RIMC Entrance Exam 2024 Update - राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा (RIMC) डिसेंबर, २०२४ संपूर्ण माहिती अर्ज लिंक

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 23 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा (RIMC) डिसेंबर, २०२४ बाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.



संपूर्ण माहिती व सूचना 

प्रसिध्दीपत्रक राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर २०२४

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी "राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त इयत्ता ८ वी साठीची प्रवेशपात्रता परीक्षा आहे" ही परीक्षा दिनांक ०१ डिसेंबर, २०२४ रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी मुले व मुली प्रविष्ट होऊ शकतात.

१) शैक्षणिक पात्रता : विद्यार्थी विद्यार्थीनी (उमेदवार) दि. ०१ जुलै, २०२५ रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता ७ वी वर्गात शिकत असावा किंवा ७ वी उत्तीर्ण झालेला असावा.

२) वय : या परीक्षेसाठी विद्यार्थी / विद्यार्थीनीचे वयोमर्यादा (वय) दिनांक ०१ जुलै, २०२५ रोजी ११५ (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि १३ (तेरा) वर्षापेक्षा अधिक नसावे. म्हणजेच विद्यार्थी विद्यार्थीनीचा जन्म दिनांक ०२. जुलै २०१२ च्या आधीचा व दिनांक ०१ जानेवारी २०१४ च्या नंतरचा नसावा.

३) परीक्षा शुल्क : आवेदनपत्र (फॉर्म) ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आपण मागवू शकता:-

४) आवेदनपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया: परीक्षेचे माहितीपत्रक, आवेदनपत्र व जुन्या प्रश्नपत्रिकांचे संच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून उत्तराखंड पिन कोड- २४८००५ यांचेमार्फत खालील पद्धतीने मागविता येईल.

अ) ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) व जुन्या प्रश्नपत्रिकांचा संच मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या www.rimc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सर्वसाधरण व इतर संवर्गाकरिता रु. ६००/- व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. ५५५/- पैसे भरून आवेदनपत्राची (फॉर्मची) मागणी आपणास करता येईल.

ब) डिमांड ड्राफ्ट द्वारे परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता सर्वसाधरण संर्वगातील विद्यार्थी (उमेदवार) करीता रु. ६००/- चा डी.डी. व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. ५५५/- चा डी.डी THE COMMANDANT RIMC FUND, DRAWEE BRANCH, HDFC BANK, BALLUPUR CHOWK, DEHRADUN, (BANK CODE 1399), UTTARAKHAND यांचे नावाने काढावा. सदर डी. डी. THE COMMANDANT "RASHTRIYA INDIAN MILITARY COLLEGE, DEHRADUN, UTTARAKHAND, २४८ ००३ या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमाती करीता डी. डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत/छायांकितप्रत पाठविणे बंधनकारक आहे. डी.डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोड सह अचूक नमूद करावा. तसेच इंग्रजी कॅपिटल अक्षरातच लिहिलेला अथवा टाईप केलेला असावा. त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील १० वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तिका स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होईल.

टीप:-

> परीक्षेसाठी मा. कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेमार्फत पुरवलेलेच आवेदनपत्र वैद्य/ग्राह्य धरले जाईल.

> परीक्षेसाठी मा. कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र (फॉर्म) घ्यावयाचे आहे. स्थानिकरित्या छपाई केलेले छायांकित प्रतीतले व RIMC चा होलोग्राम नसलेले आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाहीत.

> आवेदनपत्र शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही.

५) कागदपत्रेः- आवेदनपत्र (फॉर्म) २ (दोन) प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत खालील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे..

अ) जन्म दाखल्याची छायाप्रत (राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली झेरॉक्स कॉपी)

ब) उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) प्रमाणपत्र छायाप्रत (राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली झेरॉक्स कॉपी)

क) अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी).

ड) विद्यार्थ्यांचा फोटो, जन्मतारीख व इयत्तेच्या नोंदीसह शाळेच्या बोनाफाईड सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे.

इ) आवेदनपत्रासोबत विद्यार्थ्याचे/विद्यार्थीनीचे (उमेदवाराचे) आधारकार्ड छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) जोडणे. बंधनकारक आहे आणि ते जमा न केल्यास विद्यार्थ्याचे/विद्यार्थीनीचे (उमेदवाराचे) आवेदनपत्र (फॉर्म) रद्द करण्यात येईल.

ई) विद्यार्थ्यांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो (मागील बाजूस विद्यार्थ्याच्या सहीसह)

उपरोक्त कागदपत्रांच्या छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फत साक्षांकित (Attested) करून आवेदनपत्रासोबत (फॉर्मसोबत) जोडावेत.

सूचना : आवेदनपत्र परीपूर्ण पणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्यमंडळ) भांबुर्डा, आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर पुणे ४११००४. या पत्त्यावर दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावीत. कुठल्याही परिस्थितीत आवेदनपत्र RIMC, कडे जमा करु नयेत.


परीक्षेचे वेळापत्रक

रविवार

०१/१२/२०२४

गणित

सकाळी ९:३० ते ११:००

२००

सामान्य ज्ञान

दुपारी १२:०० ते १:००

७५

इंग्रजी

दुपारी २:३० ते ४:३०

१२५


• लेखी परीक्षेतून मौखिक परीक्षेस पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना (उमेदवारांना) मौखिक परीक्षा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल.


आपली विश्वासू,

(अनुराधा ओक)

आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -४


आधिक माहितीसाठी खाली दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करावा किंवा खाली दिलेल्या वेबसाईट ला भेट द्यावी.


Phone No. ०२०-२९७०९६१७ Email: mscepune@gmail.com Website: www.mscepune.in

परीक्षा परिषदेचे संपूर्ण प्रसिद्धी पत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.