Important Update - TC/LC वर नोंदवावा लागणार Permanent Education Number PEN MPSP प्रकल्प संचालकांचें निर्देश

 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी दिनांक 4 जुलै 2024 रोजी सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी कमी करण्याच्या अनुषंगाने शाळांना देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे दिल्या आहेत. 


सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही शाळास्तरावरून सुरू आहे. विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करीत असताना शाळा सोडून गेलेले विद्यार्थी Dropbox मध्ये जातात, जेणेकरून ज्या शाळेत प्रवेश घेतलेला आहे त्या शाळेला विद्यार्थी Import करणे सोयीचे होईल. यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०४ जुलै, २०२४ रोजीच्या अहवालानुसार ३१,९६,७८६ एवढे विद्यार्थी Dropbox मध्ये Import करण्यासाठी उपलब्ध आहेत.


Dropbox मधील विद्यार्थी कमी करण्याच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी शाळा सोडून जात असल्यास, विद्यार्थ्यांना Living Certificate/Transfer Certificate वर शाळेचा यु-डायस क्रमांक व Permanent Education Number (PEN) नोंदवावा, जेणे करून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांला शाळेत प्रवेश दिल्यानंतर यु-डायस प्लस प्रणालीमध्ये Import करताना अडचण येणार नाही. तरी आपल्या स्तरावरून Dropbox शून्य करण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.


सोबत : Dropbox Report.


(प्रदीपकुमार डांगे, भा.प्र.से.) 

राज्य प्रकल्प संचालक,

म.प्रा.शि.प., मुंबई.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.