एसटी महामंडळाचे एक पाऊल पुढे; हजारो विद्यार्थ्यांना दिलासा!
बसमधून शाळेत ये जा करण्यासाठी परिवहन महामंडळकडून मुलींना मोफत तर मुलांना ३३ टक्के रक्कम भरून मासिक पास मिळतो. यासाठी पुर्वी विद्यार्थ्यांना आगारात जाऊन पाससाठी खेट्या माराव्या लागायच्या. परंतु, आता यावर्षीपासून 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' विशेष मोहीम सुरू केली असून, या अंतर्गत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना पास उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे बुडणार नाहीत तास, शाळेतच पास मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
खेड्यातून शहरात शिक्षणासाठी विद्यार्थी एसटी बसमधून ये-जा करतात. या विद्यार्थ्यांसाठी महामंडळाची मानव विकास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत एसटी पास याशिवाय मुलांसाठी एसटी महामंडळाकडून ६६.६७ टक्के इतकी सवलत म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त ३३ टक्के रक्कम भरून मासिक पास वितरित केली जाते. दरवर्षी विद्यार्थ्यांना बसस्थानकावर पाससाठी रांगा लावाव्या लागत होत्या. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे महामंडळाने यंदा शाळेतच पास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी प्रवास सवलती दिल्या जातात. विद्यार्थ्यांना यंदापासून शाळेतच पास मिळावी, यासाठी महामंडळाकडून नियोजन केले आहे. त्यामुळे शाळेतच पास मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बस पाससाठी जाणाऱ्या वेळेत बचत होणार आहे.
- ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक नियंत्रक
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments