PM Poshan 2024-25 Update - कोणत्या महिन्यात किती दिवस अंडी किंवा केळीचा लाभ द्यावा? शिक्षण संचालक प्राथमिक

प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित केलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी किंवा केळी या पदार्थाचा लाभ देणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. प्रस्तुत योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इ.१ ली ते इ.५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच, इ. ६ वी ते इ.८ वीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते. सद्यस्थितीत शासन निर्णय दि. ११ जुन, २०२४ अन्वये त्रिस्तरीय पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. अंड्यांमधील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत पोषण आहारामध्ये अंडांचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने संदर्भ १ अन्वये घेतलेला आहे. अंड्यामध्ये उच्च प्रतिचे प्रथिने, उष्मांक, जीवनसत्त्चे, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेड असल्याने पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होवून त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होऊ शकेल. त्याअनुषंगाने संदर्भ ४ च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्य विकासाकरीता नियमित आहारासोबत अंडी/केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रस्तुत उपक्रमाच्या अंमलबजावणीकरीता खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

१. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत पाककृतीमध्ये सुधारणा करण्यात येऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगला आहार उपलब्ध होणेच्या उद्देशाने त्रिस्तरीय

पाककृती उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने संदर्भ ३ अन्वये घेतलेला आहे. याअंतर्गत दोन आठवड्यातील प्रत्येक दिवसांकरीता वेगवेगळ्या पाककृतींची शिफारस करण्यात आलेली आहे.

२. त्रिस्तरीय पाककृतीअंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या पाककृतींमध्ये दोन आठवड्यातून एक दिवस अंडी (अंडा पुलाव या स्वरुपात। विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावयाचा आहे. शासन निर्णय दि. १४.०८.२०२४ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार पुढील दहा आठवड्याकरीता विद्यार्थ्यांना अंडी उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

३. खालील तक्त्यामध्ये नमूद केलेनुसार पुढील दहा आठवड्याकरीता अंडी (अंडा पुलाव या स्वरुपात) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावयाची आहेत.

४. जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या त्रिस्तरीय पाककृतीप्रमाणे दोन आठवड्यातील एक दिवस अंडी या पदार्थांचा लाभ अंडा पुलाव या स्वरुपात विद्यार्थ्यांना द्यावयाचा आहे तसेच तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंडी ऐवजी निर्धारित करण्यात आलेल्या दराच्या मर्यादेमध्ये केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करुन देण्यात यावे.

५. सद्यस्थितीतील अंड्यांचा बाजारभाव विचारत घेता, एका अंड्यासाठी रु.५/- इतका निधी चार आठवड्यांकरीता अग्रीम स्वरुपात शाळांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तथापि अंडी व केळी करीता शाळांना निधी उपलब्ध होईपर्यंत शाळांनी इंधन व भाजीपाल्याकरीता अग्रीम स्वरुपात शाळास्तरावर उपलब्ध असलेल्या निधीमधून सदरचा खर्च भागवावा.

६. शासन निर्णय दि. २० डिसेंबर, २०२३ मधील तरतूदीनुसार नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटी यांचेडील संबंधित महिन्यातील सरासरी दरानुसार निक्षित करुन फरकांची रक्कम शाळांना उपलब्ध करुन देण्यात येईल व त्याकरीता आवश्यक अनुदान जिल्ह्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल.

७. सदर उपक्रम ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच, नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणाऱ्या यंत्रणेमार्फत राबविण्यात यावा.

८. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करुन जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या दिवशी विद्यार्थ्यांना अंडा पुलाव या स्वरुपात सदर पदार्थाचा लाभ द्यावा.

९. प्रस्तुत उपक्रमाकरीता जिल्ह्यातील योजनेस पात्र सर्व शाळांमधील विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संचालनालयाकडे त्वरीत चार आठवड्यांकरीता अनुदान मागणी करणेत यावी., संचालनालयाकडून अनुदान प्राप्त होताच, नियमानुसार आवश्यक कार्यवाही करुन अग्रीम स्वरुपात चार आठवड्यांकरीताचा निधी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या बैंक खात्यावर त्वरीत वर्ग होईल, याची दक्षता सर्व जिल्ह्यांनी घ्यावी.

१०. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीतंर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संबंधित शाळेसाठी निश्चित केलेल्या अन्न शिजविणाऱ्या यंत्रणामार्फत अंडा पुलाव या स्वरुपात अंडी या पदार्थाचा लाभ देण्यात यावा. तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंडी ऐवजी निर्धारित करण्यात आलेल्या दराच्या मर्यादेमध्ये केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करुन देण्यात यावे.

११. ग्रामीण भागामध्ये सदरप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करुन घेण्यात यावी. सदर माहितीची केंद्रप्रमुख यांचेकडून प्रमाणित करुन तालुका कार्यालयाकडे संकलित करण्यात यावी.

१२. गटशिक्षणाधिकारी / अधीक्षक (पीएमपोषण) यांनी शाळांना भेटी देऊन अंडी उपलब्धतेची खात्री करावी तसेच तालुक्यातील सर्व केंद्राची माहिती संकलित व प्रमाणित करुन जिल्हा कार्यालयास सादर करावी. जिल्हा कार्यालयाने तालुक्यांमार्फत अचूक माहिती व प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतरच पुढील महिन्यांकरीताचा निधी संबंधित तालुक्यातील शाळांच्या खाती वर्ग करावा,

१३. महापालिका/नगरपालिका स्तरावर केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीतंर्गत शाळांना भेटी देऊन तसेच अंडी/फळे यांच्या खरेदीच्या देयकांची शिक्षणाधिकारी (प्राथ) यांनी यादृच्छिक पध्दतीने तपासणी करुन सदरचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत असलेबाबत मुख्याध्यापक यांचेकडून खातरजमा करुन घ्यावी व प्रशासन अधिकारी (नपा व मनपा) यांचेकडून सदर माहिती प्रमाणित करुन घ्यावी. प्रत्येक महिन्यानंतर सदर माहितीची पडताळणी करुन संबंधित अन्न शिजविणाऱ्या यंत्रणांना अंडी फळे यांच्या देयकांची अदायगी करावी.

१४. शाळांनी नियमित उपस्थितीची नोंद एमडीएम पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंदविणे आवश्यक राहील. अंडी / केळी याथा निर्धारित दिवशी विद्यार्थ्यांना लाभ दिला परंतु सदर दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती एमडीएम पोर्टलवर नोंदविली नसल्यास, सदर दिवसाकरीता वितरीत केलेल्या अंडी/फळे याकरीताचे अनुदान अनुज्ञेय होणार नाही, याची स्पष्ट सूचना सर्व केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना व शाळांना करुन देण्यात यावी.

१५. अंडी/फळांचा लाम शाळास्तरावर नियमितपणे निर्देशित केलेनुसार व जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या पाककृतीतील दिवशी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असलेबाबतची खातरजमा क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिका-यांनी शाळा भेटी दरम्यान करणेबाबत सूचना देण्यात याव्यात.

१६. शाळास्तरावर प्रस्तुत उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी उक्त प्रमाणे आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. तथापि आवश्यकता असल्यास याव्यतिरिक्त अधिकचे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी लेखी स्वरुपात सर्व शाळांकरीता निर्गमित करावेत. सदरचे निर्देश ग्रामीण व नागरी भागातील सर्व शाळा व संस्थांकरीता लागू राहतील.

१७. शाळास्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या प्रस्तुत उपक्रमाबाबत आवश्यक ती जनजागृती विविध प्रसार व प्रचार माध्यमाद्वारे करण्यात यावी. उदा. सामाजिक प्रसार माध्यमे, शिक्षकांचे विविध ब्लॉग, विविध संकेतस्थळे इ.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे-१.

वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


आज दि. 02/08/2024 रोजी मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे स्तरावरुन व्हि.सी.मध्ये देण्यात आलेल्या सुचना शिक्षणाधिकारी यांनी पुढील प्रमाणे दिल्या आहेत.


आज दि. 02/08/2024 रोजी मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे स्तरावरुन विभागाअंतर्गत विविध विषयाचे अनुषंगाने ऑनलाईन व्हि. सी. आयोजीत करण्यात आली होती सदर व्हि. सी. मध्ये आपल्या जिल्हयातील खालील बाबीच्या अनुषंगाने काम असमाधानकारक असल्याबाबत मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी कामाबाबत तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे तसेच कामात तातडीने सुधारणा करणे बाबत निर्देश सुध्दा दिलेले आहे त्या निर्देशाचे अनुषंगाने खालीलप्रमाणे कार्यवाही आपण विहीत कालावधीत पुर्ण करावयाचे आहे.

1. परसबाग : परसबाग निर्मिती बाबत या कार्यालयाकडुन आपल्याला वेळोवेळी सुचना व व्हि. सी. व्दारे सुचना देण्यात आलेल्या आहे परंतु आपल्या तालुक्यातील 100% शाळावर परसबाग निर्मिती झालेली नाही हि बाव अत्यंत गंभिर स्वरुपाची असल्याने आपणास या पत्राव्दारे सुचित करण्यात येते की क्षेत्रिय अधिकारी यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन परसबाग 100% निर्माण होईल याबाबत आपल्या स्तरावर प्रयत्न करावे.

2. मासिक डेटा एंट्री बाबत योजनेअंतर्गत केंद्रशासनाने महिन्याच्या 05 तारखेपर्यंत मासिक डेटा एंट्री भरणेबाबत निश्चीत करण्यात आलेली आहे परंतु आजरोजी कोणत्याही तालुक्याने मासिक डेटा एंट्री पुर्ण केलेली नाही आपण उदया सायंकाळ पर्यंत मासिक डेटा पुर्ण करण्यात यावा जे तालुके मासिक डेटा एंट्री पुर्ण करणार नाही त्याचेविरुध्द प्रशासकीय कार्यवाही अवलंबविण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी.

3. Enrollment बाबत या कार्यालयाकडुन दि. 19/07/2024 रोजी सर्व मुख्याध्यापकांना सरल प्रणालीमध्ये पटसंख्येची माहिती पुर्ण करणेबाबत सुचित करण्यात आलेले आहे. परंतु जिल्हयाचे कामकाज अतिशय कमी असल्यामुळे मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) म.रा. पुणे यांनी तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे.

4. AMS बाबत : आज दि. 02/08/2024 रोजी मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) म.रा. पुणे यांचे स्तरावरुन Automated Monetering System (दैनंदिन उपस्थिती) माहिती याबाबतचा आढावा घेतला असता 100% सरल प्रणालीवर मुख्याध्यापक यांना माहिती भरणेबाबत सुचित करावे जे मुख्याध्यापक सरल प्रणालीवर दैनंदिन उपस्थितीची माहिती भरणार नाही त्यांना अनुदान वितरीत केल्या जाणार नाही सदर माहिती नियमित भरण्यात यावी याबाबत आपले स्तरावरुन आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

वरिलप्रमाणे सुचनाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या पंचायत समितीचे कामकाज असमाधानकारक असेल त्या पंचायत समिती मधिल गटशिक्षणाधिकारी / अधिक्षक वर्ग 2 (शापोआ), विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख यांचा अहवाल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. बुलडाणा यांच्या निदर्शनास आणुन दिल्या जाईल याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी.


शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्हा परिषद बुलडाणा


प्रतिलीपी.

1) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांना माहितीस्तव सविनय सादर.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बुलडाणा




प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत (शालेय पोषण आहार योजना) योजनेस पात्र शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मध्यान्ह भोजन दिले जाते. सर्व पात्र शाळांना धान्यादी वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी, संदर्भ क्र. 3 अन्वये, सन 2024-25 करीता संचालनालयाकडून नियुक्त पुरवठादार नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अॅन्ड रिटेलिंग को ऑप ऑफ इंडिया लि., नागपूर (NACOF) यांचेमार्फत आवश्यक तांदूळ, भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून उचल करुन शाळा स्तरापर्यंत वाहतूक करणे आणि आवश्यक असणा-या धान्यादी मालाचा पुरवठा करुन घेण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत संदर्भ क्र. १ शासन निर्णयान्वये, सन २०२४-२५ पासून १५ प्रकारच्या पाककृर्तीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सदर पाककृतीचा तपशिल सोबतचे परिशिष्ठ अ, ब, व क मध्ये देण्यात आलेला आहे.

संदर्भ क्र. २ संचालनालयाकडील पत्रान्वये, तीन संरचीत आहार विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी "परिशिष्ट-अ नुसार पाककृती प्रमाणे आहार शिजवून दिल्यानंतर शिल्लक राहीलेल्या तांदुळापासुन तांदळाची खीर (परिशिष्ट ब) आणि शिल्लक राहणाऱ्या भाजीपाला / मोड आलेले कडधान्य यांची कोशिंबीर (परिशिष्ट क) अशा प्रमाणे तीन परिशिष्टानुसार विद्यार्थ्यांना दैनंदीन आहार पुरवणे बंधनकारक आहे.

"परिशिष्ट- अ" मधील पाककृतीप्रमाणे तांदळाचे प्रमाण इयत्ता १ ली ते ५ वी साठी ८० ग्रॅम व इयत्ता ६ वी ते ८ वी साठी १२० ग्रॅम असे तसेच डाळ / कडधान्य यांचे प्रमाण इ. १ ली ते ५ वी साठी १० ग्रॅम व इ. ६ वी ते ८ वी साठी १५ ग्रॅम. असे याप्रमाणात वापरावयाचे आहेत. पाककृती "परिशिष्ट-ब" मधील तांदुळाची खीर तयार करण्यासाठी वापरावयाचे आहे. तरी उर्वरीत डाळ / कडधान्य इयत्ता १ ली ते ५ वी १० ग्रॅम व इ. ६ वी ते ८ वी साठी १५ ग्रॅम आणि "परिशिष्ट-अ" मधील पाककृती नंतर शिल्ल्क राहीलेला ५० टक्के, भाजीपाला यांचे एकत्रित असे "परिशिष्ट-क" नुसार मोड आलेली कडधान्य (Sprouts) आणि भाजीपाला यांची कोशिंबीर करावयाचे आहे.


महत्वाच्या सुचना

1) सदर, योजनेअंतर्गत तीन संरचीत आहार पध्दतीने पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे.

2) सदरची पाककृती खालील शाळांमध्ये लागू राहील. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत समाविष्ट असलेल्या ग्रामीण भागातील सर्व पात्र शाळा.

नागरी भागातील केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली मध्ये समाविष्ट नसलेल्या सर्व पात्र शाळा. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व पात्र शाळा.

3) नागरी भागातील केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये समाविष्ठ नसलेल्या शाळा आणि ग्रामीण भागातील शाळा यांनी पाककृती प्रमाणे आवश्यक धान्यादी मालाची व तांदुळाची एकत्रित मागणी माहे ऑगस्ट 2024 व सप्टेंबर 2024 (45) कार्यदिवस) करीता जिल्हयाच्या पुरवठा दाराकडे दि.29/07/2024 पर्यंत नोंदवावी व त्याची एक प्रत जिल्हास्तरीय कार्यालयास सादर करण्यात यावी. 4) केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व पात्र शाळांकरिता माहे ऑगस्ट 2024 व सप्टेंबर 2024 (45) कार्यदिवस) करीता अनुज्ञेय तांदुळाची एकत्रित मागणी दि.29/07/2024 पर्यंत जिल्हायाच्या पुरवठादाराकडे नोंदवावी व त्याची एक प्रत जिल्हास्तरीय कार्यालयास सादर करण्यात यावी,

5) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अॅन्ड रिटेलिंग को ऑप ऑफ इंडिया लि., (NACOF) यांचा झालेला करारनामा दि.१५/०३/२०२४ मधील मुदा क्र. २६ नुसार पुरवठादाराने मालाचा पुरवठा केल्यानंतर त्याचे यादृच्छिक (Random) पध्दतीने १) मुळशी २) जुन्नर ३) मावळ या ०३ तालुक्यातील शाळांमधील धान्यादी मालाचे नमुने गटशिक्षणाधिकारी / अधिक्षक वर्ग २ (पीएम-पोषण) या अधिकाऱ्यांकडुन शासकीय प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठविणेत यावेत.

6) सुधारीत पाककृतीनुसार दोन आठवडेसाठी प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे सोबत जोडलेल्या "परिशिष्ट-अ नुसार एकुण 1 ते 12 पाककृती वेगवेगळ्या दिवसांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सदर प्रत्येक दिवस ठरवून दिलेल्या पाककृतीप्रमाणेच आहार पुरविण्यात यावा. उपरोक्त नमूद पाककृतीप्रमाणे आहार दिल्यानंतर शिल्लक राहिलेल्या तांदळापासुन तांदळाची खीर आठवडयातील चार दिवस (सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार) "परिशिष्ट-ब" प्रमाणे देणे बंधनकारक राहील.

8) पहिल्या आठवड्यातील बुधवार व दुस-या आठवड्यातील बुधवार या दिवशी अंडा पुलाव याचा लाभ देण्याचे निश्चित झालेले आहे. जे विद्यार्थी अंडी पुलाव खाणार नाही त्यांना "परिशिष्ट- अ" मधील पाककृती 1 प्रमाणे व्हेजीटेबल पुलाव दयावयाचा आहे. तसेच अंडी न खाणा-या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावे. सदर दिवशी तांदूळाची खीर, नाचणीचे सत्व व मो आलेले कडधान्य (Sprouts) देण्यात येऊ नयेत, 

9) आठवडयातील एक दिवस (दर शनिवार) "परिशिष्ट-ब" प्रमाणे नाचणीसत्व देणे बंधनकारक राहील, 10) प्रत्येक आठवडयात (बुधवार वगळून) प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांना मोड आलेले कडधान्य (Sprouts) "परिशिष्ट-क" प्रमाणे देण्यात यावी. सदर कडधान्य (Sprouts) तयार करण्यासाठी दैनंदीन पाककृतीमधील कडधान्यामधुन 50 टक्के बचत करुन त्याचा वापर करावयाचा आहे तसेच सदर कडधान्य (Sprouts) मध्ये दैनंदीन पाककृतीमध्ये आवश्यक प्रमाणे भाजीपाला वापर करण्यात यावा (शासन निर्णय दिनांक 02/02/2011 अन्वये पाककृतीसाठी इयत्ता 1 ली ते 5 वी करीता 50 ग्रॅम भाजीपाला व इयत्ता 6 वी ते 8 वी करीता 75 ग्रॅम भाजीपाला वापरणे बंधरकारक आहे. 11) अंडी, सोयाबीन वडी, गुळ/ साखर, दुध पावडर इत्यादी साठी लागणारा आहार खर्चाव्यतिरीक्तचा अधिकचा निधी राज्यस्तरावरुन पुरवण्यात येईल. नाचणीसत्वासाठी आवश्यक नाचणीचा पुरवठा भारतीय अन्न महामंडळाकडुन करण्यात येणार आहे.

12) शाळा स्तरावर सर्व मुख्याध्यापक यांनी स्वयंपाकी तथा मदतनीस यांना संदर्भ क्र 1 मधील शासन निर्णयातील सर्व बाबी जसे की, तीन संरचीत आहार पध्दती, पाककृती शिजवून तयार करण्याचा सविस्तर घेवून विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करावी.

तपशील इत्यादी समजावून सांगून शासन निर्णयातील सर्व बाबींचे तंतोतंत अनुपालन होईल याची दक्षता घ्यावी.

13 ) हरभऱ्याचे मोड विद्यार्थ्यांना देण्यापुर्वी ते वाफवून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात यावे.

निश्चित करण्यात आलेली पाककृती खालीलप्रमाणे :-

विद्यार्थ्यांना द्यावयाच्या पाककृतीसाठी इंधन व भाजीपाला याचा खर्च, मुख्याध्यापक यांनी संचालनालयाने ठरवून दिलेल्या खर्च मर्यादेत करावयाचा आहे. तपशील खालीलप्रमाणे.

प्रती दिन प्रती विद्यार्थी इंधन व भाजीपाला अनुदानाचा दर


1 ली ते 5 वी (प्राथमिक)

रु.2.08

6 वी ते 8 वी (उच्च प्राथमिक)

रु. 3.11


जिल्हयातील सर्व शाळामध्ये निर्धारीत केलेल्या पाककृतीमध्ये वापरावयाच्या सर्व वस्तु (धान्यादी माल, मसाले, डाळी / कडधान्ये इ.) यांचे प्रमाण, सदर पाककृती शिजविण्याच्या पध्दतीमध्ये स्पष्टता आणि एकसारखेपणा ठेवण्यात यावा. सुलभ संदर्भासाठी संदर्भ क्र. 1 मधील शासन निर्णय या सोबत देण्यात येत आहे.

तरी पत्रामध्ये नमुद केलेल्या (प्रती दिन प्रती विद्यार्थी) धान्यादी मलांच्या प्रमाणात सर्व पात्र विद्यार्थ्यार्थ्यांची माहे ऑगस्ट 2024 व सप्टेंबर 2024 मधील 45 दिवसांकरीता तांदुळ व धान्यादी मालाची मागणी दिनांक- 29/07/2024 पर्यत पुरवठेदार यांचेकडे नोंदवून त्याची प्रत या कार्यालयास सादर करण्यात यावी.


(संजय नाईकडे)

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्हा परिषद पुणे


प्रत- पुरवठादार, नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अॅन्ड रिटेलिंग को ऑप ऑफ इंडिया लि., नागपूर (NACOF) यांना माहितीस्तव.

२/- मागणीनुसार धान्यादी मालाचा पुरवठा त्वरीत सुरु करण्यात यावा. ज्या शाळेमध्ये तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांना एक दिवस अगोदर मेसेजद्वारे व फोन करुन सूचना देण्यात याव्यात. तसेच पुरवठा केलेल्या मालाची एमडीएम पोर्टलवर नोंद करणे बंधनकारक राहील.

वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात परिशिष्टांसह डाऊनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.

Download


 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयातून निर्गमित दिनांक 25 जून 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नवीन निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विद्यार्थ्यांना लाभ देणे बाबत शिक्षण संचालक यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण (पूर्वीची शालेय पोषण आहार) योजना राज्यामध्ये सन १९९५-९६ पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. योजनेतंर्गत इ. १ ली ते ५ वी च्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इ. ६ वी ते इ.८ वी च्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. प्रस्तुत योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. शासन निर्णय दिनांक ०२ फेब्रुवारी, २०११ मधील तरतूदीनुसार तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता.

केंद्र शासनाने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी स्थानिक स्तरावर उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थाचा व तृणधान्याचा समावेश करण्याबाबत्तच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुषंगाने प्रस्तुत योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक स्तरावर उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृर्धीगत करणे व आहारात वैविधता आणण्याच्या उद्देशाने आरोग्य, आहार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतीसह योजनेमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने शिफारशी सादर केल्या आहेत. योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यात येत आहेत. शालेय परसबागेतील उत्पादित भाजीपाला व फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा सकस आहार मिळण्यास मदत होत आहे.

सदर सर्व बाबींचा विचार करुन विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार आवडीने खातील. तीन संरचित पध्दतीमध्ये तांदूळ, डाळी/कडधान्यापासून तयार केलेला आहार मोड आलेले कडधान्य (स्प्राउट्स) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर/नाचणीसत्व यांचा समावेश करुन नविन पाककृती शासनाने संदर्भिय शासन निर्णयान्वये निश्चित केली आहे.

१) प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पाककृती सुधारणा समितीने सुचविलेल्या १५ प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास शासनाने संदर्भिय शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे.

२) केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या शाळा वगळून उर्वरित सर्व शाळास्तरावर सद्यस्थितीत ज्या डाळी व कडधान्य उपलब्ध आहेत. त्या डाळी व कडधान्यापासून उक्त शासन निर्णयामध्ये दिलेल्या परिशिष्टात नमूद असलेल्या पाककृतींनुसार विद्यार्थ्यांना योजनेचा तात्काळ लाभ देण्यात यावा.

३) तांदुळ व धान्यादी मालाची यापुढील मागणी नोंदविताना संदर्भिय शासन निर्णयाचे पालन होईल यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करुन यापुढील मागणी नोंदविण्यात यावी. 

४) आपल्या कार्यक्षेत्रातील केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना संदर्भिय शासन निर्णयानुसार तात्काळ मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात यावा. याबाबत हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

५) तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी (अंडा पुलाव पाककृती असलेला दिवस वगळून) आहारासोबत मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) व तांदळाची खीर/नाचणी सत्व देण्यात यावेत.

६) ज्या दिवशी विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव (पाककृती क्र.९) या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देणार आहे. त्या दिवशी इ. १ ली ते ५ वी करीता १०० ग्रॅम तांदूळ व इ. ६ वी ते ८ वी करीता १५० ग्रॅम तांदूळाचा वापर करुन मध्यान्ह भोजनचा लाभ देण्यात यावा. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर दिवशी व्हेजिटेबल पुलाव या पाककृतीच्या स्वरुपात लाभ देण्यात यावा. तसेच, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या खर्च मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावेत, सदर दिवशी तांदळाची खीर, नाचणीसत्व व मोड असलेले कडधान्य (स्प्राऊट्स) देण्यात येऊ नये.

७) गोड खिचडी, नाचणी सत्व व तांदळाच्या खीरीच्या पाककृतीसाठी दुध पावडर, गुळ/साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी यांची आवश्यकता आहे. सदर वस्तू पुरवठेदारामार्फत पुरविण्यात येत नसल्यामुळे प्रस्तुत वस्तूंच्या खरेदीसाठी महिन्यातील दोन दिवसांच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम शाळा स्तरावर वितरीत करावयाची आहे. त्या रक्कमेतून शालेय व्यवस्थापन समितीने दुध पावडर, गुळ/साखर, सोयाबीन वडी यांची खरेदी करुन विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा.

७.१ केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या शाळा वगळून उर्वरित सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना सदर शासन निर्णयानुसार लाभ देण्यासाठी उक्त पदार्थांच्या खरेदी करीता आवश्यक निधी शाळास्तरावर वर्ग करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील इ. १ ली ते ५ वी व इयत्ता ०६ वी ते ०८ वी च्या विद्यार्थ्यांच्या दिनांक ०१/०७/२०२४ रोजीच्या पटसंख्येचा तपशिल दिनांक ०२/०७/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजेपर्यंत संचालनालयास सादर करण्यात यावा, विहित कालमर्यादेत माहिती सादर न झाल्यास होणाऱ्या विलंबास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल. याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

८) नाचणी सत्वासाठी आवश्यक नाचणीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळातून प्रस्तुत नाचणीचा पुरवठा शासनामार्फत शाळास्तरावर करण्यात येईल.

९) शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशांनुसार आपल्या स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करुन विद्यार्थ्यांना तात्काळ योजनेचा लाभ देण्यात यावा.

१०) योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ देण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करावयाची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीव्दारे तात्काळ निर्णय घेण्यात यावा. तसेच, मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरीता शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तात्काळ निर्णय घ्यावा, प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसारच विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा.

योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) चा लाभ देणेकरीता आपल्या स्तरावरुन शासन निर्णयानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. याबाबत हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता आपल्या स्तरावरुन घेण्यात यावी.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक),

प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.