गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते - सन २०२५ वित्त विभाग शासन निर्णय.

 राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते.... दि.०१ जानेवारी, २०२५ ते दि.३१ डिसेंबर, २०२५ या कालावधीकरिता महाराष्ट्र शासन वित्त विभाग, दिनांक : ३१ जानेवारी, २०२५.


प्रस्तावना :-

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत दिनांक १ जानेवारी, २०२४ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२४ या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता संदर्भाधीन क्र.६ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आला होता. त्याप्रमाणेच राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत माहे जानेवारी, २०२५ ते माहे डिसेंबर, २०२५ या वर्षामध्ये सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठीचा परिगणतीय तक्ता निर्गमित करणे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय :-

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत दिनांक १ जानेवारी, २०२५ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ या कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांस बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणतीय तक्ता सोबत जोडला आहे. सदर तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिटकरिता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात यावी.

२. मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांनी दिनांक १ जानेवारी, २०२५ पासून राजीनामा, सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना/कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करावी.

३. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ च्या परिच्छेद ८.४ अन्वये बचत निधीमधील शिल्लक रकमांवर दरसाल विहित दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज देण्याबाबत तरतूद आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या बचत निधीमधील संचित रकमांवर दि.०१ जानेवारी, २०२५ पासून दर साल दर शेकडा ७.१ टक्के दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज आकारण्यात आले आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा ४ टक्के दरात कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी.

४. सोबतचा परिगणितीय तक्ता संचालक, लेखा व कोषागारे संचालनालयाचे पत्र क्र.संलेको/गवियो/२०२५/परिगणतीय तक्ते/१०/०७/३०९ दिनांक २० जानेवारी, २०२५ अन्वये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या परिगणनेनुसार निर्गमित केला आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०१३१११०९०७२७०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(वि. रं. दहिफळे)

 सह सचिव, महाराष्ट्र शासन


संपूर्ण शासन आदेश परिशिष्टांसह पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 21 जून 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते - सन २०२४ बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


शासन निर्णयः-

संदर्भाधीन क्रमांक ४ येथील शासन निर्णयानुसार १ जानेवारी, २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्याचे तक्ते निर्गमित करण्यात आले होते.


२. संदर्भाधीन अनुक्रमांक ५ येथील शासन निर्णयान्वये वित्त विभागाने राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ अंतर्गत दिनांक १ जानेवारी, २०२४ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२४ या कालावधीत गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाचे परिगणितीय तक्ते निर्गमित केलेले आहेत. त्यास अनुसरुन सन २०२४ या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या / आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाचे परिगणितीय तक्ते निर्गमित करणे आवश्यक आहे. त्यानुसार यासोबत जोडलेल्या परिगणितीय तक्त्यानुसार २०२४ या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या/आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना या परिगणितीय तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे, प्रति युनिटकरीता बचत निधीचे संचित रकमेचे लाभ प्रदान करण्यात यावेत.


३. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक १ जानेवारी, २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ या कालावधीत राजीनामा/सेवानिवृत्त/सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर अन्य काही कारणाने ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येईल त्या कर्मचाऱ्यांना / त्यांच्या वारसांना या सोबतच्या परिगणितीय तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.


४. शासन पुढे असेही आदेश देत आहे की, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या गट विमा योजनेतील तरतुदीनुसार बचत निधीमधील रकमेवर दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून दरसाल दरशेकडा ७.१ टक्के दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज आकारण्यात आले आहे. जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना-१९९० च्या विमा निधीमधील संचित रक्कमांवर दरसाल दर शेकडा ४ टक्के या दरात कोणताही बदल झाला नसल्याने याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी.


५. हा शासन निर्णय महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या २४८ व्या परंतुकानुसार तसेच शासनाला समर्थन करणाऱ्या अन्य अधिकाराचा वापर करुन सोबतचा परिगणितीय तक्ता सहायक संचालक (गवियो), लेखा व कोषागारे, मुंबई यांचे चे पत्र क्र. गवियो/२०२४/ जि.प.क.ग.वि.यो./परिगणितीय तक्ते /सन २०२४/२८/१९/१०७२, दि.२८ फेब्रुवारी, २०२४ अन्वये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या परिगणनेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.


६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०६२११६०४५४२१२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(अजय क. पवार)


अवर सचिव, महाराष्ट्र शासन



संपूर्ण शासन आदेश परिशिष्टांसह पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.