PAT 1 Chatbot Online Marks Filling Update - Swiftchat app अपडेट झाले! चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता सुविधा अजूनही उपलब्ध SCERT च्या अधिकृत सूचना!

Swiftchat app अपडेट झाले बाबत


Swiftchat app मध्ये बदलीने आलेल्या शिक्षकांचे नाव जुन्या शाळेमध्ये दिसत होते तसेच जुन्या शाळेतील विद्यार्थ्यांची नावे दिसत होती सदरच्या तांत्रिक दोषाची निराकरण राज्य स्तरावरून झाल्याने अॅप अपडेट झाले आहे.   

शिक्षकांना माहितीसाठी


FAQ:

1. ज्या शिक्षकांना Deputation दिले आहे ते शिक्षक मूळ शाळेच्या आस्थापनेवर असतात. त्यामुळे त्यांना नवीन शाळेत गुण भरता येणार नाहीत. याकरिता त्या शाळेतील जुन्या शिक्षकांच्या लॉगिन वरून सर्व वर्गांची माहिती भरावी. 

2. यावर्षी दुसरीतील मुले सरल पोर्टलवर तिसरीमध्ये प्रमोशन केल्यास, तिसरी मध्ये विद्यार्थी दिसतील त्याप्रमाणे त्यांची माहिती भरावी. 

3. Chat Bot संदर्भात समस्या नोंदविण्यासाठीची लिंक पत्रामध्ये देण्यात आलेली आहे. लिंक : (https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA

4. इयत्ता नववीचे विद्यार्थी दिसण्याकरिता Swifchat ॲप वरून लॉग आऊट करून पुन्हा रजिस्ट्रेशन करावे. (तांत्रिक अडचण असल्यामुळे) 

5. मोबाईल नंबर चेंज झाला असल्यास शालार्थ पोर्टल, यु डायस प्लस व सरल पोर्टलवर नवीन नंबर अपडेट करावा. यानंतर सात ते आठ दिवसात आपला नवीन नंबर Chat Bot वर अपडेट होईल.

6. सद्यस्थितीत सेवार्थ प्रणाली वरील शिक्षकांना माहिती भरता येत नाही. याबाबत राज्यस्तरावर निर्णय झाल्यानंतर आपणास स्वतंत्रपणे पत्राद्वारे कळविण्यात येईल.


----------------

विद्या समीक्षा केंद्र,

SCERT, महाराष्ट्र, पुणे.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे कार्यालयातून निर्गमित दिनांक 26 जुलै 2024 रोजी च्या परिपत्रकानुसार पायाभूत मूल्यमापन चाचणी महाराष्ट्र चे गुण चॅटबोट वर नोंदवणे बाबत पुढील प्रमाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना निर्देश देण्यात आले आहे. 

STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २(PAT-१ ते ३) चे आयोजन करण्यात येणार आहे. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ चे आयोजन दि. १० ते १२ जुलै २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत. विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना सोबत देण्यात येत आहे. तसेच याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक प्रस्तुत कार्यालयाच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. राज्यातील शिक्षकांना पायाभूत चाचणी (PAT-१) चे गुण दि. २७ जुलै २०२४ ते दि. २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना कालावधी देण्यात येत आहे.


उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ/माध्य., शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-9 घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा.

तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.


१. पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) चाटबॉट मार्गदर्शिका :

https://bit.ly/PATUserManual

२. पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) गुणांची नोंद करणेसाठी लिंक - https://bit.ly/PAT-MH


(डॉ. शोभा खंदारे)

सहसंचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.





Chatbot वर पायाभूत चाचणी 2024 चे गुण ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

I just explored the PAT (महाराष्ट्र) chatbot 💬 on SwiftChat. It’s an exciting new experience 🤩, do check out: 

https://cgweb.page.link/1S6cFAj6pTmYeH1UA

Besline test ky Mark's Aad karney ki Swidha start Hui hai 5th to 8th Class

https://cgweb.page.link/6A8g7YoMJSX9EMtV9

यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन)

https://youtube.com/live/xnnTpdfylxY?feature=share


PAT-1 चाटबॉट मार्गदर्शिका :

https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RIOhbVlj2D7qQgW5Z/6/view?usp=sharing 

 गुणांची नोंद करणेसाठी लिंक -  (PAT-1) 


3)https://cgweb.page.link/HhMEgogKD43dnJdV7


Previous Update👇


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे द्वारे निर्गमित दिनांक 6 मे 2024 रोजी च्या परिपत्रकानुसार संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता पुन्हा मुदतवाढ देणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning AssessmentSystem

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी नियतकालिक मूल्यांकन नुसार (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २(PAI-३) चेआयोजन करण्यात आलेले होते. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन २ (PAT-३चेआयोजन दि. ४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यमा, गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. सदर संकलित मूल्यमापन -२(PAT-३) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु ट्युबद्वारे देण्यातआलेल्या आहेत,

विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटसंकलित मूल्यमापन २ (PAT-३)गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन २(PAT-३) ये गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक यापूर्वी सोबत देण्यात आलेली आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षणदि. १५ एप्रिल २०२४ रोजी यु ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात आलेले आहे. यापूर्वी शिक्षकांना संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे गुण दि.२६ एप्रिल २०२४ ते दि.५ मे २०२४पर्यंत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे करिता कालावधी देण्यात आलेला होता. तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसल्याने सदरचे गुण चाटबॉटवर नोंदविण्याकरिता जिल्ह्यांनादि. १० मे २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. उपरोक्त कामासाठी जिल्हाशिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयकम्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांनाविद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २ (PAT-शूचे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन २ (PAT-घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gie/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा. तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.


यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन)

https://youtube.com/live/xnnTpdfylxY?feature=share


PAT-३ चाटबॉट मार्गदर्शिका :

https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RIOhbVlj2D7qQgW5Z/6/view?usp=sharing 

संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २ (PAT-


3)https://cgweb.page.link/HhMEgogKD43dnJdV7


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.