राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी च्या आदेशानुसार 15 एप्रिल ते 25 एप्रिल 2025 पर्यंत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती.
परंतु तांत्रिक कारणास्तव वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण दिनांक 21 एप्रिल पासून सुरू झाले त्यामुळे आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ऑनलाईन नोंदणीसाठीची शेवटची मुदत वाढवून ती 2 मे 2025 पर्यंत केली आहे.
दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी ज्या शिक्षकांना दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत वरिष्ठ वेतनश्रेणी साठी सेवेची बारा वर्षे पूर्ण झालेली आहे व निवड वेतनश्रेणीसाठी सेवेची 24 वर्षांपूर्वी झालेली आहे अशा शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पुढील लिंक उपलब्ध करून दिली आहे.
सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी शालार्थ सेवार्थ किंवा शिक्षकांचे इतर ज्या कोणत्या प्रणालीतून वेतन अदा केले जाते अशा प्रणाली शिक्षकांची माहिती अद्यावत करण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने निर्देश दिले होते.
नोंदणी सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या अडचणी सांगणारे मेसेज व कॉल येत आहेत म्हणून त्यावरील सर्व जणांसाठी उपाय.
ज्या शिक्षकांनी शालार्थ किंवा इतर वेतन देयक प्रणालीवर आपली माहिती जसे की स्वतःचा ई-मेल आयडी मोबाईल नंबर व देवनागरी लिपीतील म्हणजेच मराठीतील नाव अद्यावत केले आहे अशा शिक्षकांना प्रशिक्षणासाठी नोंदणी करताना कोणतीही अडचणी येत नाही.
येणाऱ्या अडचणी व उपाय पुढील प्रमाणे..
1) शालार्थ आयडी टाईप केल्यानंतर तो invalid असल्याचा मेसेज येत असेल तर.
शालार्थ आयडी पुन्हा एकदा तपासून पहा त्यातील सर्व अंक हे इंग्रजीत व सर्व अक्षर हे कॅपिटल लेटर आहेत की नाही याची खात्री करा.
टाईप करताना कीबोर्ड मराठीमध्ये तर टाईप करत नाही ना हे देखील पहा.
1)शालार्थ आयडी किंवा सेवार्थ आयडी टाईप केल्यानंतर सबमिट केल्यानंतर सेवेची बारा किंवा 24 वर्ष पूर्ण झालेली नसल्यामुळे आपल्याला नोंदणी करता येणार नाही.
अशी अडचण येत असेल तर आपण शालार्थ किंवा सेवार्थ पोर्टलवर आपली रुजू दिनांक तपासून घ्यावी गरज असल्यास त्यामध्ये मुख्याध्यापक लॉगिन मधून दुरुस्ती करावी व अधिकारी लॉगिन मधून त्याला अप्रू करावे.
2) पोर्टल लिंक ओपन केल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड श्रेणी निवडल्यानंतर शालार्थ किंवा सेवा निवडल्यानंतर जेव्हा स्टाफ आयडी म्हणजेच शालार्थ किंवा सेवार्थ आयडी टाईप केल्यानंतर व एंटर वर क्लिक केल्यानंतर.
कृपया आपले नाव देवनागरी मध्ये शालार्थ प्रणालीवर अद्ययावत करावे.
असा मेसेज दिसत असेल तर. .
शालार्थ किंवा सेवार्थ पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगिन मधून आपले देवनागरीतील म्हणजेच मराठीमधील नाव दुरुस्त किंवा अपडेट करून घ्यावे. सदर माहिती एप्रूव्हलसाठी पुढील लॉगीनला पाठवून एप्रिल करून घ्यावी.
अनेक शिक्षक बंधूंना वरील अडचणी येत आहे. कारण अपडेट करताना ईमेल आयडी व मोबाईल नंबर अपडेट करण्यावर भर देण्यात आला होता.
3) ईमेल आयडी वर ओटीपी येत नाही पुढील प्रमाणे मेसेज दिसतो.
आपला ई-मेल आयडी शालार्थ सेवार्थ पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगिन मधून दुरुस्त करून घ्यावा त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अॅप्रोव्हल घ्यावे.
4)मोबाईल नंबर वर ओटीपी येत नाही पुढील प्रमाणे मेसेज दिसतो.
शालार्थ सेवार्थ किंवा इतर वेतन प्रणालीवर आपला मोबाईल नंबर मुख्याध्यापक लॉगिन मधून चेक करून घ्यावा तो अपडेट करून घ्यावा व वरिष्ठ स्तरावर साठी पाठवून अप्रू करून घ्यावा.
वरील अडचणी या शालार्थ किंवा सेवार्थ पोर्टलवर शिक्षकांची माहिती अपडेट नसल्यामुळे येत आहेत.
5) संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन पेमेंटही झाले तरी नोंदणी पूर्ण झाल्याचे दिसत नाही
असे होत असल्यास कृपया पुन्हा पेमेंट करू नये थोडा वेळ थांबून पुन्हा लॉगिन करून पहावे तरी देखील नोंदणी पूर्ण झाली नाही तर किंवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेशी संपर्क करावा.
या व्यतिरिक्त इतर कुठली अडचण उद्भवत असल्यास कृपया व्हाट्सअप मेसेज करावा व्हाट्सअप वरून कॉल करू नये!
6) प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी मुदत कधीपर्यंत असेल?
वरिष्ठ वेतनशनी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी बाबत परिपत्रकात दिनांक 15 एप्रिल 2025 पासून 24 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती.
परंतु प्रत्यक्षात प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी ही 21 एप्रिल 2025 रोजी सुरू झाली त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदत ही जवळपास पंधरा दिवस असेल असा फक्त अंदाज आहे!
सध्यातरी परिपत्रकानुसार दिनांक 24 एप्रिल 2019 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल करणे/नव्याने नोंद (अपडेट) करणे बाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालयाने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
शिक्षकांच्या वरिष्ठ निवडश्रेणी प्रशिक्षणाकरीता शिक्षकांची माहिती शालार्थ प्रणालीवरून घेण्यात येणार आहे. तथापि, शालार्थ प्रणालीवरील शिक्षकांच्या वैयक्तिक नोंदी जसे की, मोबाईल नं., ई-मेल आयडी, शाळेचे नाव, पत्ता, इत्यादी माहिती अपूर्ण अथवा नोंदविलेल्या नाहीत. करीता आपणांस सूचित करण्यात येते की, आपले जिल्हयातील सर्व शिक्षकांच्या शालार्थ प्रणालीवरील वैयक्तिक नोंदी दिनांक ३१/०३/२०२५ रोजीपर्यंत अद्ययावत (Update) करणेबाबत मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे. तसेच सदरील नोंदी शाळास्तरावरुन अद्ययावत झाल्यानंतर सदरील नोंदी संबंधित अधीक्षक, वेतन व भनिनि पथक यांनी शालार्थ प्रणालीवर मान्य (Approve) कराव्यात.
करीता सदरील कामकाज प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे.
(मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.)
(दिपक चवणे)
शिक्षण उपसंचालक (अंदाज व नियोजन)
शिक्षण संचालनालय, म.रा.. पुणे १.
प्रत माहितीस्तव सविनय सादर-
१) मा. आयुक्त, (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२) मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी-
विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणांतर्गत शालार्थमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शिक्षकांना कळविणेबाबत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयाकडून दि.११/०३/२०२५ रोजी शालार्थ API प्राप्त झालेला आहे. या डेटाची तपासणी केली असता शिक्षकांची माहिती (उदा. मराठीतून नाव, Email ID) अपूर्ण असल्याचे निर्देशास आले आहे. तसेच काही शिक्षकांचे मोबाईल नंबर, शाळा यात बदल झालेला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ही माहिती शालार्थमध्ये update होणे गरजेचे आहे.
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी प्रशिक्षणार्थीची ऑनलाईन नोंदणी होणार आहे. ज्या शिक्षकांना शालार्थ आयडी प्राप्त आहे. अशा शिक्षकांची शालार्थ मधील माहिती वरिष्ठ व निवड श्रेणी पोर्टलवर दिसणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या माहितीत काही दुरुस्ती असल्यास ती update करणेबाबत सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.
राहूल रेखावार
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आणि दिनांक 15 मार्च 2025 रोजी माननीय आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य केलेल्या विनंतीनुसार वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता माहिती उपलब्ध करून देणेबाबत पुढील प्रमाणे माहिती मागविली आहे.
शासन निर्णयान्वये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत नियोजन सुरू आहे,
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता पोर्टल विकसित करण्यात येत आहे. सेवार्थ प्रणालीमधील अद्ययावत माहिती सदर पोर्टलसाठी आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील शिक्षकांची सोबतच्या विहित नमुन्यातील रिअल टाईम माहितीचा सेवार्थ प्रणाली API सेवापूर्व विभागाच्या preserviceedudept@maa.ac.in या email Id वर लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. ही विनंती
आपला विश्वासू,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या कार्यालयातून दिनांक 3 मे 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांना वरिष्ठ व निवडश्रेणी ऑफलाईन पध्दतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे .
संदर्भ :- १) शासन निर्णय क्र. शिप्रधर्धा २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण दि.२३/१०/२०१७.
२) शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण दि.२०/०७/२०२१.
३) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) संघटना यांचे दि.२१/०२/२०२४ चे निवेदन
४) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) जळगांव यांचे पत्र क्र.जिशिप्रसं/जळगाव/ च.नि.श्रेणी प्र./२०२३-२४/६६,दि.२३/०२/२०२४.
५) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) धुळे यांचे पत्र क्र. जिशिवप्रसंधु/ववेनिश्रेप/२०८. दि.२३/०२/२०२४.
६) विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती यांचे पत्र क्र.जा.क्र.जिशिपसं/अम/ ववेश्रेवनिश्रे प्रशिक्षण/१५३/२४, दि.०१/०३/२०२४.
उपरोक्त विषयानुसार संदर्भ क्र.१ अन्वये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाची जवाबदारी राज्य शासनाकडून परिषदेस सांर्पावण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ नुसार किमान १० दिवसांचे किंवा ५० घडयाळी तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करण आवश्यक करण्यात आले. यापूर्वी कोविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आले होते. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत संदर्भ पत्र क्र.३ अन्वये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) संघटना यांचेकडून तसंच संदर्भ पत्र क्र. ४ ते ६ अन्वये करष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत क्षेत्रिय कार्यालयांकडून विनंती करण्यात आली आहे. प्रत्यक्ष वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाऊन, प्रशिक्षणांतर्गत तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाथीचे परस्यगमधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचारांची देवाण-घेवाण सहजगत्या व्हावी तसंच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शर्भाणक सवत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचं आयोजन सन २०२८-२५ पासून ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये) घेण्याचे नियोजित आहे. यार्कारता सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी ५ तज्ञ अभ्यासक/तज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेस दि.५ जून २०२४ पर्यंत preservicedept@maa ac in या ई-मेल आयडीवर सादर करावी. यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतोल र्वारष्ठ अधिव्याख्याता/आंधव्याख्याता इत्यादी ३ तसेच याव्यतिरिक्त आपल्या जिल्हयातील इतर २ तज्ञ मार्गदर्शकांचे नावांचा समावश असावा.
(डॉ. माधुरी सावरकर)
उपसंचालक (सेवापूर्व शिक्षण)
राज्य शैक्षणिक संशाधन व शिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
वरील परिपत्रकानुसार आता वरिष्ठ वेतन श्रेणी पण निवड श्रेणी प्रशिक्षण हे ऑफलाइन पद्धतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी करण्याची गरज भासणार नाही व ऑनलाईन मोबाईलवर देखील प्रशिक्षण करण्याची गरज नाही.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments