प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 30 मे 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार१) विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई २) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, म.न.पा.३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व, ४) प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा. सर्व. यांना आरटीई प्रवेश प्रक्रीया २०२४-२५ साठी विद्यार्थ्यांची अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी पुढील प्रमाणे मुदतवाढ देणे बाबत निर्देश दिले आहेत.
संचालनलयाचे पत्र क्र. प्राशिसं/प्र.प्र.सु.सू/आरटीई ८०१/२०२४/३५७९, दिनांक १७/५/२०२४
सन २०२४-२५ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रीया शुक्रवार दिनांक १७.०५.२०२४ ते ३१.०५.२०२४ या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात सुरु करण्यात आलेली होती.
तथापि आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याच्या सुविधेस दिनांक ०४.०६.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदरची मुदतवाढ ही अंतिम असून दिनांक ०४.०६.२०२४ नंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची कृपया
पालकांनी नोंद घ्यावी, तरी पालकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, ऑनलाईन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची कृपया काळजी घ्यावी, तसेच स्थानिक स्तरावर व्यापक प्रमाणात याबाबत प्रसिध्दी देण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
शिक्षण संचालनालय, पुणे-१
नोंदणी व प्रवेश अर्ज करण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे.
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तवः तांत्रिक संचालक, एन.आय.सी. पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई. २. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे १.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments