RTE २५ टक्के प्रतिक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी १. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व), २. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद (सर्व), ३. प्रशासन अधिकारी म.न.पा. (सर्व) यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ RTE २५ टक्के प्रवेशाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे.
RTE २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतील सोडतीनुसार प्रतिक्षाधिन यादीतील असलेल्या मुलांची प्रवेश प्रक्रिया दि.१६/८/२०२४ पासून दि.२६/८/२०२४ पर्यंत पूर्ण करावयाची आहे. याअनुषंगाने प्रतिक्षायादीतील RTE २५ टक्के प्रवेश प्रक्रिया दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याची कार्यवाही सर्व संबंधितांनी करावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे
शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी दि. ७ जून रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती. त्याद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादी शनिवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आरटीईची निवड यादी
https://student.maharashtra.gov.in/admportal
या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवारपासून एसएमएस येण्यास सुरुवात होणार आहे.
झालेल्या पालकांना दि. २३ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करून पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करून घेता येणार आहे.
प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज क्र. टाकून अर्जाची स्थिती पहावी तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. - शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 19 जून 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश सुरु करणेबाबत १) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व २) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, म.न.पा./ शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/दक्षिण/पश्चिम ३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व. ४) प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा. सर्व. यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :
- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक ०९/०२/२०२४ २. मा. उच्च न्यायालय मुंबई, जनहित याचिका क्र.६१/२०२४, क्र. ८७/२०२४, व क्र. १४८८७/२०२४, क्र.१५५२०/२०२४ तसेच रिट याचिका क्र. ३३१७/२०२४.
उपरोक्त विषयी शालेय शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक ०९/०२/२०२४ यास मा. उच्च न्यायालय मुंबई, यांची अंतरिम स्थगिती असल्यामुळे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली नव्हती.
मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी जन हित याचिका व रिट याचिकेवर दिनांक १९/०७/२०२४ रोजी अंतिम निर्णय दिला आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दिनांक ०७/०६/२०२४ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी दिनांक २०/०७/२०२४ रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal
या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार दिनांक २२/०७/२०२४ पासून SMS जाण्यास सुरुवात होईल.
प्रवेश मिळाल्याचा SMS प्राप्त झालेल्या पालकांनी दिनांक २३/०७/२०२४ ते ३१/०७/२०२४ पर्यंत आपल्या जिल्हयातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करुन पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करुन घेण्याबाबत सूचना देण्यात याव्यात.
तरी आपणांस कळविण्यात येते की, सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी आपल्या जिल्हयातील सर्व तालुकास्तरावरील पडताळणी केंद्राची तपासणी करुन पडताळणी केंद्र अपडेट करण्यात यावी, पालकांना अडचण होणार नाही यांची दक्षता घ्यावी. तसेच पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE PORTAL वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्र. टाकून अर्जाची स्थिती पहावी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील सूचनांचे पालन करावे अशा सूचनांना आपल्यास्तरावरुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
शिक्षण संचालनालय, पुणे १.
RTE previous अपडेट
* आरटीई 25 टक्के प्रवेशासंदर्भात मा. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दि. 11 जुलै 2024 रोजी सुनावणी झाली. या सूनवणीत सर्व याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आपली बाजू मा. न्यायलयासमोर मांडली, आता सदर सुनावणी पूर्ण झाली असून, याबाबतचा अंतिम निकाल न्यायलयाने राखून ठेवला असून, न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्यानंतरच RTE प्रवेश प्रक्रियेचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यासाठी पालकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आरटीई' प्रवेशप्रक्रिया लांबणीवर...
पालक निवड यादीच्या प्रतीक्षेत..
विदर्भ वगळता महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आजपासून शाळा सुरू होत आहे. परंतु आरटीई 25% मोफत प्रवेश प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकली आहे.
RTE बाबत आज कोर्टामध्ये सुनावणी झाली.
कल्याण सिटीझन्स एज्युकेशन सोसायटी , मुंबई, असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल्स, मुंबई व श्री चाणक्य एज्युकेशन सोसायटी, पिंपरी चिंचवड यांनी हस्तक्षेप याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
अंतिम सुनावणी 11जुलै रोजी होणार आहे.
* न्यायलायच्या अंतिम सुनावणी नंतरच RTE प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे 11 जुलै नंतरच प्रवेश प्रक्रियेला गती येणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागेवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून सोडत काढण्यात आली. मात्र, न्यायालयीन प्रकरणामुळे प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर होण्यासाठी पालकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असून, परिणामी प्रवेश प्रक्रियेला फटका बसून, ती आणखी लांबणीवर पडणार आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे वंचित, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आरटीई प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार २०८ शाळांमध्ये १ लाख ८ हजार २१६ प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी २ लाख ४३ हजार १०४ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत फेब्रुवारीमध्ये केलेल्या बदलांविरोधात दाखल याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने राबवावी लागत आहे. मात्र, दरम्यानच्या काळात खासगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे आता २५ टक्के जागांवरील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा विषय आता न्यायालयात गेला आहे. शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेशांसाठीची सोडत ७ जूनला काढण्यात आली. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची निवडयादी जाहीर करण्यात आली नाही. न्यायालयीन याचिकेवरील १२ जूनला होणारी सुनावणी आता १८ जूनला होणार आहे. त्यामुळे सोडत काढूनही निवड यादी जाहीर झालेली नाही. परिणामी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे. शाळांनी आरटीई प्रवेशांचे उद्देश लक्षात घेऊन या प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा करणे थांबवावे. त्यांच्या चुकीच्या प्रवेश पद्धतीमुळे महाराष्ट्रातील लाखो मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे आप पालक युनियनचे समन्वयक मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
आरटीई पोर्टल अधिकृत लींक
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/maintenance
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments