"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२" अभियान - शाळा मूल्यांकन सुधारित व अंतिम वेळापत्रक दि ०६/०९/२०२४

शिक्षण आयुक्तांनी दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन राबविणे बाबत शाळा मूल्यांकनाचे सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे निश्चित केले आहे. 


शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ मध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. या कार्यालयाच्या संदर्भ क्र.२ व ३ वरील पत्रान्वये या बाबतच्या सविस्तर सूचना व शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरील मूल्यांकन यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे.

२/- सदर अभियानांतर्गत सदयस्थिती शाळास्तरावरुन माहिती भरण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले होते. तथापि, या बाबत अनेकवेळा सूचना देऊनही अदयापही शाळांकडून माहिती भरुन तो अंतिम केलेली नाही. त्याअनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

अ) सदर अभियानात भाग घेणाऱ्या ज्या शाळांनी आपली माहिती अपूर्ण भरलेली असेल, त्या सर्व शाळांची माहिती राज्यस्तरावरून दि.०६/०९/२०२४ रोजी आहे त्या स्थितीत अंतिम करण्यात येणार आहेत. यानंतर या शाळांच्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. व सदरची शाळा मूल्यांकनासाठी केंद्र प्रमुख यांच्या लॉगिनला पाठविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

ब) या अभियानात शाळांचा मागील वर्षी (सन २०२३-२४ मध्ये) प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा निम्न क्रमांकासाठी या वर्षीच्या अभियानात विचार केला जाणार नाही. या वर्षीच्या मूल्यांकनात मागील वर्षातील स्तरापेक्षा (क्रमांक) वरच्या स्तरावरील क्रमांक मिळविण्यास या वर्षीच्या निकषाप्रमाणे शाळा पात्र होत असल्यास त्या क्रमांकास शाळा पात्र असतील.

३/- मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे सुधारित वेळापत्रक (अंतिम) :

अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा दिनांक ०६/०९/२०२४

ब) प्रत्येक स्तरावरील मूल्यांकनांचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे राहील.


मूल्यांकनाचा अंतिम दिनांक


 केंद्रस्तर

सोमवार, दि.०९/०९/२०२४. सायं.०५.०० वा. पर्यंत गुरुवार,

तालुकास्तर

 दि.१२/०९/२०२४, सायं. ००५.०० वा. पर्यंत

मनपा/जिल्हास्तर

सोमवार, दि. १६/०९/२०२४, सायं.०५.०० वा. पर्यंत

विभागस्तर

गुरुवार, दि. १९/०९/२०२४, सायं.०५.०० वा. पर्यंत

राज्यस्तर

सोमवार, दि. २३/०९/२०२४, सायं.०५.०० वा. पर्वत


४/- वरील सुधारित वेळापत्रक हे अंतिम असून यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तरी, उक्त सूचना व सुधारित वळापत्रकानुसार सर्व शाळांची वेळेत माहिती भरली जाईल व प्रत्येक स्तरावर शाळांचे योग्य पध्दतीने मूल्यांकन पादृष्टीने कार्यवाहो करण्याची दक्षता घ्यावी. जाईल


अस्पचन (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे


संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


 मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ अभियान शाळा मूल्यांकन सुधारित वेळापत्रक 

शिक्षण आयुक्त यांनी  "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन" रबविणे बाबत पुढील प्रमाणे सुधारित आदेश दिले आहेत.


सुधारित शाळा मूल्यांकन वेळापत्रक :

अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा दिनांक ०२/०९/२०२४

ब) केंद्रस्तर : दि.१०/०८/२०२४ शनिवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दि.०६/०९/२०२४ शुक्रवार सायं. ०५.०० वा. पर्यंत क) तालुका : दि.१५/०८/२०२४ गुरुवार (केंद्र पातळीवरुन अंतिम झालेली) ते दि.०८/०९/२०२४ रविवार सायं. ०५.०० वा. पर्यंत

ड) जिल्हा :

दि.२०/०८/२०२४ मंगळवार (तालुका पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि.११/०९/२०२४

बुधवार सायं. ०५.०० वा. पर्यंत

३)मनपा : दि. २०/०८/२०२४ मंगळवार (युआरसी पातळीवरुन अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन) ते दि.११/०९/२०२४ बुधवार

सायं. ०५.०० वा. पर्यंत

ई) विभाग: दि. २५/०८/२०२४ रविवार ते दि.१५/०९/२०२४ रविवार सायं.०५.०० वा. पर्यंत उ) राज्य : दि. ३०/०८/२०२४ शुक्रवार ते दि. १९/०९/२०२४ गुरुवार सायं.०५.०० वा. पर्यंत





महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी दिनांक 29 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा-२ राबविणेबाबत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. , २) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, पुणे, ३) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे, ४) शिक्षण संचालक (योजना), शिक्षण संचालनालय, पुणे., ५) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व), ६) आयुक्त, मनपा (सर्व), ७) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व), ८) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व), ९) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व), १०) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) जिल्हा परिषद (सर्व), ११) शिक्षण निरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) बृहन्मुंबई, १२) मुख्याधिकारी, नगरपालिका (सर्व), १३) गटविकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व) यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ २. शासन निर्णय, क्रमांक: मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६, दिनांक २६ जुलै, २०२४

विषयांकित प्रकरणी, संदर्भ क्र.१ वरील शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी पेक्षा अधिक विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी

ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे. त्याबददल आपल्या सर्वांचे अभिनंदन ! २/- या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.

३/- उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन २०२४-२५ देखील "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्यावाचतचा संदर्भ क्र.२ वरील शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये अभियानाची व्याप्ती, अभियानाची उदिदष्टे नमूद करण्यात आलेली आहेत. १. "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २० या अभियानाचा कालावधी दि.५ ऑगस्ट २०२४ ते दि.०४ सप्टेंबर २०२४ या दरम्यान एक महिना कालावधीसाठी राहील.

२. शाळा मूल्यांकनासाठी अ) पायाभूत सुविधा ३३ गुण ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण क) शैक्षणिक संपादणूक ४३ गुण यानुसार एकूण १५० गुणांसाठी मूल्यांकन करण्यात येईल.

३. सोबत जोडलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.

४. वरील संपूर्ण अभियान कार्यकाळात समिती बैठका आयोजन, शासन निर्णयाची अंमलबजावणी, शासनाच्या वेळोवेळी येणा-या सूचनांची अंमलबजावणी समिती अध्यक्षांच्या नेतृत्वात पूर्ण करणे निर्णयाची सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सदस्य सचिव यांची राहील. नजिकच्या नियंत्रण अधिका-यांनी अभियानाच्या यशस्वीतेकरीता सर्वतोपरी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. ५. अभियानाकरीता मंजूर करण्यात आलेला निधी कोषागारातून आहरित करणे, सर्व क्षेत्रिय कार्यालयांना आवश्यकतेनुसार आयुक्त यांचे मान्यतेने वितरित करणे, निधीचा विनियोग योग्य पध्दतीने होत आहे याची शहानिशा करणे शासनाकडून आवश्यक त्या निधीकरिता पाठपुरावा करणे या सर्व बाबीसाठी लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी संचालक (प्राथमिक) यांच्या संनियंत्रणाखाली सदर कामकाज विहित मुदतीत पूर्ण करावे.

६. अभियानाची राज्य स्तरावरील व्यापक प्रचार-प्रसिध्दी सर्व घटकांपर्यंत करण्याबाबतची जबाबदारी संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्याकडे देण्यात येत आहे.

७. तालुका/जिल्हा/मनपा/विभाग स्तर व राज्य स्तरावरील कार्यालयांमध्ये अभियान कक्षाची निर्मिती करण्यात यावी. अनुक्रमे सदर जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्रशासन अधिकारी (मनपा), विभागीय शिक्षाण उपसंचालक व राज्य स्तरावर सहसंचालक (अंदाज व नियोजन) यांची राहील.

८. अभियानाकरिता आवश्यक असणारे मनुष्यबळ घेण्याची मुभा सर्व स्तरावरील कार्यालय प्रमुख यांना असेल, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शालेय पोषण आहार, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक व अन्य विभागस्तरावर विविध शासकीय कार्यालय,

उदा. राज्य विज्ञान संस्था, मिपा इ. यामधील मनुष्यबळ आवश्यकतेनुसार अधिनस्त कार्यालयास तथा विभागातील उपसंचालक यांच्या कार्यालयात घेण्याची परवानगी देण्यात येत आहे. या बाबत समन्वय अधिकारी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक यांना नेमण्यात येत आहे, विभागीय उपसंचालक यांनी प्रकरणी दक्षतापूर्वक आवश्यक ते आदेश वेळोवेळी निर्गमित करावेत.

९. मूल्यांकन समितीने आवश्यकतेनुसार शाळा मूल्यांकनाची पध्दती प्रत्येक स्तरावर निश्चित करावी. १०. 'सरल प्रणाली' मधील शाळा (संकेतस्थळ) पोर्टलवर मूल्यांकनाकरीता व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक शाळा स्तरावर शाळा लॉगिनमध्ये या अभियानाच्या मूल्यांकनाची प्रश्नावली समोर पीडीएफ छायाचित्र व त्यासमोर शब्दांत विवरण नमूद करण्याचो सुविधा देण्यात आलेली आहे. यूजर मॅन्युअल (User Manual) तयार करुन ते संकेतस्थाळाबर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

११. वरीलप्रमाणे संपूर्ण उपक्रमाचे संनियंत्रण व उक्त घटकातील आपसातील समन्वय या बाबत दैनंदिन देखरेख ठेऊन कार्यक्रम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविला जाईल याची दक्षता घेणे तसेच या बाबत सर्व टिप्पण्या/लेखे/सांख्यिकी माहितों संकलित करणे/जतन करणे व यासंदर्भात मा. मंत्री कार्यालय/मा. प्रधान सचिव व कार्यालय व आयुक्त यांना दैनंदिन अहवालाव्दारे अवगत करणेसाठी शिक्षण उपसंचालक (मुख्यालय) यांना कार्यक्रम समन्वय अधिकारी म्हणून पदनिर्देशित करणेत येत आहे.


४/- या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करुन ते सोबत जोडले आहे. शासन निर्णय, दिनांक २६.०७.२०२४ अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करुन माहिती अंतिम करावयाची आहे.


५/- सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरुपाचे असून त्याचा मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थिती बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही, याची देखील नोंद घ्यावी. या बाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचित करावे.


वरीलप्रमाणे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीनुसार व कार्यपध्दतीनुसार विहित वेळापत्रकाप्रामणे कामकाजाचे अचूक नियोजन करुन सदर टप्पा-२ अभियान हे यशस्वीरित्या पार पाडले जाईल याची सर्वानी वैयक्तिकरित्या दक्षता घ्यावी.


( आयुक्त (शिक्षण)

- महाराष्ट्र राज्य पुणे


प्रत माहिती व पुढील कार्यवाहीसाठी,

१. वरिष्ठ तांत्रिक संचालक, एनआयसी, पुणे

. श्री. मुकुंद साईनकर (से.नि. अधिकारी) समन्वयक, एनआयसी, पुणे २

प्रत - १. श्री. अमोल हुक्केरीकर, विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई

२. स्विय सहायक, मा. मंत्री (शालेय शिक्षण) मंत्रालय, मुंबई ३२

३. स्विय सहायक, मा.प्रधान सचिव, (शालेय शिक्षण) मंत्रालय, मुंबई ३२


संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर Download क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.