UGC-NET/CSIR-NET/MH-SET-2024-25 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याध्यर्थ्यांना सन 2024- 25 करीता UGC-NET/CSIR-NET/MH-SET परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्याथ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक
https://mahajyoti.org.in/en/application-for-ugc-net-csir-net-mh-set-2024-25-training-2/
प्रशिक्षणाचा कालावधी - 6 महिने
विद्यावेतन - 10,000/- प्रतिमाह (75% उपस्थिती असल्यास)
एकरकमी आकस्मिक निधी रु.12,000/-
> योजनेच्या लाभासाठी पात्रता:
1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.
2. विद्यार्थी हा नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा असावी,
3. विद्यार्थी हा पदव्युत्तर पदवीची परिक्षा उत्तीर्ण झालेला असावा असावी.
4. यापूर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेतलेला असेल, अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करु नये, अश्या विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही. त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
5. प्रशिक्षणाकरीता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परिक्षेद्वारे करण्यात येईल.
6. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची यादी व प्रतिक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
> प्रशिक्षणाचे स्वरूप :
1. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्यांचा असेल.
2. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल,
3. प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे असेल.
4. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरुपात असेल.
समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :
1. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
2. दिव्यांगाकरिता 4% जागा आरक्षित आहे.
3. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
> अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः
1. आधार कार्ड
2. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
3. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
5. पदवीचे प्रमाणपत्र गुणपत्रक
6. पदव्युत्तर पदवीचे प्रमाणपत्र/गुणपत्रक
7. दिव्यांग दाखला (दिव्यांग असल्यास)
8. अनाथ दाखला (अनाथ असल्यास)
> अर्ज कसा करावा.
1. महाज्योतीच्या www.mahaivoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील "Application for UGC-NET/CSIR-NET/MH-SET 2024-25 Training"
यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा, 2. अर्जासोबत तपशीलात नमुद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.
4. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांनुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
5. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
6. प्रशिक्षणाकरीता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणाकरीता रुजु होतील त्या दिनांकापासुन त्यांना महाज्योतीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्यांनाच विद्यावेतन देय राहील.
7. कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्याचे आढळल्यास तो/ती कायदेशीर कार्यवाईस पात्र राहील.
8. यापूर्वी महाज्योतीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या 'सारर्थी' या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल.
9. महाज्योतीच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असल्यास विद्यार्थी या प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्यासाठी पात्र राहणार नाही.
10. नमुद निकषांची पूर्तता न करणाऱ्या, अपूर्ण अर्ज सादर करण्याऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे न सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज बाद करण्यात येईल. त्याकरीता विभाग किंवा कार्यालय जबाबदार राहणार नाही.
11. विद्यार्थाचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे विद्यावेतन त्यांच्या आधार कार्ड नंबरशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून सदर बाबीची विद्याथ्यर्थ्यांनी नोंद घ्यावी.
12. कोणत्याही विद्यार्थ्यांस कोणत्याही कारणाने पूर्वलक्षी प्रभावाने विद्यावेतन तसेच आकस्मिक निधीचा लाभ मिळणार नाही.
13. योजनेसंबंधित कोणतेही बदल झाल्यास त्याबाबतच्या सुचना वेळोवेळी महाज्योतीच्या संकेतस्थळावर देण्यात येईल.
14. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा : संपर्क क्र 0712-2870120/21
E-Mail Id
: mahajyotihelpdesk@gmail.com
संस्थेचे संकेतस्थळ (Website) :- www.mahajyoti.org.in
(स्वा.)
(राजेश खवले)
व्यवस्थापकीय संचालक,
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, (महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments