स्वयम् योजनेच्या धर्तीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना.
उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता.
काय आहे पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना?
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात राहण्याचा तसेच भोजनासाठी लागणारा खर्च परवडण्यासारखा नसतो व परिणामी बहुतांश युवक हे पैशाअभावी त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना सुरू केली आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक पुढील प्रमाणे.
https://swayam.mahaonline.gov.in/
https://swayam.mahaonline.gov.in/Registration/Registration
शासकीय महाविद्यालयात १२ वीनंतरच्या व्यावसायिक अभ्याक्रमासाठी प्रवेशित असलेल्या धनगर समाजातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ३० जूपर्यंत सादर करता येणार आहेत.
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर गुणांवर आधारित पदविका शिक्षण घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेंतर्गत लाभ दिला जातो. यंदा २०२४-२५ शैक्षणिक वर्षाकरिता अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी स्वतःच्या मोबाइलच्या साहाय्याने घरी बसून या योजनेंतर्गत अर्ज करू शकतो. ३० जूनपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख असून पात्र विद्यार्थ्यांना इतर मागास व बहुजन कल्याण विभागाकडे अर्ज सादर करावेत.
कोणाला मिळणार योजनेचा लाभ?
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच अल्पसंख्याक व मागास वर्गातील विद्यार्थ्यांना महाविद्यालय, उच्च महाविद्यालय, तंत्रनिकेतन, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय
• आयटीआय असा अल्प मुदतीचे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
कागदपत्रे काय लागणार?
• या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याला जातीचा दाखला, बोनाफाइड, गत वर्षीची उत्तीर्ण असल्याची टीसी, स्वयंयोजनेचा अर्ज, पासपोर्ट फोटो.
अर्थसाहाय्य थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात.
• यासह भाडे करारनामा, बैंक पासबुक, महाविद्यालयाची हजेरी व इतर शैक्षणिक कागदपत्रे आवश्यक
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. यासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करणे अनिवार्य असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
- गीता गुट्टे, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments