Cashless Medical Facility for Teachers Update - शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जून २०२४ पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत.

राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जून २०२४ पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत  शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 11 जून 2024 रोजी शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


संदर्भ:-

१) बैठक-२०२२/प्र.क्र.२१/२२/टिएनटी-५

२) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे निवेदन दि.३०.५.२०२४ चे पत्र.


उपरोक्त विषयासंदर्भात अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे निवेदन प्राप्त झालेले आहे. निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे.


सदर निवेदनानुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त १००% अनुदानित व अंशतः अनुदानित / प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक / तांत्रिक / अध्यापक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विभागनिहाय, जिल्हानिहाय व वर्गवारीनिहाय संख्या व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय प्रतिपूर्तीकरिता होणाऱ्या खर्चाची मागील पाच वर्षाची वर्षनिहाय माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्रात कृपया आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह तात्काळ सादर करावी, ही विनंती.


आपली,

(डॉ. स्मिता देसाई)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन



वरील परिपत्रकानुसार कॅश पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यात आलेली नसून फक्त त्यासंदर्भात किती खर्च येईल याबाबत माहिती मागविण्यात आली आहे.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.