महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)
(विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधीकृत)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
दिनांक: २३/०१/२०२५
परिपत्रक क्र. १५ / २०२५
विषय - ४०व्या सेट परीक्षेबाबत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुचनेप्रमाणे आतापर्यंत ३९ सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपारिक पध्दतीने (OMR based) करण्यात आलेले आहे.
यापूर्वी दि. २७/१२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक क्र. ३१४/२०२४ रद्द करण्यात येत असून या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, ४० वी सेट परीक्षा पूर्वी प्रमाणेच पारंपारिक पध्दतीने (OMR based) रविवार दि. १५ जून, २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
सबब, रविवार दि. १५ जून, २०२५ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ४०व्या सेट परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे
प्रभारी कुलसचिव तथा सदस्य सचिव
महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) SET 2025
State Eligibility Test 2025
(विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधीकृत)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सेट भवन, गणेशखिंड पुणे,-४११००७.
दूरध्वनी क.: ०२० २५६२२४४६
फॅक्स क. ०२०-२५६९९२५०
ई-मेल: set_coordinator@unipune.ac.in
सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा
दिनांक: २७/१२/२०२४
परीपत्रक क्र. ३१४ /२०२४
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुचनेप्रमाणे आतापर्यंत ३९ सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपारीक पध्दतीने (OMR based) करण्यात आलेले आहे.
या परीपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, ४० वी सेट परीक्षा पूर्वी प्रमाणेच पारंपारीक पध्दतीने (OMR based) रविवार दि. ४ मे, २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
सबब, रविवार दि. ४ मे, २०२५ रोजी आयोजित परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. करण्यात येणाऱ्या ४० व्या सेट माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या
प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे
कुलसचिव तथा सदस्य सचिव
सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 रिझल्ट जाहीर, आपणास खालील लिंकवर रिझल्ट बघता येईल -
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये सीट नंबर स्वतःचे हॉल तिकीट वर असल्याप्रमाणे नाव जन्मतारीख व मोबाईल नंबर टाकून सर्च रिझल्ट वर क्लिक करा आपल्याला आपला निकाल पुढील प्रमाणे दिसेल
दिनांक २६/०७/२०२४
जाहीर प्रकटन
दि. ७ एप्रिल, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या सेट परीक्षेसाठी SEBC प्रवर्गासाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत मार्गदर्शनपर पत्रव्यवहार सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याकडून महाराष्ट्र शासनास करण्यात आला आहे. शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. परंतू सेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट विभाग नव्याने एसईबीसी प्रवर्गात समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रवर्गाची माहिती मागविण्यात येत आहे.
त्यानुसार विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४ अन्वये, जे विद्यार्थी एसईबीसी प्रवर्गात समाविष्ट झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या Form for SEBC Candidates या शिर्षकांतर्गत उपलब्ध असलेला अर्ज भरण्यासाठी दि. १९/०७/२०२४ ते २५/०७/२०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे काही विद्यार्थ्यांना मुदतीत अर्ज भरणे शक्य झाले नसल्याने सदर अर्ज भरण्याची मुदत दि. २७/०७/२०२४ ते २८/०७/२०२४ सायंकाळी ६.०० पर्यंत वाढविण्यात आली आहे.
एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर सदर मार्गदर्शनाच्या अधीन राहून दि. ७ एप्रिल, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल, कृपया याची नोंद घ्यावी.
दिनांक: १९/०७/२०२४
जाहीर प्रकटन
दि. ७ एप्रिल, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या सेट परीक्षेसाठी SEBC प्रवर्गासाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत मार्गदर्शनपर पत्रव्यवहार सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याकडून महाराष्ट्र शासनास करण्यात आला आहे. शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. परंतू सेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट विभाग नव्याने एसईबीसी प्रवर्गात समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रवर्गाची माहिती मागविण्यात येत आहे.
त्यानुसार विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४ अन्वये, जे विद्यार्थी एसईबीसी प्रवर्गात समाविष्ट झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या Form for SEBC Candidates या शिर्षकांर्गत उपलब्ध असलेला अर्ज दि. १९/०७/२०२४ ते २५/०७/२०२४ पर्यंत भरणे आवश्यक आहे.
एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर सदर मार्गदर्शनाच्या अधीन राहून दि. ७ एप्रिल, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल, कृपया याची नोंद घ्यावी.
महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट बाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिनांक 4 जुलै 2024 रोजी एका जाहीर प्रकटनाद्वारे सेट परीक्षेच्या निकालाबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा
दि. ०४/०७/२०२४
जाहीर प्रकटन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरीष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरीता प्राधिकृत विभाग आहे.
दि. ७ एप्रिल, २०२४ रोजी ३९ व्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरीता १७ शहरांमधील विविध महाविद्यालयात करण्यात आले होते. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याचे काम सेट परीक्षा विभागाकडून पुर्णत्वास आले आहे.
परंतू सदर सेट परीक्षेसाठी एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून याबाबत विद्यापीठाकडून राज्यशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. सबब, राज्यशासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होताच ७ एप्रिल, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल.
निकाल पाहण्यासाठी लिंक👇
https://setexam.unipune.ac.in/
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
Thank you🙏
0 Comments