राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 18 जून 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, २) सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, ३) सर्व उपनियंत्रक शिधावाटप, मुंबई यांना शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न (Aadhar Seeded) करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ : १) सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र. मफुयो २०२३/ प्र.क्र.१६०/आरोग्य ६, दि.२८.०७.२०२३
२) राज्य आरोग्य हमी सोसायटी (SHAS) यांचे दि.१६.५.२०२४ चे पत्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.२६.०२.२०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दि.२८.०७.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
२. शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. करिता, शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न (Aadhar Seeded) करण्याची कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.
Signed by
Ashish Vasant Atram
कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन
प्रत -१) नियंत्रक शिधावाटप, मुंबई
२) सर्व उपायुक्त (पुरवठा)
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments