Education Week 2024 - "शिक्षण सप्ताह" सातवा दिवस दिनांक 28 जुलै 2024 रोजी समाज सहभाग दिवस विद्यांजली पोर्टल लिंक उपक्रम व फोटो व्हिडिओ Upload Link

शिक्षा सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव

 दिवस सातवा 28 जुलै 2024


वि‌द्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागा‌द्वारे चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने, कार्यरत आणि सेवानिवृत शिक्षक, शास्त्रज, सरकारी/निमशासकीय अधिकारी, सेवानिवृत सशस्त्र दलाचे कर्मचारी, स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक, गृहिणी, आणि इतर कोणत्याही संस्था/समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करु शकता किंवा शाळेसाठी मालमत्ता/साहित्य/उपकरणे यांचे योगदान देऊ शकतात.


उ‌द्दिष्टे -

1. शाळांचे सक्षमीकरण करणे,

2. लोकसमुदायाच्या माध्यमातून शालेय

3. शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे.

4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण करणे.

वि‌द्यांजली कार्यक्रमाचा व्याप्ती व वाढवण्यासाठी शिक्षा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पुढील उपक्रमांचे आयोजन केले जावे.


1. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे.

https://vidyanjali.education.gov.in/

2. शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकांची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लिहिणे. 3. समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरुकता निर्माण करणे. त्यासाठी प्रभात फेऱ्या पथनाट्य, पोस्टर मेकिंग, विद्यांजली कार्यक्रमासंदर्भात घोषवाक्ये स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

4. वि‌द्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनो अभियान राबविणे.

6. शालेय परिपाठामध्ये शिक्षक, वि‌द्यार्थी व डायट मधील अधिकारी यांचे मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणे


7. विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाज माध्यमे, स्थानिक रेडिओ वाहिन्या, पी एम ई विद्या चॅनल्स यांच्या माध्यमातून जनजागृती करणे. 

8. शालेय स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची समाज माध्यमे व प्रसार माध्यमे या‌द्वारे प्रसि‌द्धी करण्यात यावी.


अपेक्षित परिणाम -

1. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी वाढेल

2. शाळांचे सक्षमीकरण होईल.

3. शाळा व समाज यामध्ये उत्तम नाते संबंध निर्माण होईल. 4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण होईल.


सामाजिक शास्त्र विभाग SCERTM


दि.22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह”  साजरा करणेबाबत  करण्यात आलेल्या अंमलबजावणीबाबतची दिननिहाय उपक्रम, छायाचित्रे व व्हिडिओ खालील दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावे. यासाठी प्रथम शाळेचा यु-डायस क्रमांक नमूद करण्यात यावा. 

https://shikshasaptah.com/shiksha-saptah





शिक्षा सप्ताह, 

दिवस सहावा 

वार शनिवार दि. २७/०७/२०२४


Eco clubs for Mission LIFE Day शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि #Plan14 Mother या अभियान अंतर्गत विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणीमाता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवार दि.२७/०७/२०२४ रोजी आयोजन करणे, अ) शाळेमध्ये Eco clubs for Mission LIFE या थीम अंतर्गत #Plant4 Mother अभियान आयोजित करण्यासाठी सूचना वृक्षारोपण मोहिमेचे दि.२७/०७/२०२४ रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे. शालेय परिसर, घर, सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे. शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबविण्यात यावी. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान ३५ रोपे लावावीत.

विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग: विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करावेत आणि त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावीत. यामुळे विद्यार्थी, त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल. नावांचे फलक लावणे विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावावा.

रोपाचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे:- विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक/अध्यक्ष/सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांमध्ये रोपाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी, पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करावी.

वरील उपक्रमाच्या अनुषंगाने-

१. जिओटॅग केलेले फोटो अपलोड करणे शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे जिओटॅग केलेले फोटो, सहभागी विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकर लिंकवर अपलोड करावेत. 

https://docs.google.com/spreadsheets/d/13mep-POy8gmyX5HR4D)Swob OztSub15eORBNrFMwo/edit?pid=15896978#gid=15896978

२. सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे या मोहिमेबद्दल संभाजात जाणीवजागृती होण्याच्या व इतरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो #Plant4 Mother आणि #एक पेड़ माँ के नाम हे हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करावेत.


च) शाळांमध्ये मिशन लाइफसाठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबतच्या सूचना

शाळांमधील मिशन लाइफसाठी इको क्लब विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात. हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी आणि परिसरातील समूहांच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वतर्नशैलीला प्रोत्साहित करते. इको क्लब है विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील, पर्यावरणविषयक संकल्पना आणि कृती जाणून घेण्यास सक्षम करतात. केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील ८२३२ शासकीय शाळा व CBSE व इतर व्यवस्थापनाच्या ५३८६ शाळांनी इको क्लबची स्थापना करावी.

मिशन लाइफसाठी इको क्लबची स्थापनाः विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी ज्या शाळांमध्ये इको क्लबची स्थापना केलेली नसेल त्या उर्वरित सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांनी मिशन लाइफसाठी इको क्लब स्थापन करावेत आणि इको क्लब पोर्टलवर नोंदणी करावी.

नेतृत्व :- शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन लाइफसाठी इको क्लबचे प्रमुख मार्गदर्शक असतील

आणि इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रमांचे आणि शैक्षणिक प्रगतीची देखरेख करतील. समन्वयकाची जबाबदारी मिशन लाइफसाठी इको क्लबचे समन्वयक म्हणून कामकाज करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेतील पदव्युत्तर शिक्षक (PGT) किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) यांची नियुक्ती करावी. या शिक्षकाकडे इको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि समन्वयकाची जबाबदारी देण्यात यावी. हे समन्वयक इको क्लबचे प्रकल्प, शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी यांच्या तपशीलवार नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनरावलोकनासाठी सादर करतील.


मिशन लाइफसाठी इको क्लबची रचना-

> इको क्लबमध्ये प्रत्येक इयत्तेतील ४-५ विद्यार्थी असतील.

> मिशन लाइफसाठी क्लबचे इको अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाईल

> शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करावे.

> ऊर्जा संवर्धन, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयांवर आधारित उपसमित्यांची स्थापना करावी.

> इको क्लव अंतर्गत उपक्रमाचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचे आयोजन करावे. प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावे.


दि.22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह”  साजरा करणेबाबत  करण्यात आलेल्या अंमलबजावणीबाबतची दिननिहाय उपक्रम, छायाचित्रे व व्हिडिओ खालील दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावे. यासाठी प्रथम शाळेचा यु-डायस क्रमांक नमूद करण्यात यावा. 

https://shikshasaptah.com/shiksha-saptah


शिक्षण सप्ताह

दिवस पाचवा

शुक्रवार दि. २६ जुलै २०२४

कौशल्य दिवस

सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण.


प्रस्तावना

शिक्षणाबद्दल जागृती व महत्व अधोरेखित करण्यासाठी शिक्षा सप्ताह हा कार्यक्रम या वर्षी भारतात साजरा करण्यात येत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात कौशल्य शिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी या आठवड्यात एक दिवस कौशल्य शिक्षणाबाबत विविध उपक्रम घ्यावयाचे आहे. या उपक्रमांतर्गत एक दिवस कौशल्य आणि डीजीटल शिक्षण यांतर्गत विविध उपक्रमाद्वारे २१ व्या शतकातील क्षमता व कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये साध्य करून त्यांना सक्षम करू शकतो.

कौशल्य शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यामध्ये रोजगारक्षमता वाढते, व्यक्तिमत्व विकास होतो व आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती अभ्यासक्रमामुळे त्यांना नेमके काय करायचे आहे याची दिशा मिळते, त्यांच्या करिअर मध्ये प्रगती करण्यास सहाय्य मिळते, उद्योजकीय कौशल्य निर्माण होऊन रोजगार निर्मिती करता येते. यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थी योगदान देऊ शकतो. विद्यार्थ्यामधील क्षमता व आवडीनुसार त्यांच्यामध्ये कौशल्य निर्मिती केल्यास व्यवसाय शिक्षणाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य होऊ शकतात.


पार्श्वभूमी

भारताची तरुण व उत्पादक वर्गातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांना भविष्यवेधी कौशल्यासंबंधी सक्षम करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५, शैक्षणिक धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३ यामध्ये शिक्षणासोबत कौशल्य विकसनाच्या महत्वावर भर देण्यात आलेला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यक्रमातील एक दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन विशेषत्वाने करायचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची ओळख करून देऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चे सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल.


याची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत :

१) जागृकता वाढविणे यांतर्गत विद्यार्थ्यांना विविध उपलब्ध कौशल्ये याबाबत माहिती द्यावयाची आहे.

२) सेतू निर्माण करणे - शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम यातील अंतर कमी करण्यासाठी तज्ञ प्रशिक्षक, संस्था आणि नियोक्ते याबाबत माहिती उपलब्ध करून देणे यात अपेक्षित आहे

३) आवड निर्माण करणे पारंपारिक व्यवसायाच्या पलीकडले व्यवसायाचे मार्ग शोधण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करणे यात अभिप्रेत आहे.

४) यशोगाथा कौशल्य शिक्षणातून समाजात यशस्वी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथेचा प्रसार यातून केला जाणार आहे.


कौशल्य दिवस या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमाचे शाळेत अयोजन करता येईल. खाली दिलेल्या उपक्रमाचे आयोजन करताना कोणत्या विद्यार्थी कृतीचा समावेश करता येईल याबाबत सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य प्राप्तीसाठी उपक्रमाचे आधीच नियोजन करणे शक्य होणार आहे. 

• कौशल्य शिक्षण दिवस उपक्रमांतर्गत खालील घटकांचा सहभाग घेण्यात यावा.

१) इयत्ता ६ वी ते १२ वी चे विद्यार्थी

२) पालक आणि शिक्षक

३) व्यावसायिक समुपदेशक

४) उद्योग प्रतिनिधी

५) शालेय प्रशासनातील घटक

६) शालेय शिक्षणाशी संबंधित व्यक्ती


• सदर कौशल्य विषयक उपक्रम राबवण्यासाठी खालील संस्थांचे सहकार्य घेता येईल.

१) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ

२) राष्ट्रीय व्यावसयिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद

३) PSS सेन्ट्रल इंस्तीत्युट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन

४) सेक्टर स्कील कौन्शील

५) स्थानिक उद्योग संस्था

६) संबंधित शिक्षण संस्था.

संबंधित उपक्रमाचा प्रचार

शाळा, समाज माध्यम, स्थानिक प्रसार माध्यम द्वारे संबधित उपक्रमांचा प्रसार करण्यात यावा.


• अध्ययन निष्पत्ती :-


१) विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागरुकता आणि आवड निर्माण होईल.

२) व्यावसायिक व कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून विविध उपलब्ध व्यवसायांची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.

३) शैक्षणीक संस्था, उद्योग संस्था, व्यवसाय शिक्षण संस्था यातील साहचर्य वाढीस लागेल.

४) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा २०२० चे कौशल्य शिक्षणाचा मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात समावेश करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.

कौशल्य दिवस हा उपक्रम राबविण्यासाठी वरील उपक्रमांचा समावेश करता येईल. याशिवाय उपलब्ध व स्थानिक परिस्थितीनुसार खालील उपक्रमांचा समावेश देखील करता येईल.

१) संवाद कौशल्य विक्री कौशल्य व विपणन कौशल्य यांची ओळख 

२) सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती 

३) निसर्ग व शेतीतून अध्ययन 

४) घरगुती कामातून शिकणे 

५) हॅके थॉन

६) प्रसार माध्यम आणि करमणूक 

७) डिझाईन 

८ ) माती काम कौशल्य 

९) बांबू कला कार्यशाळा 

१०) पिशवी निर्मिती कार्यशाळा 

११) सुरक्षित पाणी 

१२) मातीची सुपीकता 

१३) व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट 

१४) प्रथमोपचार कार्यशाळा 

वरील उपक्रम कसे घ्यावयाची त्यातून कोणते कौशल्य विद्यार्थ्यांनी प्राप्त करतील त्याचबरोबर याची कृती कशा पद्धतीने करावयाची याची संपूर्ण पीडीएफ सोबत जोडलेली आहे. 

दि.22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह”  साजरा करणेबाबत  करण्यात आलेल्या अंमलबजावणीबाबतची दिननिहाय उपक्रम, छायाचित्रे व व्हिडिओ खालील दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावे. यासाठी प्रथम शाळेचा यु-डायस क्रमांक नमूद करण्यात यावा. 


https://shikshasaptah.com/shiksha-saptah



शिक्षा सप्ताहः शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस चवथा


गुरुवार दि. २५ जुलै २०२४

सर्व शाळांमध्ये २५ जुलै २०२४ रोजी सांस्कृतिक दिन साजरा करणे.


NEP २०२० मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आली आहे. २२-२८ जुलै २०२४ दरम्यान शिक्षा सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजेच दि. २५ जुलै २०२४ रोजी देशातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जावा. हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात यावा. सांस्कृतिक दिनाची उद्दिष्टे

१. सांस्कृतिक दिवसांमध्ये विविधता, जागतिक जागरुकता, परस्पर आदर, सर्जनशीलता, अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेच्या प्रचार करणे.

२. कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमांद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनविणे.

३. शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे.

हा उपक्रम सुसंवाद आणणे, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे, विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे, अभिव्यक्तीला चालना देणे, सौहार्दपूर्ण वातावरणास प्रोत्साहन देणे आणि कोणत्याही निर्बंधांशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे या दिशेने देखील प्रयत्न करेल.

त्यासाठी पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा. > शाळांमध्ये विविध भाषा, वेशभूषा, खाद्यपदार्थ, कला, वास्तुकला, स्थानिक खेळ, चित्रकला, नृत्य, गाणी, नाट्य, लोक आणि पारंपारिक कला, पथनाट्य (नुक्कड नाटक), कठपुतळीचे कार्यक्रम, कथा-कथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. > लोक, प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम, सामुदायिक गायन, लोकनृत्य, शासीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इ. कलाप्रकारांतून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जावे.

> स्थानिक आणि पारंपारिक कलाकार/कारागीर आणि कलाकारांना शाळेत त्यांचे कला प्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावे. किंवा शाळा स्थानिक कलाकार/कारागीर आणि कलाकारांशी संवाद साधण्यासाठी भेटींचे आयोजन देखील करू शकतात.

> संपूर्ण शाळेत पेंटिंग डे' किंवा शाळेच्या परिसराचे संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करावे. जेथे सर्व मुले आणि कर्मचारी सदस्य त्यांच्या आवडीच्या रंग आणि माध्यमांसह काम करण्याचा आनंद घेऊ शकतात.

> सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात. स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बाल भवन आणि बाल केंद्र, पुरातत्व स्थळे, विविध प्रकारची संग्रहालये इत्यादींचे सहकार्य घेण्यात यावे.


उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे

१. राज्य/संघ शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपक्रम राबवले जातील. तथापि, अशा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचा सक्रिय सहभाग असावा.

२. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की उत्सव नाविन्यपूर्ण, सर्जनशील असावा ३. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

४. विशेष गरजा असलेल्या मुलांचा (CWSN) सहभाग लक्षात घेऊन सर्व कार्यक्रमांची रचना करण्यात यावी.



दि.22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह”  साजरा करणेबाबत  करण्यात आलेल्या अंमलबजावणीबाबतची दिननिहाय उपक्रम, छायाचित्रे व व्हिडिओ खालील दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावे. यासाठी प्रथम शाळेचा यु-डायस क्रमांक नमूद करण्यात यावा. 

https://shikshasaptah.com/shiksha-saptah


परिशिष्ट-३


शिक्षा सप्ताहः शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव

 दिवस तिसरा बुधवार दि. २४ जुलै २०२४


क्रीडा दिन

नवीन राष्ट्रीय धोरण (NEP 2020) गध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व कीडा आधारित अध्ययन याचा महत्यपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवीन राष्ट्रीय धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्य देण्यात आले आहे. या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती, लोककला यांचा परिचय उत्तम रितीने होऊ शकतो असे या पोरणात अधोरेखित करण्यात आले आहे.

या अनुषंगाने केंद्र शारानाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने २१ ऑगस्ट २०२३ रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत. उद्दिष्ट्ये:- विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवस्थेपासूनच खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे यासाठी-

१. खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्याबद्दल जागरुकता चाढविणे. 

२. समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे.

३. तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे.

४. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे

५. खेळ हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे,

६. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी. (विशेषता भारताचे स्वदेशी खेळ)

७. विद्यार्थ्यांमध्ये अभिमान, खिलाडूवृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे

८. विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या तंदुरुस्त बनवणे.

९. विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढवणे.

१०. खेळातून विद्यार्थ्यामप्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजविणे.

शिक्षण सप्ताहाच्या तिसन्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे. त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असे म्हंटले आहे. या अनुषंगाने पुढील गार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.

> शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील १ ते २ तासामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे.

> इयत्ता १ ली ते ५ वी साठी सापशिडी, पत्ते, शर्यत, गोट्या, सागरगोटे, भोवरा, टिपरी, लगोरी, लंगडी, फुगडी, आंधळी कोशिंबीर, चमचा लिंबू, सुई दोरा, दोरीवरच्या उड्या अश्या प्रकारचे खेळ घ्यावेत.

> इयत्ता ६ वी ते १२ वी साठी बुद्धिबळ, सारीपाट, खो-खो, कबड्डी, विटी दांडू, भालाफेक, मल्लखांब, धावणे शर्यत, लंगडी, लगोरी, ३ पायांची शर्यत, लांब उडी व उंच उडी, लेझीम, हे खेळ घ्यावेत

> तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या ७५ स्वदेशी खेळांची यादी सोबत जोडण्यात आली आहे.

स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी. 

> शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघांचा,

खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा.

> स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू, शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी.

> पालक आणि नागरी समाज संस्था यांचे मदत्त घेण्यात यावी.

> सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समवेश करण्यात यावा.


अपेक्षित परिणामः-

विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल.

विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल.

वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव येईल.

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती, निष्पक्षता, संघकार्य आणि एकता ही मूल्ये रुजविली जातील.


परिशिष्ट क्र.२ शिक्षा सप्ताह दिवस दुसरा मंगळवार दि.२३ जुलै २०२४ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस


राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान :

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्राथमिक स्तरावर सन २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर धोरणातील महत्वपूर्ण कार्यनिती पुढीलप्रमाणेः

१) पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण (ECCE) याला प्राधान्यक्रम

२) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निपुण भारत अभियान म्हणून अंमलबजावणी (शासननिर्णय २७ ऑक्टोबर २०२१)

३) उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अध्ययन व अध्यापन साहित्य। चे विकसन

४) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान गतिमान करण्यासाठी नियमित मूल्यांकन

५) बालकांच्या घरातील अध्ययनाकरिता पालकांचा व समुदायाचा सक्रीय सहभाग

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे महत्व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता २ री च्या अखेरीस आकलनासह वाचन व मुलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणे होय. संबंधित कौशल्ये ही पुढील बाबीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतात.


बोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमतांचे विकसन

अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टीकोन व आत्मविश्वास निर्मिती

समतामूलक शिक्षणाची खात्री व अध्ययन अंतर कमी करणे.

शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणे.

सप्ताहाचा दुसरा दिवस हा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा.

उदिष्टे :

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक यशस्वी उपक्रम व कृती कार्यक्रम यांचे प्रदर्शन करणे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाण- घेवाण करणे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये शिक्षण तज्ञ, पालक व समुदाय यांचा सक्रीय सहभाग घेणे.


पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवसाकरीता आयोजित करावयाचे उपक्रम :

कार्यशाळा व परिसंवाद आयोजन: पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि आनंददायी अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा/परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्राचे आयोजन करावे.


बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचे आयोजन :

1. शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी.


https://www.youtube.com/watch%20?v=u4R9iLox3ik&t=9s&ab%20channel-%20NCERTOFFICIAL


२. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरिता राज्याद्वारे विकसित व वितरीत करण्यात आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका (मराठी, इंग्रजी, उर्दू) व जादुई गणित यामध्ये दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतले जावू शकतात. शाळेच्या सकाळच्या सत्रातील ३० मिनिटे भाषेचे तसेच ३० मिनिटे गणिताचे खेळ घेतले जावू शकतात.

३. वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता कथाकथनाचे व गणित तज्ञाच्या गोष्टीचे सत्र आयोजित करता येतील व संख्याज्ञानाची आवड निर्माण करण्याकरिता शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल.

४. जादुई पिटारा/PSE कीट : शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले PSE कीट / महाराष्ट्र शासनाचा जादुई पिटारा यामधील साहित्याच्या माध्यमातून पूर्वप्राथमिक स्तरावर लेखनपूर्व व गणनपूर्व कृत्ती करून घेण्यात याव्यात.

५. वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावरील संपर्क अधिकारी (नोडल अधिकारी) हे शात्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्र घेवू शकतात.

६. विद्यार्थ्यांना वर्गात, शाळेमध्ये समुदायाद्वारे विविध गोष्टीचे ऐकवाव्यात तसेच त्याचे वाचन करावयास लावाये व विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित वेविध प्रकारे अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देता येईल.

७. राज्याद्वारे पुरविण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून (जादुई पिटारा, पीएसइ संच) खेळाधारित अध्ययन / उपक्रम घेण्यात यावे तसेच बाहुलीनाट्थाचे सत्र आयोजित करता येईल.

८. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित भूमिका अभिनय, नृत्याचे कार्यक्रम तसेच मुळाक्षराची व अंकांची गाणी, विविध मुळाक्षराच्या व भौमितिक आकृत्याच्या रांगोळ्या, भाषा व गणित विषयातील संकल्पनेवर आधारित वर्ग सजायटी, पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशल्य निगडीत कृतीचे प्रदर्शन भरविण्यात यावे व याबाबत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कला व हस्तकौशल्याचा समावेश का करण्यात आला आहे या संदर्भाने जाणीव जागृती करता येवू शकते.

९. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याची उदिष्टे, महत्य व जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या चित्र फितीचे प्रक्षेपण करण्यात यावे.


9. https://www.youtube.com/watch?v=SOzerROJmXq&ab%20channel=NCE%20RTOFFICIAL


 २. https://www.youtube.com/watch?v=1%20HhhPPhQJdA&ab%20channel-NCE%20RTOFFICIAL


१०. शाळेमधील ग्रंथालयातील पुस्तके स्तरनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात यावीत व शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये घड्याळी एक तास वाचन तासिका घेण्यात यावी.

११. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या संदर्भाने निर्माण केलेले साहित्य व तदनुषंगिक बाबीच्या साह्याने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.

१२. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या अभियानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी निपुणोस्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील गणित या विभागामार्फत दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र यामधील उपक्रमांचा देखील समावेश करता येईल.

समुदायाचा सहभाग :

- शाळांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले माता पालक गटांचा शाळेतील सदर उपक्रमात सक्रीय सहभाग घेण्यात यावा.

- उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक ८,११ यामध्ये नमूद बाबीनुसार उपक्रमाचे आयोजन करून पालक व समुदायाचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.




शिक्षण सप्ताह 2024 पहिला दिवस इयत्ता निहाय उपक्रम.

सोमवार, दि. २२ जुलै, २०२४

अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM Day)(परिशिष्ट १)

प्रस्तुत दिन साजरा करण्यासाठी आणि त्यानुषंगाने वर्गनिहाय उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना/तत्त्वेः 

3.1 माध्यमिक स्तर (इयत्ता 11 वी आणि 12 वी):

1. पोपवाक्ये असलेने पोस्टर्सः 'पाणी कसे वाचवायचे" आणि "इतरांना कशी मदत करावी"

यासारख्या विषयावर आधारित पोस्टर्स बनविणे. 2. कोडी: विज्ञान आणि गणित या विषयांवर अधिक स केंद्रित असणारी फोडी तयार करायला सांगणे. 

3. खेळ (मैदानी/शारीरिक आणि डिजिटल स्वरूपाचे): सामाजिक शाखे, विज्ञान, गणित भाणि भाषां इत्यादी विषयांशी संबंधित खेळांचे आयोजन करणे.

4. त्रिमितीय प्रतिकृती (मॉडेल्स): ऐतिहासिक वास्तू, शारीरिक रचना किंवा भौमितिक आकारांचे त्रिमितीय मॉडेल तयार करण्यासाठी माती किंवा पेपर-मॅचे (कागदी लगदा) यासारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करणे,

5. बोर्ड गेम्स (पटावरील खेळ): अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याच्या दृष्टीने फॅब्रिक किंवा कार्डबोर्टवर (कापड किंवा पुठ्यावर) खेळ विकसित करुन शिकण्याच्या उद्देशांसह पटावरील खेळ तयार करणे,

6. भिंतीवरील तक्तेः महत्वाच्या संकल्पना किंथा ऐतिहासिक कालखंड/सनावळ्या सारांशित करणारे तजे तयार करण्यासाठी जुनी वर्तमानपत्रे किंवा कापड वापरणे. 7. बाचन कट्टा (क्लब): वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे.

3.2 पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तर (इयत्ता 6 वी आणि 10 वी): 1. फौटी आणि आव्हानात्मक कार्ड तयार करणे.

3. खेळणीः कागद आणि बांबूच्या कांड्या यासारख्या किंवा तत्सम प्रकारच्या स्थानिक

2. खेळ: ल्यूडो सारखे इतर खेळ तयार करणे. 

साहित्यापासून खेळणी बनविणे. 

4. कठपुतळी/बाहुलीनाट्यः कपडे आणि टाकाऊ वस्तूंनी कठपुतळी किंवा बाहुली बनविणे. 5. गोष्टीचे कार्डस (Story Cards): पाच ते सहा स्व-स्पष्टीकरणात्मक गोष्टींचे कार्डस तयार

6. तः बनविणेः "अन्न आणि भाजीपाला", "स्थानिक जारपेठ", "माझे कुटुंब इत्यादी विषयावर आधारित तक्ते बनविणे. 

7. वाचन कट्टा (क्लब): बाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे.

3.3 पूर्वतयारी स्तर (इयत्ता 3 री ते 5 वी): 1. तक्ते बनविणेः "अन्न आणि भाजीपाला", "स्थानिक बाजारपेठ", "माझे कुटुंब इत्यादी विषयाचे तक्ते बनविणे, 

2. रंगीत पेटी घन आणि आयताकृती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिकटवून मुले अशा पेठ्या तयार करू शकतात.

3. काउंनः फळे, भाज्या, प्राणी इत्यादींचे कार्ड बनवणे.

4. मुखवटेः प्राणी, पक्षी इत्यादींचे मुखवटे बनवणे,

5. वाचन मट्टा आणि कथाकथन सत्र यांचे आयोजन करणे.

3.4 पायाभूत स्तर (अंगणवाडी / बालवाडी (वय वर्ष 3 ते 6) आणि इयत्ता 1 ली व 2 री): 1. आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्य पेट्या उदा. PSE Kit, महाराष्ट्राचा

जादुई पिटारा, भाषा व गणित पेटी, इंग्रजी साहित्य पेटी (ELCRLM) तमेच इतर साहित्याच्या माध्यमातून कृती प्याव्यात.

2. पालक व शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या छोट्या नाटिकांचे वैयक्तिक अथवा गटामध्ये सादरीकरण घ्यावे.

3. विविध माध्यमांच्या सहाय्याने ठसेकाम करून घ्यावे. उदा. पाणी, फुले, भाज्या, बोटांचे व हातांचे ठसे याप्रमाणे वैविध्यपूर्ण साहित्याचे ठसे घेता येतीन.

4. पालक/शिक्षक/विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते, लोकनृत्य, सौकसंगीत सादरीकरण घ्यावे. 

5. गोष्टींचा कट्टा बालकांना स्थानिक व वैविध्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात यावे.

प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM DAY) साजरा करणे विषयी मार्गदर्शक सूचना शाळेत वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल म्हणून प्रदर्शन भरवावे. या प्रदर्शनामध्ये पुढील प्रमाणे स्टॉल्स मांडावेत. 

1. वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल्स वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शविणारे स्वतंत्र स्टॉल्स मांडण्यात पाषेत.

प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे द्यावीत. उदा. विविध भित्तीपत्रके असलेल्या स्टॉलला "चला शिकूया भित्तिपत्रकातून तर गोष्टीच्या स्टॉलला "चला गोष्टी ऐकूया", कठपुतळी किंवा पपेटच्या स्टॉलला "जर खेळणी बोलू लागली तर" अशी वैविध्यपूर्ण नावे द्यावीत.

2. शायरी बनवलेले शैक्षणिक साहित्य आशय शिकण्यासाठी व शिकविण्यासाठी उपयुक्त असणारे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध शैक्षणिक साहित्य यांचे प्रदर्शन भरवावे. 

3. संगीतमय शैक्षणिक साहित्य या स्टॉलवर शिक्षक व विद्यार्थी यांनी गाणी व संगीत वाद्ये यांचा अध्ययन -अध्यापनात प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने दिग्दर्शन करावे. 

4. हस्तलिखितांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी व कविता प्रदर्शित कराव्यात.

5. शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन विविध विषयाच्या अनुषंगाने प्रतिकृती, चार्ट्स, फ्लॅश कार्ड, तरंगचित्र, बाहुल्या अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करून प्रदर्शनात मांडावे. 

6. दिग्दर्शन वर्ग जवळची अध्यापक विद्यालये अथवा अध्यापक महाविद्यालये येथील छात्राध्यापकांच्या मदतीने नाविन्यपूर्ण अशा शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने असे वर्ग घ्यावेत अभषा त्यांना तसे स्टॉल लावण्याची संधी द्यावी.



 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ने दिनांक 16 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत.. दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक, सर्व प्रशासन अधिकारी, नपा/ नप/मनपा, सर्व शिक्षण निरीक्षक, (दक्षिण, पश्चिम व उत्तर) यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

संदर्भ: १. मा. सचिव, भारत सरकार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.D.O. No. ०२-०५/२०२४-IS.१४, दिनांक ०९ जुलै, २०२४. २. मा. उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२२८/ एस.डी. ४, दिनांक १२ जुलै, २०२४


महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण घोरण२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.

शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम रावण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.




मंगळवार, दि.२३ जुलै, २०२४

मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस (FLN Day) (परिशिष्ट २)


बुधवार, दि. २४ जुलै, २०२४

क्रीडा दिवस (Sports Day) (परिशिष्ट ३)


गुरुवार, दि. २५ जुलै, २०२४

सांस्कृतिक दिवस (Cultural Day) (परिशिष्ट ४)


शुक्रवार, दि. २६ जुलै, २०२४

कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस (Skilling and Digital Initiatives Day) (परिशिष्ट - ५अ ५ व)


शनिवार, दि.२७ जुलै, २०२४

मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम / शालेय पोषण दिवस (Eco Clubs for Mission LIFE/ School Nutrition Day) (परिशिष्ट ६)


रविवार, दि. २८ जुलै, २०२४

समुदाय सहभाग दिवस (Community involvement Day) (परिशिष्ट ७)


संदर्भ क्र. १ तसेच सोबतच्या परिशिष्ट १ ते ७ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षण सप्ताहामधील उपरोक्त तक्त्यातील उपक्रमांची अंमलबजावणी नेमून दिलेल्या कालावधीत आपण पूर्ण करावी.

शिक्षण सप्ताहादरम्यान आयोजित उपक्रमांची छायाचित्रे व माहिती Tracker वर upload करणेबाबत दिलेल्या विहीत नमुन्यामध्ये माहिती जतन करून ठेवावी व मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी.


16/07/24


(राहूल रेखावार)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र, पुणे.



वरील संपूर्ण परिपत्रक परिशिष्टांसह पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.