प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयातून निर्गमित दिनांक 13 जुलै 2024 रोजी च्या परिपत्रकानुसार शिक्षण संचालक प्राथमिक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देत असतांना जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) यांची सेवा ज्येष्ठता ठरवितांना कोणता दिनांक विचारात घ्यावा यासाठी मार्गदर्शन मिळणेबाबत पुढील प्रमाणे मार्गदर्शन केले आहे.
दि.१०.०७.२०२४ रोजीच्या पत्रामध्ये केंद्रप्रमुख पदोन्नतीबाबत शासनाच्या विविध शासन निर्णयामधील तदतुदी विचारात घेवून आपण केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठतेची कोणत्या पदाच्या नियुक्तीच्या दिनांकाबाबत या कार्यालयाकडे धारणा पक्क्की करणेबाबत कळविले आहे.
सद्यस्थितीमध्ये केंद्र प्रमुख पदोन्नती देण्याबाबत आपल्या दि.१०.०७.२०२४ रोजीच्या पत्रातील अनुक्रमांक ०७ वर नमूद असलेला शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दि.२७.०९.२०२३ मध्ये नमूद केलेनुसार केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्ष अखंडीत सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारांमधून सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीत नेमणूक करणेबाबत स्वयंस्पष्ट नमूद करण्यात आले आहे. सबब शासन निर्णयातील तरतूदीनुसार केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीने नेमणूक करतांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर वेतोन्नती झाल्याच्या दिनांकापासूनची सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन शासन निर्णय दि.२७.०९.२०२३ च्या तरतूदीनुसार केंद्रप्रमुख पदोन्नतीची कार्यवाही करणे योग्य ठरेल. तरी सदर प्रकरणी उपरोक्त प्रमाणे आपली धारणा पक्की करण्यात येत आहे.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक,
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे-१.
Previous Update👇
प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 11 जून 2024 रोजी केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नती बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
संदर्भ: १. शासन निर्णय क्र संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटी-१/दि.२७/९/२०२३
२. शासनाचे पत्र क्र. संकीर्ण २०२२/ प्र.क्र.८१/टिएनटी-१/दि.२४/५/२०२४
उपरोक्त विषयी संदर्भिय शासन निर्णय दि.२७/९/२०२३ नुसार आपणांस कळविण्यात येते की, केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरिता, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणा-या उमेदवारांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल, अशी संदर्भीय शासन निर्णय दि.२७/९/२०२३ अन्वये तरतूद विहित करण्यात आलेली आहे. यास्तव केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीकरिता सेवाजेष्ठता यादी तयार करताना सहायक शिक्षकाची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर झालेली नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे. पंरतु याअनुषंगाने जिल्हा परिषद स्तरावर कार्यवाही होत नसलेबाबत संचालनालय स्तरावर तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी याबाबत शासन निर्णय दि.२७/९/२०२३ मधील तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.
( शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्राथमिक शिक्षण संचालनालय
महाराष्ट्र राज्य पुणे प्रत माहितीस्तव सविनय सादर-मा. कक्ष अधिकारी (टीएनटी-१), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments