राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र चे संचालक यांनी दिनांक 24 जून 2024 रोजी १. संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महारष्ट्र राज्य, पुणे,
२. संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे
३. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
४. उपसंचालक, विभागीय विद्या प्राधिकरण सर्व
५. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व
६. शिक्षणाधिकारी (माध्यमिक / प्राथमिक) सर्व
७. प्रशासन अधिकारी मनपा/ नपा सर्व
८. शिक्षण निरीक्षक, मुंबई सर्व यांना शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांनी आयआयटी कानपूर (IIT कानपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने "SATHEE" (SELF-ASSESSMENT TEST AND HELP FOR ENTRANCE EXAM) AI (artificial intelligence) Based स्पर्धा परीक्षांसाठीचे तयार केलेले प्लेटफॉर्मची व्यापक प्रसिद्धी देणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
बारावीच्या परीक्षेनंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश करणे हे अनेक विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात मदत करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाने "SATHEE" (स्व-मूल्यांकन चाचणी आणि प्रवेश परीक्षांसाठी मदत्त), ॥ा कानपूरने विकसित केलेला विनामूल्य AI आधारित शैक्षणिक प्लेटफॉर्म सुरू केला आहे. SATHEE मध्ये खालील वैशिष्ट्ये आहेतः
१. अभियांत्रिकी परीक्षांच्या तयारीसाठी ४५ दिवसांचे थेट सत्र (वैद्यकीय परीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरू होतील)
२. भौतिकशास्र, रसायन, गणित, जीवशास्रावरील ७२०+ व्हिडिओ व्याख्याने NCERT नवीनतम अभ्यासक्रमात मॅप केलेले
३. सराव करण्यासाठी हजारो प्रश्न.
४. साप्ताहिक पाठानुसार आणि एकूणच अभ्यासक्रमावर आधारित मॉक टेस्ट.
५. सर्व सामान्यांचे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी AI वर आधारित chatbot
६. मोबाइल अॅप.
६. परीक्षेची तयारी कशी करावी आणि पेपर कसा सोडवावा याबद्दल वेविनार.
७. आयआयटी आणि एम्सच्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन.
"SATHEE" याचे सर्व उपक्रम https://sathee.prutor.ai या लिंकवर उपलब्ध आहेत. त्याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांना माहिती देण्यासंदर्भात आणि त्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी किंवा ज्ञान वाढीसाठी या संसाधनाचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी नमूद केले आहे. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी परीक्षेच्या तयारीसाठी ४५ दिवसांच्या ऑनलाइन लाईव्ह क्रैश कोर्समध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यसाठी सुद्धा सविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. SATHEE या व्यासपीठवर विशेषतः JEE, NEET, SSC, RRB, ICAR, CLAT आणि CUET सह विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी विनामूल्य, सर्वसमावेशक तयारी संसाधने प्रदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे..
हे संसाधन अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांचा प्रयत्न आहे, तसेच "SATHEE" बद्दल माहिती प्रसारित करण्यासाठी या कार्यालयास पत्र प्राप्त झाले असून या पत्रासोबत जोडलेल्या परिशिष्टे नुसार आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पर्यवेक्षीय यंत्रांना अवगत करण्यात यावे तसेच याची माहिती जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा आहवाल या कार्यालयाच्या evaluationdept@maa.ac.in या मेल वर पाठवण्यात यावी.
(राहूल रेखावार, भा.प्र.से)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
प्रत माहितीस्तव :
१. मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली २. मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई.
३. संचालक, edutech IIT कानपूर
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर Download क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments