सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे निर्देश

 प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयातून दिनांक 13 जून 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करणेबाबत  प्राथमिक शिक्षण संचालकांनी १) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग) २) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) सर्व जिल्हे ३) प्रशासन अधिकारी, महानगरपालिका/नगरपालिका - सर्व ४) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक-१५/०६/२०२४ व विदर्भातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक ०१/०७/२०२४ रोजी प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सत्र २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी स्वागत करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पुढील प्रमाणे आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी.

१. शाळेच्या परिसरातील (वयोगट ६ ते १४ वर्ष) वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात यावी.

२. शाळाबाह्य झालेली किंवा असलेल्या बालकांचा शोध शाळापूर्व तयारीच्या कालावधी मध्ये करण्यात यावा.

निदर्शनास आल्यास अशा बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावेत. ३. नजीकच्या परिसरातील दगडखाणी, वीटभट्टी, बांधकामाचे स्थळ, उद्याने बाजारपेठा, पदपथ, सिग्नल, कुटीर उद्योग, कामगार वस्त्या या सारख्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे,

४. शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आपण व आपल्या अधिनस्त प्रत्येक अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे/शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन/प्रबोधन करावे. ५. विद्यार्थ्यांचे स्वागत फुल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य, स्थानिक स्रोत मध्ये उपलब्ध उपयोगी सामुग्री देऊन करण्यात यावे.

६. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, सदस्य, पालक व शिक्षक यांचेशी विचार विमर्श करून अध्ययन निष्पत्ती साठी उपाय योजना, सेतू अभ्यासक्रम, इतर विविध शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उद्बोधन व सहकार्य करावे.

७. शाळा प्रवेशोत्सावाच्या कार्यक्रमाची स्थानिक पातळीवरील प्रसार माध्यमाद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी. ८. शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थ्यांचे, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्त इत्यादी यांचे सहकार्य घेण्यात यावे.

९. शाळा सुरु होण्याच्या दिवशी शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून प्रभातफेरी आयोजन, विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत, मोफत पुस्तक वितरण, मोफत गणवेश इत्यादी कार्यक्रम आयोजित करावेत. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था (युवक मंडळे, क्रीडा मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ) यांचे सहकार्य घ्यावे.

१०. दिनांक १५ जून, २०२४ रोजी राज्यात शाळा प्रारंभ होत आहेत. हा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्यात शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करावा.

११. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधून या दिवशी मिष्ठान भोजन द्यावे.


(नंदकुमार बेडसे)

प्र. शिक्षण संचालक (प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे-०१


प्रत माहितीस्तव सविनय सादर मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, पुणे, महाराष्ट्र राज्य.



वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.