ग्रामविकास विभागाच्या दिनांक 27 जून 2024 रोजी च्या परिपत्रकानुसार राज्य वेतन त्रुटी निवारण समिती 2024 कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित राहण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रति,
१) महाराष्ट्र राज्य वेतन त्रुटी कृती समिती
२) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, धंतोली, वर्धा जिल्हा वर्धा- ४४२००१
विषयः- राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित राहण्याबाबत
संदर्भ:- वित्त विभागाकडील दि.१४.०६.२०२४ रोजीचे पत्र (प्रत संलग्न)
महोदय,
उक्त संदर्भाधीन पत्रान्वये राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अध्यक्ष, वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत विभाग प्रमुख व अधिकारी/कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारीत वेळापत्रक देण्यात आले आहे. सदर बैठकीकरीता ग्राम विकास विभागास दि.०२.०८.२०२४ रोजी सकाळी ११.०० ते १.०० अशी वेळ देण्यात आली आहे. २. सातव्या वेतन आयोगामध्ये जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत निर्माण होणारी त्रुटी दूर करण्याबाबत मा. उच्च न्यायालय, खंडपीठ मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे रिट याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ समोर सादरीकरण करण्यासाठी खालील प्रतिनिधी यांना सुनावणीसाठी संधी मिळणेबाबत महाराष्ट्र राज्य वेतन त्रुटी कृती समिती यांनी ईमेलद्वारे कळविले आहे.
१. महेश सुंदरराव देशमुख
याचिका क्र. ११५१८/२०२२
२. संतोष सिताराम वारंग
याचिका क्र. ९८४२/२०२२
३. राजेश भास्कर दुर्गुडे
याचिका क्र. १०७१३/२०२२
४. विक्रम भिकाजी वागरे
याचिका क्र. ११४३६/२०२२
३. उपरोक्त बैठकीच्या वेळो आपल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने आपले म्हणणे समितीसमोर मांडण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीसह दि.०२.०८.२०२४ रोजी सकाळी ११.०० ते १.०० वाजता मंत्रालय, विस्तार इमारत, २ रा मजला, दालन क्र. २४१, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- ४०००३२ येथे (तसेच सादरीकरण करावयाचे असल्यास आगाऊ कळविण्यात यावे) बैठकीस वरील प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, ही विनंती.
आपला,
(सुभाष इंगळे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments