Govt to Govt.) आणि शासन ते नागरिक G२C (Govt.to Citizen) संप्रेषण/संदेश सुलभ करण्यासाठी मुक्त स्रोत आधारित, सुरक्षित आणि स्वदेशी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म देणारी प्रणाली आहे. संदेस ही सुरक्षितपणे शासकीय पायाभूत सुविधांवर आधारित प्रणाली आहे, तिचे धोरणात्मक नियंत्रण शासनाकडे आहे. संदेस अॅप हे गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर कोणालाही डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. संदेस (Sandes) अॅप हे Play App Store वर प्रकाशित झालेल्या डेटा गोपनीयता आणि डेटा धारणा धोरणाद्वारे (Data Privacy and Data Retention Policy) नियंत्रित केले जाते. संदेस (Sandes) अॅप हे" सुरक्षा प्रथम तत्त्वावर आधारित आहे आणि त्याद्वारे संदेश पाठविणारा व प्राप्त करणारा यांच्यामध्येच (एंड टू एंड एन्क्रिप्टेड) संदेशवहन प्रदान करते. संदेस (Sandes) प्लॅटफॉर्म केवळ सांख्यिकीय विश्लेषणासाठी मेटाडेटा संग्रहित करतो आणि म्हणून प्रत्यक्ष संदेश पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. सर्व वितरित न झालेले संदेश एन्क्रिप्टेड स्वरूपात केवळ मर्यादित कालावधीसाठी साठवले जातात. कोणत्याही गैरवापराची तक्रार झाल्यास गैरवापराचा उगम शोधण्याची संदेस (Sandes) अॅपमध्ये क्षमता आहे. त्यामुळे शासकीय कामकाजासाठी इतर कोणत्याही अॅपचा वापर न करता "संदेस" या NIC ने तयार केलेल्या अॅपचा वापर करणे बंधनकारक करण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करणे विचाराधीन होते.

शासन परिपत्रक-

संदेस (Sandes) अॅप है इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मची सर्व सुविधा प्रदान करते. याव्यतिरिक्त, संदेस (Sandes) अॅपची शासकीय वापरासाठी अधिक उपयुक्त ठरतील अशी वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत-
१. संदेश सुरक्षितपणे पाठवणे व प्राप्त करणे, सुरक्षित साठवण, ओटीपी पाठवणे व वितरित न झालेला Data सुरक्षित ठेवणे,
२. शासन/शासकीय कार्यालये यांच्या गरजेनुसार अनुकूलित (Customization)करण्याची सुविधा.
३. एनक्रिप्टेड मेसेज आणि फाइल्स पाठवण्यासाठी eGov अॅप्लिकेशन्ससह सेवा आधारित एकीकरण,
४. अनौपचारिक आणि अधिकृत गट तयार करण्याची सुविधा.
५. SMS च्या ऐवजी ओटीपी, अॅलर्ट, सूचना व प्रसारण करणारी संदेस ही सुरक्षित व विनाशुल्क प्रणाली आहे.

६. सत्यापित आणि सार्वजनिक वापरकर्त्यांमधील पृथक्करण. ७. संदेस पोर्टलद्वारे शासकीय वापरकर्त्यांच्या पडताळणीचा पर्याय.
८. संस्थेच्या स्तरावर प्रोफाइल तपशिलांची दृश्यमानता लपविण्याची सुविधा.
९. शासनासाठी योग्य जिमोजी (शासकीय इमोजी) आणि टॅगसह डिझाइन केलेले संवाद.
१०. डेस्कटॉप/लॅपटॉपसाठी संदेस वेब आवृत्तीची उपलब्धता. (sandes.gov.in)

११. संदेस पोर्टलवरून संस्थेतील विशिष्ट वापरकर्त्यांसाठी संदेश प्रसारणाची सुविधा.
१२. पोर्टलवरून भूमिका आधारित व्यवस्थापन आणि देखरेख.
१३. eGov अॅप्लिकेशन्समधून मेसेज आणि फाइल्स पाठवण्यास साहाय्य करते.
१४. अॅप्लिकेशन्समधून पाठवलेले संदेश आणि ते वाचल्याची पावती प्राप्त झाल्याची सुविधा प्रदान करते.
१६. एकात्मिक बाह्य अनुप्रयोगाद्वारे गट व्यवस्थापनाची सुविधा प्रदान करते.
१५. एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड ऑडिओ/व्हिडिओ कॉल्स (एकाबरोबर एक आणि सामाईक)

२. NIC द्वारे विकसित करण्यात आलेल्या "संदेस" (Sandes) अॅपचा वापर केंद्र शासनातील सर्व अधिकारी/ कर्मचारी तसेच विविध राज्य शासनांमधील २०० हून अधिक शासकीय संस्था यांच्याकडून तसेच ३५० हून अधिक ई-गव्हर्नन्स अॅप्लिकेशन्समध्ये संदेश, सूचना व ओ.टी.पी. पाठविण्यासाठी केला जात आहे. सदर अॅपचे विविधांगी कार्य तसेच उपयोग विचारात घेता, महाराष्ट्र राज्य शासनामार्फतदेखील शासकीय कामकाजात राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) द्वारे विकसित करण्यात आलेल्या "संदेस" (Sandes) अॅपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग व त्यांच्या अधीनस्थ शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात येत आहेत. यासाठी शासकीय विभागांनी/कार्यालयांनी करावयाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत-

डाऊनलोड करून त्यावरील माहिती व्यवस्थित भरावी.

१) sandes.gov.in/download या संकेतस्थळावर जाऊन organisation onboarding फॉर्म

२) सदर फॉर्मची Document copy आणि Scanned copy, hod.sandes_mhsc@nic.in या

ई-मेलवर सक्षम प्राधिका-यांच्या शासकीय ई-मेलवरून पाठविण्यात यावी.

सदर सूचना या आदेशाच्या दिनांकापासून त्वरित अमलात येतील.

४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०७२६१६२०२२६८०७ असा आहे. हे आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(अ. रा. रेडेकर) 
शासनाचे अवर सचिव


वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा

Download


 महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.