महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
दिनांक :- २८.०६.२०२४
प्रति.
शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय:- शिक्षकेतर कर्मचारी संचमान्यतेबाबत.
संदर्भ :
- १) शासनाचे समक्रमांकीत दि.२१.०२.२०२४ रोजीचे पत्र.
२) आपले पत्र जा क्र. शिसंमा/२०२३-२४/टि-८/संचमान्यता/२२१७, दि.१९.०४.२०२४.
३) आपले पत्र जा क्र. शिसंमा/२०२३-२४/टि-८/संचमान्यता/२२९६, दि.२५.०४.२०२४
राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/अर्शतः अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय दि.२८.०१.२०१९ अन्वये निश्चित केलेल्या सुधारित आकृतीबंधानुसार व त्यानुसार व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे, त्या पदावरील कार्यरत कर्मचारी यांच्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात दि.०७.०३.२०१९ च्या शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या कार्यपध्दतीनुसार शिक्षकेतर पदांच्या संचमान्यता व त्याअनुषंगाने इतर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपणास संदर्भाधीन पत्र क्र.१ अन्वये कळविण्यात आले आहे.
प्रस्तुत प्रकरणी आपल्या संदर्भाधीन क्र.२ व ३ पत्रांच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, ३० सप्टेंबर, २०२३ ची ऑनलाईन आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेवुन, दि.२८.०१.२०१९ च्या आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांच्या मर्यादेत संस्थांना पदे अनुज्ञेय करुन सन २०२३-२४ च्या शिक्षकेतर संचमान्यता तात्काळ कराव्यात. तसेच, आकृतीबंधानुसार व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे, त्या पदावरील कार्यरत कर्मचारी यांच्यासंदर्भात शासन निर्णय दि.०७.०३.२०१९ अन्वये विहीत केलेल्या कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करावी.
(विशाल लोहार)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments