आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया पोर्टलला भेट दिली असता आपल्याला पुढील प्रमाणे मेसेज दिसून येतो सदर मेसेज हा आज दिनांक 13 जून 2024 रोजी चा आहे.
सात जूनला जरी आरटीई प्रवेश प्रक्रिया सोडत जाहीर झाली असली तरी सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल असल्यामुळे याद्या जाहीर होण्यामध्ये विलंब होत आहे
24
मा. उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका(एल) क्र 14887/2024 प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने
सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत मा. न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार
२५ टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल याची संबधितांनी नोंद घ्यावी.
आरटीई पोर्टल अधिकृत लींक
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/maintenance
न्यायालयीन प्रकरणाची सुनावणी 12 जूनला होती त्यामुळे आज याद्या जाहीर होणे अपेक्षित होते.
१३ जूनला लॉटरीचा निकाल.
नामांकित इंग्रजी शाळांमध्ये पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची चढाओढ असते. अनेकांना पैशाअभावी प्रवेश घेता येत नाही. मात्र, आरटीई अंतर्गत निवड झाल्यास वंचित, दुर्बल, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश मिळणे शक्य आहे. आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश मिळावा, यासाठी जिल्ह्यातून २ हजार ४९ अर्ज प्राप्त झाले आहेत.
शिक्षण विभागाने केलेल्या बदलास न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर जुन्या नियमांनुसारच प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. सुरुवातीला १७ ते ३१ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. या मुदतीत अनेकांना अर्ज करणे शक्य झाले नसल्यामुळे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश अर्जासाठी ४ जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यामुळे अर्ज संख्या वाढली.
७ जूनला लॉटरी, निकाल १३ ला
आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यासाठी ७ जून रोजी लॉटरी काढली जाणार आहे. मात्र, न्यायालयात १२ रोजी सुनावणी असल्याने त्यानंतर १३ जून रोजी लॉटरीचा निकाल जाहीर करुन विद्यार्थ्यांची निवड प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती न्यायालयातशिक्षण विभागाने दिली आहे.
निर्णय मागे घेण्यासाठी याचिका
राज्य सरकारच्या ९ फेब्रुवारीच्या अधिसूचनेला स्थगिती देण्याचा निर्णय मागे घेण्यासाडी काही शाळांना उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पालकांची धाकधूक वाढली आहे. यावर १२ जून रोजी सुनावणी होणार असून त्यात काय होते, याकडे लक्ष लागले आहे.
गतवर्षीपेक्षा कमी अर्ज
शैक्षणिक वर्षे २०२३-२४ मध्ये आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी २७६६ पालकांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. त्या तुलनेत यंदा ७१७ अर्ज कमी आले आहेत. सुरुवातीला प्रवेश प्रक्रिये बदल करण्यात आला. त्यानंतर पुन्हा जुन्या नियमांनुसार प्रवेश अर्ज मागविण्यात आले. यामुळे ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया विलंबाने सुरु झाली. तोपर्यंत अनेक पालकांनी आरटीईची प्रतीक्षा न करता इतर शाळांमध्ये प्रवेश घेतल्यामुळे यंदा अर्ज कमी आल्याचे दिसते.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments