NMMSS NSP Scholarship 2024 Update - एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एन एस पी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज भरणेबाबत शिक्षण संचालक यांचे निर्देश Online Forms 2024-25 NSP Portal Start Last Date Notification GR

शिक्षण संचालक योजना यांनी दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी NSP 2.0 पोर्टलवरील एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणेबाबत १. शिक्षणाधिकारी (माध्यमिक/योजना) जिल्हा परिषद सर्व २. शिक्षण निरिक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई ३. शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी/शिक्षण प्रमुख मनपा/नपा/नय सर्व  यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
संदर्भ: १. केंद्रशासन स्तरावरुन वेळोवेळी प्राप्त निर्देश.

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक ३०/०६/२०२४ रोजीचा ई-मेल.

३. संचालनालयाने वेळोवेळी व्हि.सी द्वारे दिलेल्या सूचना.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी NSP 2.0 पोर्टलवर एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्याथ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीचे नवीन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरणे दिनांक ३०/०६/२०२४ पासून सुरु झाले असून एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्याथ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीचे नवीन व नुतनीकरण अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१/०८/२०२४ आहे. एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्याथ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीचे नवीन व नुतनीकरण अर्ज शाळा स्तर अर्ज पडताळणी अंतिम दिनांक १५५/०१/२०२४. जिल्हा स्तर अर्ज पडताळणी अंतिम दिनांक ३०/०९/२०२४.

एन.एम.एम.एस मध्ये सन २०२३-२४ मध्ये परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्याध्यांची (इयत्ता ९यो) नवीन मधून अर्ज आधार नुसार भरणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता १०वी, ११वी व १२वी मधील विद्याथ्यांनी नुतनीकरण मधून भरणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन मध्ये ११,६८२ विद्यार्थी पात्र आहेत तर नूतनीकरण मध्ये २८,८६८ विद्याथी पात्र आहेत. तसेच दिव्यांग विद्याध्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीमधील नुतनीकरण मध्ये ५२४ विद्यार्थी पात्र आहेत.

NMMS मधील नवीन अर्ज सादर करणाऱ्या विद्याध्यांची माहिती आधारनुसार नसल्यास तसेच ज्या विद्याथ्यांनी शाळा बदलली आहे व चालु वी १०वी व हस्यों मध्ये शिक्षण घेत आहे, तसेच नुतनीकरण मधील ज्या विद्यायांचे अर्ज डिफेक्ट झाल्यामुळे शाळेच्या नावामध्ये बदल करता येत नाही अशा विद्याथ्यांची माहिती विहीत नमुन्यात विहीत कालावधीत दुरुस्तीसाठी पाठविण्यात बाची.

सर्व पात्र विद्याथ्यांचे अर्ज ऑनलाईन NSP 2.0 पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. विहित मुदतीपूर्वी शाळा व जिल्हा स्तरावरुन नवीन व नुतनीकरण अर्जाची पडताळणी करण्यात यावी. डिफेक्ट केलेले अर्न आवश्यक ती दुरुस्ती करुन मुदतीपूर्वी ऑनलाईन भरुन पडताळणी पूर्ण करण्यात याची दिनांक १९/०८/२०२४ रोजीची नवीन व नुतनीकरणाची सद्यस्थिती सोबत जोडण्यात आलेली आहे. (परिशिष्ट १ ते ४)

नवीन व नूतनीकरणामधील विद्याथी सध्या शिकत असलेल्या शाळांमध्ये आपल्या जिल्ह्याद्वारे व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी. जेणे करुन नवीन व नूतनीकरणमधील विद्यार्थी NSP 2.0 पोर्टलवर स्वतःची नोंदणी करतील. विहीत कालावधीमध्ये नवीन व नूतनीकरणचे अर्ज ऑनलाईन NSP 2.0 पोर्टलवर भरणे व पडताळणी करणे याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधित गटशिक्षणाधिकारी/शाळा यांना सूचना देण्यात याव्यात व Timeline चे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.

(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक
शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.





प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक/योजना)
३) शिक्षण निरिक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई
४) शिक्षणाधिकारी मुंबई मनपा, शिक्षण प्रमुख पुणे मनपा/शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी मनपा/नपा/नप (सर्व)
५) गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती (सर्व)

विषय : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना (NMMSS) सन २०२४-२५ साठी पूर्वतयारी व अंमलबजावणीबाबत.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्रशासन पुरस्कृत योजना सन २००७-०८ या वर्षापासून सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत शाळेतील इयत्ता ८वी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी/विद्यार्थीनी या परीक्षेसाठी पात्र असतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित (आई-वडिलांचे) रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.

शासन निर्णय क्र.२० ऑगस्ट, २०१८ पासून NMMSS परीक्षेत निवड झालेल्या विद्याथ्यांना इ.९वो ते इ.१२वी अखेर ४ वर्ष दरमहा रु.१,०००/- प्रमाणे (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती मिळते. सन २०१७-१८ पासून या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांने नवीन व नुतनीकरण अर्ज दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने भरलेल्या अर्जाची शिष्यवृत्तीच्या निकषानुसार पडताळणी विहीत मुदतीमध्ये शाळा व जिल्हा स्तरावर करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी पात्र सर्व विद्याथी / विद्यार्थीनींचे अर्ज NSP 2.0 या पोर्टलवर भरण्याबाबत विविध माध्यामातून जाहिरात करुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच कार्यालयाच्या व शाळेच्या दर्शनीभागामध्ये योजनेच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMSS) शिष्यवृत्तीसाठी सन २०२४-२५ साठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावयाची प्रक्रिया केंद्रशासनाकडून NSP 2.0 या पोर्टलवर सुरू करण्यात आल्यानंतर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMSS) शिष्यवृत्तीचे वाटप केंद्रशासनाकडून DBT (Direct Benefit Transfar) मोडद्वारे विद्यार्थी विद्यार्थीनींच्या आधार लिंक बैंक खात्यावर होत असल्याने विद्याथी / विद्यार्थीनींचे आधार कार्ड असणे व विद्यार्थी विद्यार्थीनीच्या बैंक खात्यास लिंक असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे - •

पात्रतेचे निकष १. पालकाचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे.

२. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (अंशतः अनुदानित सहित) शाळेतील विद्याथ्यर्थ्यांना सदर योजना लागू आहे.

३. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.

४. इयत्ता १०वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल.

इयत्ता १०वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास ६० टक्केपेक्षा अधिक गुण (अनुसूचित

५. जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांस ०५ टक्के सूट.) इयत्ता ९वी मधून १०वी मध्ये गेलेले विद्यार्थी व ११वी मधून

१२वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्यांच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे. ६.

७ . शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्यांच्या बैंक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे.

८. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

९. विद्याथ्यांकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल.

१० . जर एखाद्या विद्यार्थ्यांस चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसूली करण्यात येईल.

११. कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित केली जाऊ शकत नाही.

१२. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्यांचा दावा विचारात घेतला जाणार नाही.
• आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे -

१. सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट..

२. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे एन.एम.एम.एस. परीक्षेचे गुणपत्रक.

३. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे गतवर्षाचे (इयत्ता ९वी, १०वी, ११वी) गुणपत्रक.

४. सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचा रु. ३,५०,०००/- आतील उत्तपन्नाचा दाखला.

५. ज्या प्रवर्गातून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाला त्या प्रवर्गाचा (जातीचा) सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा दाखला.
६. आधार कार्ड प्रत.
सन २०२४-२५ मध्ये NSP 2.0 या पोर्टलवर एका विद्यार्थ्याला कोणतीही एका शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. तसेच कॉमन स्टेंडर्ड अॅप्लिकेशन फॉर्म एन.आय.सी कडून विकसित करण्यात आलेला आहे. तसेच केंद्र शासनाकडून लाभार्थ्याच्या आधार लिंक बैंक खात्यामध्ये Aadhar base Payment System (ABPS) द्वारेच शिष्यवृत्ती जमा करण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आधार हा ओळखीचा पुरावा म्हणून आवश्यक आहे. एन.एस.पी पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी विद्यार्थ्याच्या लॉगिन मध्ये डॅशबोर्ड उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच वेळोवेळी SMS द्वारे अपडेट्स पाठविले जातील.

विद्याथी / विद्यार्थीनींचे नविन अर्ज रजिस्टर करण्यासाठी :-

१. एन.एस.पी पोर्टलवर Applicant Corner मध्ये New Registration या लिंकवर क्लिक करणे.

. सर्व मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचा व Continue बटणावर क्लिक करा. २

३. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड असेल तर I have Aadhar हा पर्याय निवडणे, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नसेल पण आधारसाठी विद्यार्थ्याने नोंदणी केली असल्यास Aadhar not assigned (I have EID) हा पर्याय निवडणे, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नसल्यास तसेच नोंदणी देखील केली नसल्यास I don't have Aadhar/EID हा पर्याय निवडणे.

४. विद्यार्थ्याचा/पालकांचा मोबाईल क्रमांक नोंद करावा. मोबाईलवर OTP प्राप्त करण्यासाठी Get OTP या बटणावर क्लिक करावे.

५. OTP टाईप करुन Verify या बटणावर क्लिक करावे.

६. आधारवरील सर्व माहिती तपासण्यात यावी.

७. स्कॉलरशिप Type मध्ये स्कॉलरशिप स्किम निवडा.

८. स्कॉलरशिप Category मध्ये इयत्ता ९वी, १०वी साठी प्रि-मॅट्रिक निवडा व इयत्ता ११वी, १२वी साठी पोस्ट

मॅट्रिक निवडा.

९. State Of Domicile मध्ये विद्यार्थी ज्या राज्याचा रहिवाशी आहे ते राज्य निवडा.

१०. Father Name मध्ये विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव, Mother Name मध्ये विद्यार्थ्याच्या आईचे नाव,

विद्यार्थ्यांचा ई-मेल आयडी असल्यास ई-मेल आयडी भरुन रजिस्टर या बटणावर क्लिक करणे.

११. विद्यार्थ्यास रजिस्ट्रेशन/अॅप्लिकेशन आयडी मिळेल. सदर आयडी जतन करुन ठेवावा

१. एन.एस.पी पोर्टलवर Applicant Corner मध्ये Fresh Application या लिंकवर क्लिक करणे.

विद्याथी / विद्यार्थीनींचे नविन अर्ज भरण्यासाठी :-

२. विद्यार्थ्यांचा अॅप्लिकेशन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन या बटणावर क्लिक करा. (रजिस्टर मोबाईलवर

SMS द्वारे आयडी व पासवर्ड प्राप्त होतो.)

३. रजिस्टर मोबईलवरील प्राप्त OTP टाकून Confirm OTP या बटणावर क्लिक करा.

४. विद्यार्थ्यांचा अर्ज भरण्यासाठी Application Form या मेनूबर क्लिक करा.

५. General Information मध्ये आधार नुसार विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख व लिंग भरावे. . धर्म, जात, पालकांचे वार्षिक उत्पन्न, विद्यार्थी Day scholar / hosteller हे नमूद करावे. ६

७. Academic Details मध्ये विद्यार्थ्यांची शाळा निवडण्यासाठी Select Your Institute या बटणावर क्लिक करावे,

८. शाळेच्या यु-डायस नुसार शाळा शोधून Select या बटणावर क्लिक करावे.
९. विद्यार्थ्यांचा जनरल रजिस्टर नंबर, शाळा प्रवेश वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडी, सध्या शिक्षण घेत असलेली इयत्ता, शाळा सुरु झालेली तारीख, मागील इयत्ता, पास झालेले वर्ष, मागील इयत्तेमधील गुणांची टक्केवारी इ. माहिती भरावी.

१०. Competitive Exam Qualified मध्ये NMMS निवडावे.

११. Exam Conducted by मध्ये विद्यार्थ्याने ज्या राज्यातून परीक्षा दिली आहे ते राज्य निवडावे.

१२. Competitive Exam Roll No मध्ये NMMS रिझल्ट मधील सीट क्रमांक नमूद करावा (फक्त अंकी असाव. उदा. ३३९२******)

१३. Competitive Exam Year मध्ये '2023' नमूद करावे.

१४. Other Details मध्ये विद्यार्थी अनाथ असल्यास पालकांचे नाव, विद्यार्थी दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्राचा प्रकार, UDID क्रमांक, दिव्यंगत्वाचा प्रकार, दिव्यांगाची टक्केवारी, पालकांचा व्यवसाय इ. माहिती भरुन Save & Continue या बटणावर क्लिक करावे.

१५. Contact Details मध्ये जिल्हा, शहर/ग्रामीण, संपूर्ण पत्ता व पिनकोड नमूद करावा.

१६. विद्यार्थ्यांनी भरलेल्या माहितीच्या आधारे केंद्रशासनाच्या कोणकोणत्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो याची यादी दिसेल. त्यामधील विद्यार्थ्यास आवश्यक असलेली शिष्यवृत्ती योजना निवडण्यात यावी.

१७. Upload Document मध्ये विद्यार्थ्यांचे बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, गुणपत्रक इ. कागदपत्रे अपलोड करावी. (फाईल साईज ५० ते २५० के. बी दरम्यान असावी.)

१८. Print Your Application या मेनूवर क्लिक करुन विद्यार्थ्यांच्या अर्जाची प्रिंट काढावी. सदर अर्ज व कागदपत्रे शाळेमध्ये जमा करण्यात यावी. शाळेने सदर कागदपत्रे किमान ०५ वर्षे जतन करुन ठेवावीत.

विद्याथी / विद्यार्थीनींचे नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी :-

१. एन.एस.पी पोर्टलवर Applicant Corner मध्ये Renewal Application या लिंकवर क्लिक करणे. २. विद्यार्थ्याचा अॅप्लिकेशन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन या बटणावर क्लिक करा.

३. विद्यार्थी/विद्यार्थीनीनी शाळा बदलली असल्यास Update Institute या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर Select Your Institute या बटणावर क्लिक करुन शाळेच्या यु-डायस नुसार शाळा शोधून Select या

बटणावर क्लिक करुन शाळा निवडावी व Update या बटणावर क्लिक करावे. ४. विद्यार्थी/विद्यार्थीनीचे E-KYC करण्यासाठी Update E-KYC OTP या बटणावर क्लिक करुन आधार लिंक मोबाईल क्रमांकावरील प्राप्त OTP च्या आधारे E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी किंवा Face Authentication द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. (Face Authentication साठी मोबाईल वर गुगल प्ले स्टोअर मधून NSP FaceAuth हे अॅप्लिकेशन Install करावे व विद्यार्थ्यांचे लॉगिन करुन Face
Authentication प्रक्रिया पूर्ण करावी.) ५. विद्यार्थी/विद्यार्थीनीचा नूतनीकरणाचा अर्ज भरण्यासाठी Apply for Renewal या मेनूवर क्लिक करावे. ६. पालकांचे वार्षिक उत्पन्न, Day scholar / hosteller, शाळा सुरु झालेली तारीख, मागील इयत्तेतील गुणांची टक्केवारी, विद्यार्थ्यांचा जनरल रजिस्टर नंबर, शाळा प्रवेश वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडी इ. माहिती नमूद करावी.

७. Upload Document मध्ये विद्यार्थ्यांचे बोनाफाईड प्रमाणपत्र अपलोड करावी. (फाईल साईज ५० ते २५० के.बी दरम्यान असावी.) 
८. Save as Draft या बटणावर क्लिक करावे.

९. भरलेली सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करुन Final Submit या बटणावर क्लिक करावे.
१०. Print Your Application या मेनूवर क्लिक करुन विद्यार्थ्याच्या अर्जाची प्रिंट काढावी. सदर अर्ज व कागदपत्रे शाळेमध्ये जमा करण्यात यावी. शाळेने सदर कागदपत्रे किमान ०५ वर्षे जतन करुन ठेवावीत.

K.Y.C. फॉर्मबाबत :-

A. NSP 2.0 या पोर्टलवरती अद्याप ज्या शाळांनी K.Y.C. फॉर्म भरलेला नाही अशा सर्व शाळांनी K.Y.C. फॉर्म भरणे बंधनकारक आहे.

NSP 2.0 या पोर्टलवरती शाळांनी K.Y.C. फॉर्म भरण्यासाठी पोर्टलवरती सर्व्हिसेस या मेनू मध्ये Institute KYC Registration Form यावर क्लिक करुन शाळेचा यु-डायस क्रमांक व Captcha कोड टाकून सबमिट करावा. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापकांनी नेमलेले शाळेचे नोडल ऑफिसर यांची आधार नुसार माहिती व शाळेची सर्व माहिती भरुन K.Y.C. फॉर्म सबमिट करावा. सोबत नोडल ऑफिसर यांचे आधार कार्ड स्कॅन करुन अपलोड करावे.

K.Y.C. फॉर्म भरुन झाल्यानंतर त्याची प्रिंट काढावी व सदर प्रिंटवर नोडल ऑफिसर यांचा फोटो,

नोडल ऑफिसर व मुख्याध्यापक यांची सही तसेच शाळेचा शिक्का मारुन स्कैन करुन (फाईल साईज ५० ते २५० के.बी दरम्यान असावी) पुन्हा एन.एस.पी पोर्टलवर नोडल ऑफिसर यांच्या मोबाईल वरील ओ.टी.पी पडताळणी करुन फॉर्म अपलोड करावे. मुख्याध्यापक यांच्या मोबाईल वरील आलेल्या ओ.टी.पी आधारे K.Y.C. फॉर्म मधील माहिती तपासून Approve करण्यात यावा. K.Y.C. फॉर्म Approve करण्यासाठी शिक्षणाधिकारी योजना कार्यालयामध्ये तपासणीसाठी पाठवावे. शिक्षणाधिकारी कार्यालयामधून K.Y.C. फॉर्म Approve करण्यासाठी शाळेचा यु-डायस क्रमांक टाकून भरलेली माहिती तपासून, नोडल ऑफिसर यांचा मोबाईल क्रमांक बरोबर आहे याची खात्री करुनच Approve करावे. (टिप: सर्व शाळांची K.Y.C. फॉर्म पोर्टलवरती भरणे आवश्यक आहे. शाळेमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी नसले किंवा शाळेमधून शिष्यवृत्तीसाठी अर्ज नसला तरीही पोर्टल बरती K.Y.C. फॉर्म भरणे आवश्यक आहे. यापूर्वी K.Y.C. फॉर्म भरलेला असेल जिल्हास्तरावरुन त्याची पडताळणी झाली असेल तर त्या शाळांना K.Y.C. फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.)
शाळेचे नोडल ऑफिसर व शाळेचे मुख्याध्यापक यांची आधार नुसार माहिती भरण्याची प्रक्रिया.

• सन २०२४-२५ साठी प्रत्येक शाळेने Login केल्यानंतर शाळेचे प्रोफाईल अद्यावत करणे बंधनकारक आहे. (शिष्यवृत्तीसाठी अर्ज नसले तरीही)

• शाळेचे Nodal Officer यांनी शाळेचा Login ID व Password वापरुन NSP पोर्टलवर शाळा Login करावे व शाळेच्या प्रोफाईल मध्ये शाळेची सर्व माहिती भरावी व शाळेच्या मुख्याध्यापक यांनी नेमलेल्या नोडल ऑफिसर यांची माहिती किंवा मुख्याध्यापक यांची माहिती आधार नुसार contact person details मध्ये भरावी. यामध्ये नोडल ऑफिसर यांचा आधार क्रमांक, आधार वरील नाव, जन्मतारीख, लिंग, आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक, पद इ. माहिती भरावी.

• नोडल ऑफिसर यांच्या मोबाईल क्रमांका वरती OTP येईल तो Verify झाल्यानंतर प्रोफाईल अद्यावत होईल.

Head Of Institution Details मधील माहिती यामध्ये बदल करावयाचा असल्यास नोडल ऑफिसर लॉगिन मधून प्रोफाईल अपडेट करणे बंधनकारक आहे. नोडल ऑफिसर लॉगिन मधून प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर हेड लॉगिन मधून शाळेच्या कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापक यांची माहिती आधार वरील माहिती नूसार अद्यावत करावी.

• शाळेचे नोडल ऑफिसर व मुख्याध्यापक बदलले असल्यास नविन कार्यरत असणारे नोडल ऑफिसर यांची माहिती आधार नुसार इनस्टिटयूट नोडल ऑफिसर लॉगिन मधून व मुख्याध्यापक यांची माहिती आधार नुसार इनस्टिटयूट हेड लॉगिन मधून अद्यावत करण्यात यावी.

शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांचे E-KYC करण्याबाबत :-

शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांचे E-KYC करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी आयोजित केलेल्या

कॅम्पमध्ये जाऊन बायोप्रमाणिकरण द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी किंवा Face Authentication द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी मोबाईल वर गुगल प्ले स्टोअर मधून NSP FaceAuth हे अॅप्लिकेशन Install करावे व शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांचे लॉगिन करुन Face Authentication प्रक्रिया पूर्ण करावी. याबाबत अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याशी संपर्क साधावा.

NSP Portal वरील शाळा स्तरावरील कामकाज :-

१. शाळेची KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास KYC प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, २. शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांचे E-KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास E-KYC प्रक्रिया पूर्ण

करण्यात यावी.

३. नोडल ऑफिसर यांचा आयडी व पासवर्ड प्राप्त झाल्यानंतर एन.एस.पी. पोर्टलवर नोडल ऑफिसर यांच्या लॉगिन मधून Administration या मेनू अंतर्गत Add update Details या मेनूमधून आवश्यकतेनुसार

Course Level निवडणे, शाळेचे वर्ग वाढविणे, वर्गानुसार शुल्क update करणे इ. प्रक्रिया पूर्ण करावी. ४. विद्यार्थी/विद्यार्थीनीचे नवीन व नुतनीकरणाचे प्राप्त अजांचे शिष्यवृत्तीच्या निकषानुसार व कागदपत्रांनुसार पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी.

NSP Portal वरील जिल्हा स्तरावरील कामकाज :-

१. शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांचे आयडी, पासवर्ड आधारवरील माहितीची पडताळणी करुन Reset करणे,

२. शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांचे E-KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास E-KYC प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी.

३. शाळेची KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास KYC प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी.

४ . शाळेचे नोडल ऑफिसर बदलले असल्यास पूर्वीचे नोडल ऑफिसर Administration या मेनू अंतर्गत

Detach INO for Institute या मेनूआधारे Detach करावे. ५. विद्यार्थी/विद्यार्थीनीचे नवीन व नुतनीकरणाचे प्राप्त अर्जाचे शिष्यवृत्तीच्या निकषानुसार व ऑनलाईन अपलोड केलेल्या कागदपत्रांनुसार पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी.

६. संचालनालय स्तरावरुन वेळोवेळी निर्देशित केलेल्या सूचनांनुसार अंमलबजावणी करावी.

सन २०२४-२५ मधील एन.एस.पी पोर्टल वरील ठळक वैशिष्ट्ये - . आधार नुसार बायोप्रमाणीकरण (चेहरा प्रमाणीकरण (Face Authentication १

)) करण्यात येईल. २. One Time Registration (OTR) ची सुविधा देण्यात येईल, या आधारे विद्यार्थ्याला त्याच्या सर्व शिष्यवृत्तीची माहिती घेता येईल ३. OTR विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत वैध राहील.

४. १८ वर्षावरील विद्यार्थ्यांना आधार अनिवार्य आहे. परंतु १८ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या विद्यार्थ्यांचे आधार नसल्यास, EID नसल्यास पालकांचे आधार वापरता येईल. (अर्जामधील नमूद आधार लिंक बैंक खात्यामध्ये शिष्यवृत्ती रक्कम जमा करण्यात येईल.)

५. ज्या विद्यार्थ्यांनी EID वापरुन अर्ज भरले आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात ३१ ऑक्टोबर पूर्वी आधार सबमिट करावे लागेल.

६. ज्या विद्यार्थ्यांनी EID वापरुन अर्ज भरले आहेत परंतू आधार सबमिट केलेले नाहीत त्यांची शिष्यवृत्ती रक्कम जमा करण्यात येणार नाही.

७. शिष्यवृत्तीची रक्कम Aadhar Based Payment System (ABPS) द्वारेच वितरीत करण्यात येईल,

महत्वाच्या बाबी -
> असे लक्षात आले आहे की, शिष्यवृत्तीसाठी शाळास्तरावरती प्राप्त झालेले अर्ज पडताळणीची अंतिम मुदत संपूनही शाळास्तरावर नविन व नूतनीकरणाचे अर्ज पडताळणीसाठी मोठया प्रमाणावर प्रलंबित राहिलेले आहेत. सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक/योजना यांनी संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थी / विद्यार्थीनींचे अर्ज विहीत मुदतीमध्ये पडताळणी पूर्ण करण्याबाबत सूचना द्याव्यात.

➤ शाळा स्तरावरुन विद्यार्थी / विद्यार्थीनीचे अर्ज तपासताना संबंधित सर्व कागदपत्रे तपासावीत तसेच विद्याथी / विद्यार्थीनी शाळेमध्ये शिक्षण घेत आहे याची खात्री करावी. शाळास्तरावरती एकही अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी मुख्याध्यापक यांनी घ्यावी. कागदपत्रावरील माहिती व अर्जामधील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची विद्यार्थी / विद्यार्थीनींना एक संधी देण्यात यावी. विद्यार्थी / विद्यार्थीनी शाळेत शिक्षण घेत नसल्यास अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज डिफेक्ट करुन आवश्यक ती दुरुस्ती पूर्ण करावी. 
➤ NSP 2.0 Portal वर विद्यार्थी विद्यार्थीनींचे अर्ज कोणत्याही एका शिष्यवृत्तीसाठी भरण्यात यावा. (एकापेक्षा अधिक शिष्यवृत्ती अर्ज भरु नये)
▶ ज्या शाळा बंद झालेल्या आहेत किंवा ज्या शाळांना शासनाची मान्यता नाही अशा संबंधित शाळांमधून शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारु नये तरीही अशा शाळांमधून अर्ज आले असल्यास किंवा शाळेत वर्ग नसतानाही त्या वर्गामधून अर्ज प्राप्त झाल्यास असे सर्व अर्ज डिफेक्ट करुन आवश्यक ती दुरुस्ती पूर्ण करावी.

> शाळांचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर तसेच जिल्हयाचे नोडल ऑफिसर यांची आधार नुसार माहिती NSP 2.0 या पोर्टलवर भरावी.

> विद्यार्थ्याने नवीन मधून अर्ज करत असताना सर्व कागदपत्रे शाळेमध्ये देणे बंधनकारक आहे. तसेच शाळेने किमान ५ वर्ष सर्व कागदपत्रे इयत्तानिहाय, वर्षनिहाय जतन करुन ठेवावे. नुतनीकरण विद्यार्थ्यांसाठी सर्व कागदपत्रे घेण्याची आवश्यकता नाही. सदर विद्यार्थ्यांने नविन मध्ये अर्ज करत असताना दिलेल्या कागदपत्रामध्ये काही बदल असल्यास संबंधित कागदपत्रे शाळेमध्ये विद्यार्थ्यास जमा करावे लागतील.

➤ विद्याथ्यांची Digi Locker मध्ये आधार नुसार A/c open करावे व सर्व कागदपत्रे यामध्ये store करुन ठेवण्यात यावे, विद्याथ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत असताना Digi Locker चे A/c आधार सोबत अर्जामध्ये जोडण्यात यावे. जेणेकरुन शाळा व जिल्हा स्तरावरुन सर्व कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करता येईल.

➤ शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व पात्र इच्छुक विद्याथी/विद्यार्थीनींचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात याव्यात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यात येतील याची दक्षता घ्यावी.

> विद्यार्थ्याने कोणत्याही कारणास्तव शाळा बदलल्यास विद्यार्थी पूर्वी ज्या शाळेत शिक्षण घेत होता त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांला दाखला देत असताना विद्यार्थी कोणत्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहे किंवा विद्यार्थ्यांचा नूतनीकरणामध्ये शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणे आवश्यक आहे त्या शिष्यवृत्तीचे माहिती, निकष आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया इ. माहिती सोबत पत्राद्वारे देण्यात यावी. केंद्रशासनाकडून शिष्यवृत्तीचे निकष, आवश्यक कागदपत्रे यामध्ये काही बदल झाल्यास तसेच

अंमलबजावणीबाबतच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर यथावकाश कळविण्यात येईल. सोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्र-अ, प्रपत्र-व मध्ये शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची

माहिती भरण्यात यावी. तसेच सोबत जोडलेले प्रमाणपत्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडून भरुन
घेण्यात यावे.

शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन अर्ज विहित कालावधीमध्ये भरण्याची जबाबदारी विद्यार्थी ज्या शाळेमध्ये सध्या शिक्षण घेत आहे त्या शाळेचे प्राचार्य/मुख्याध्यापक यांची राहील. तसेच संबंधित शाळेकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरुन घेणे, अर्जाची पडताळणी पूर्ण करुन घेणे इत्यादी जबाबदारी शिक्षणाधिकारी योजना यांची राहील. विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहील्यास संबंधितांवार नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.

सोबत आवश्यक विहित प्रपत्र व प्रमाणपत्र जोडले आहेत.

१. प्रपत्र अ, प्रपत्र व.

२. प्रमाणपत्र . योजनेचा फ्लो चार्ट

४. एन.एस.पी पोर्टलवरील कामकाजाचा फ्लो चार्ट

५. एन.एन.एम.एस निकालामध्ये नावात दुरुस्तीबाबत अर्जाचा नमुना
६. DNO/HOI/INO यांचा आयडी, पासवर्ड मिळविण्यासाठीचा अर्जाचा नमुना. 
७. एन.एस.पी पोर्टलवर शाळा विलिनीकरण झाली असल्यास अर्जाचा नमुना.
८. एन.एस.पी पोर्टलवर बंद झालेल्या शाळेचे INO Detach करण्याबाबतचा अर्जाचा नमुना.
९. वार्षिक वेळापत्रक

डॉ. महेश पालकर
शिक्षण संचालक
शिक्षण संचालनालय (योजना),
महाराष्ट्र राज्य, पुणे.


संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय माध्यम-सह-मेरीट शिष्यवृत्ती योजनेसाठी (NMMSS) शेक्षणिक प्रकल्प वर्ष २०२३-२४ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP 2.0) वर नवीन व नुतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता पोर्टल उघडणेबाबत केंद्र शासनाने निर्देशित केलेले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता डी बी टी मिशन, कॅबिनेट सचिवालय यांनी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाशी सदर प्रकरणी चर्चा केली व उक्त कार्यवाही करण्याकरीता कालमर्यादा ठरवून दिलेल्या आहेत, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी एनएसपी पोर्टल साठी ठरविण्यात आलेल्या कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वरील बाबी लक्षात घेता, केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित जिल्हयांनी नवीन व नुतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीची कामे उक्त प्रमाणे निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, तसेच यावर्षी कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.


तसेच उक्त कार्यवाही करतांना केंद्र शासन स्तरावरून दिलेल्या दुरध्वनी संदेशाद्वारे कळविण्यात येते की, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील शिष्यवृत्तीस पात्र विद्याध्योनी अर्ज नुतणीकरण करतांना ज्या विद्याथ्यांचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP 2.0) वरील नाव व जन्मतारीखही आधार नुसार जुळत नसल्यास त्या विद्याथ्यांचे आधार व जन्मतारीख पडताळणी करून सोबत दिलेल्या विहित प्रपत्रात माहिती सादर करण्यात यावी, सदर माहिती केंद्र शासनास पाठविण्यात येत असल्याने विहित केलेल्या प्रपत्राच माहिती दिनांक १०.११.२०२३ पुर्वी संचालनालयास सादर करण्यात यावी. तसेच सोबत देण्यात आलेल्या गुगल लिंकवरही माहिती भरावी. विहित केलेल्या कालावधीनंतर माहिती संचालनालयास प्राप्त झाल्यास सदर माहितीचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdR9Ba8egECLTBLoEDoQ/viewform?usp=sflinkBVGidLo3CDs40


(डॉ महेश पालकर)

शिक्षण संचालक (योजना)

महाराष्ट्र राज्य, पुणे-१


 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMSS) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर ऑनलाईन अर्ज भरणेबाबत शिक्षण संचालक योजना यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेसाठी ( NMMSS) शैक्षणिक प्रकल्प वर्ष २०२३-२४ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर नवीन व नुतणीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता पोर्टल उघडणेबाबत केंद्र शासनाने निर्देशित केलेले आहे.


शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता डी बी टी मिशन, कॅबिनेट सचिवालय यांनी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाशी सदर प्रकरणी चर्चा केली व उक्त कार्यवाही करण्याकरीता कालमर्यादा ठरवून दिलेल्या आहेत, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी एनएसपी पोर्टल साठी ठरविण्यात आलेल्या कालमर्यादा खालील प्रमाणे आहेत.


Opening of Portal

1st October, 2023

Last date for INO Level Verification


 31St November, 2023

15th December, 2023

Last date for Application submission

30th December, 2023

Last date for Second Level Verification

शैक्षणिक वरील बाबी लक्षात घेता, केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित जिल्हयांनी नवीन व नुतणीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीची कामे उक्त प्रमाणे निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, तसेच यावर्षी कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी..


शैक्षणिक वर्ष २०२३ २४ साठी नोंदणी करतांना वय वर्ष १८ पूर्ण असणे आवश्यक असून त्याचे आधार असणेही अनिवार्य आहे. ज्या विद्याथ्र्यांनी अदयापही आधारकार्ड काढलेले नाही, त्या विद्याथ्र्यांनी आधारकार्ड साठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे तसेच त्यांनतर नावनोंदणी ( eKYC) वापरून पोर्टलला नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर आधार बाबत संपूर्ण तपशिल सबमिट होईपर्यंत आणि ई के वाय सी होईपर्यंत सदर विद्यार्थ्यांची नोंदणी तात्पुरती असेल. शिष्यवृत्ती पात्र / अपात्र या बाबीसाठी आधार महत्वाचे असेल.


अल्पवयीन अर्जदारांसाठी सर्व अर्जदार ज्यांनी नोंदणीच्या तारखेला १८ वर्षाचे वय पूर्ण केले नाही, त्यांना :


त्यांच्या पालकांच्या / कायदेशीर पालकांच्या संमतीने ऐच्छिक आधारावर आधार वापरून नोंदणी करण्यास प्रोत्साहित केले जाईल. जर अशा अर्जदारांना आधारकार्ड दिलेले नसेल तर ईआयडी वापरून नोंदणी करता येऊ शकेल, तथापि सदर प्रकरणी अल्पवयीन अर्जदारांना आधारकार्ड प्रदान केलेला नसेल, किमान एक पालक किंवा कायदेशीर पालकांचा आधारकार्ड चा वापर करता येईल. अशा प्रकरणी एक पालक किंवा कायदेशीर पालकांना लाभार्थी मानले जाईल, अल्पवयीन विद्याथ्यांनी आधारकार्ड शिवाय नोंदणी केल्यास, त्यांना ऐच्छिक आधारावर आधार जमा करण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी नियमित एसएमएस पाठविले जातील.


ईआयडी च्या बाबतीत आधारकार्ड होईपर्यंत शिष्यवृत्तीचे वितरण होणार नाही. दोन्ही प्रकरणांमध्ये आधार हस्तगत केला जात असल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र काढून टाकण्यात आले आहे.


केंद्र शासनाच्या दि. २१/०३/२०२२ परिपत्रकामधील खालील सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.


१. पालकाचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक


आहे.


२. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजना लागू आहे... ३. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र


आहेत.


४. इयत्ता १०वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल.


५. इयत्ता १०वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास ६० टक्केपेक्षा अधिक गुण (अनुसूचित जाती / जमातीच्या


विद्यार्थ्यास ०५ टक्के सुट.) इयत्ता ९वी मधून १०वी मध्ये गेलेले विद्यार्थी व ११वी मधून १२वी मध्ये गेलेले विद्यार्थी


प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे..


६. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे. ७. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे.


८. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.


९. विद्याथ्र्यांकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल. १०. जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्याची


शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसूली करण्यात येईल. ११. कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षांचे अंतर पडल्यास नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसंच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित केली जाऊ शकत


नाही. १२. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्याथ्र्यांचा दावा विचारात घेतला जाणार नाही.


ऑनलाईन माहिती भरण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत. १२) एखाद्या विद्यार्थ्याने चूकीची माहिती भरली असल्यास त्यास Defect करावे Reject करु नये. जो विद्यार्थी


शिष्यवृत्तीसाठी पात्रच नाही तरी पण त्याने माहिती भरली असल्यास त्यास Reject करावे. २) Registration Details मध्ये Community / Categary या कॉलम मध्ये विद्यार्थी ज्या प्रवर्गातून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. तो प्रवर्ग (SC/ST/OBC GENRAL) निवडावा. जे विद्यार्थी (SBC)/ VINTINT-1, NT-2, NT-3, NT-D) या प्रवर्गातून शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेले आहे त्यांनी जनरल हा प्रवर्ग निवडून माहिती भरावी.


3) Academic Details Competitive Exam Qualified 4 NMMSS fasa. Exam Conducted by मध्ये महाराष्ट्र टाकावे. Competitive Exam Roll No. मध्ये सन २०२२ परीक्षा दि.१९/०६/२०२२ इ.९ वी 

करीता ME/U वगळून फक्त संख्यात्मक १२ अंकी परीक्षा क्रमांक टाकणे आवश्यक आहे.

४) Admission Fees, Tution Fees, Mise Fees यामध्ये ० टाकण्यात यावा. यामध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये


(५) Basic Details मधील Marital Status मध्ये Unmarried निवडावे Parents Profession मध्ये Other हा पर्याय निवडावा. *) Previous Board/University Name Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary, Pune निवडावे.


शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा तपशील (IFSC CODE, BANK ACCOUNT NUMBER ETC) योग्य टाकण्यात यावा. सन २०२२ (Fresh) ची विद्याथ्यांची माहिती पोर्टल वर अपडेट झाली असून सदर पोर्टल हे ऑनलाईन व कालमर्यादित असल्यामुळे आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत येणाच्या प्रत्येक शाळेने पात्र विद्यार्थ्यांची अचूक माहीती पोर्टलवर विहीत मुदतीत भरणे बंधनकारक आहे. सदर विद्यायांची माहिती भरण्यास विलंब व कोणतीही टाळाटाळ झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेची व आपल्या कार्यालयाची राहील. शिक्षणाधिकारी कार्यालयाने त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शाळांचे प्रोफाईल अदयावत करणे / तपासण्याची कार्यवाही करावी...


करीता केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उपरोक्त वेळापत्रक आपल्या जिल्हयातील सर्व शाळा व INO / Hol यांना पाठविण्यात यावी. शिष्यवृत्तीधारक कोणताही विद्यार्थी हा ऑनलाईन माहिती न भरल्यामुळे शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील, याची नोंद घ्यावी.


(महेश पालकर) शिक्षण संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे-१





वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.