PMeVidya शैक्षणिक वाहिनी उपक्रमाचा लाभ राज्यातील शिक्षक, विद्यार्थी, पालक, अधिकारी यांना उपलब्ध करून देणेबाबत SCERT निर्देश

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

 दिनांक : १५/०७/२०२४

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),

२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व),

३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),

४. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका,

५. शिक्षणाधिकारी, प्राथमिक/माध्यमिक/योजना (सर्व),

६. शिक्षण निरिक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर) मुंबई,

७. शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी म.न.पा. (सर्व),

विषय :- PMeVidya शैक्षणिक वाहिनी उपक्रमाचा लाभ राज्यातील शिक्षक, विद्यार्थी, पालक, अधिकारी यांना उपलब्ध करून देणेबाबत...

संदर्भ :-

१. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र File No.२०.१९/२०२२-२३/eVidya/CIET October 3, २०२२.

२. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र File No.२०.१९/२०२२-२३/eVIDYA/CIET January १०, २०२३.

३. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र F. No.-२०.१९/२०२३-२४/CIET/eVidya Cell ०४th May, २०२३.

४. एनसीईआरटी, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक २९/०७/२०२३ रोजी झालेला सामंजस्य करार (MoU).

५. मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांची मान्य टिपणी दिनांक- १०/०६/२०२४.


महोदय,

विद्यार्थ्यांसाठी ई- शैक्षणिक साहित्याचे प्रक्षेपण राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या स्वतःच्या शैक्षणिक DTH वाहिनी मार्फत करण्यात येते. उपरोक्त संदर्भीय क्र. २ व ३ अन्वये राज्यासाठी ५ शैक्षणिक DTH वाहिन्या मंजूर झालेल्या आहेत. उपरोक्त संदर्भीय क्र. २ व ३ पत्रातील सूचनांनुसार सध्या ५ शैक्षणिक वाहिन्यांवर प्रस्तुत वाहिन्यांवर इयत्ता ९ वी ते १२ वी, शिष्यवृत्ती व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास यासाठी आवश्यक ई-साहित्य प्रक्षेपणासाठी दिनांक २९/०७/२०२३ पासून प्रक्षेपण करण्यात आलेले आहे,

उपरोक्त संदर्भ क्र. ०५ नुसार दिनांक ०५ ते ०७ जून २०२४ दरम्यान आयोजित कार्यशाळेत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यासाठी सध्या ५ शैक्षणिक वाहिन्यांवर प्रक्षेपणासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे, प्रस्तुत नियोजन सन २०२४-२५ अंतर्गत दिनांक १५ जून २०२४ ते ३०/०४/२०२५ दरम्यान लागू राहणार आहे.



उपरोक्त ०५ वाहिन्या आपणास खालील यु-ट्यूब लिंक वर क्लिक करून ही पाहण्यास उपलब्ध असतील. आपण वाहिनीनिहाय पुढीलप्रमाणे यु-ट्यूब द्वारा आशय बघून सोबत दिलेल्या ई-मेलवर आपले बहुमुल्य अभिप्राय देवू शकतात.


वाहिनी निहाय यु-ट्यूब लिंक व अभिप्रायसाठी ई-मेल २०२४-२५

Name of the Channel PM VIDYA MH113_০৭

Grade

YouTube Link.

Feedback Email

MAHARASHTRA

1.2.3.4

https://youtube.com/@scertmc113-ke6dpsi=XgWC4JnTdhJuB9XV


dth.class1 4@maa.ac.in

PMeVIDYA MH११४०२ 2 MAHARASHTRA

5,6,7

https://youtube.com/@scertmc2-jb1sk?si=tJE94MWCDZBBQVdth.class5_7@maa.ac.in


PMOVIDYA MH940

https://youtube.com/@scertmc115-8.9,10cn4kr?si=wr2-zIU9dD9z10zk


MAHARASHTRA

dth.class9 10@maa.ac.in

PMEVIDYA MHYR६०४

https://youtube.com/@scertmc116-11,12


MAHARASHTRA PMOVIDYA MH

dth.class11 12@maa.ac.in

Scholarship 

https://youtube.com/@scertmc117-HBff?si=NWanlk99TKzx3di8dth.schcpd@maa.ac.in


उक्तप्रमाणे राज्यासाठी मंजूर ०५ PMeVidya शैक्षणिक वाहिनीसाठी सन २०२४-२५ अंतर्गत इयत्ता १ ली ते १२

वी, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास व इ. ५ वी, ८ वी शिष्यवृत्ती विषयासाठी दिनांक १५/०६/२०२४ ते ३०/०४/२०२५ दरम्यान महिनानिहाय प्रपत्रे व मासिक वेळापत्रक करून कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येणार आहेत, तरी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, पालक, अधिकारी व शिक्षण तज्ज्ञ यांना उपरोक्त ०५ शैक्षणिक चॅनेलचा लाभ घेण्यास आपल्या स्तरावरून आवाहन करण्यात यावे. याबाबत काही अडचणी आल्यास उपरोक्त ई-मेल वर सविस्तर लिहिण्यास आदेशित करण्यात यावे.


सोबत- माहे जून २०२४ वेळापत्रक


आपला विश्वासू,

(राहूल रेखावार, ना.प्र.से.)

संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.