Barti JEE NEET Entrance Exam 2024 - महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या पात्र उमेदवारांसाठी जेईई (JEE) नीट (NEET) प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज लिंक संपूर्ण माहिती

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे  संस्थेने दिनांक 14 जून 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या पात्र उमेदवारांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज बाबत संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी JEE-१०० व NEET-१०० जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.


पात्रता:-

१. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

२. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.

३. उमेदवार शैक्षणिक वर्ष सन २०२४-२०२५ मध्ये इयत्ता ११ वी (विज्ञान) चे शिक्षण घेत असावा.

४. रु. ८ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असेल.

५. अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक.

६. उमेदवार दिव्यांग असल्यास ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी.


आरक्षण :-

• महिला ३०%, दिव्यांग (PWD) ५%, अनाथ-१%, वंचित-५% (वाल्मिकी व तत्सम जाती-होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी, इ. साठी), जागा आरक्षित असतील.


विद्यार्थी निवडीचे निकष :-

• प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तानिहाय उमेदवारांची निवड केली जाईल.

प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती :-

१. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३०/०६/२०२४

२ ३. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान ७५ टक्के पेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थित राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा

. प्रशिक्षण कालावधी २४ महिन्यांचा राहील.

रु.६०००/- एवढे विद्यावेतन अदा करण्यात येईल.

४. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरीता प्रती विद्यार्थी रु.५०००/- एवढी एकरकमी रक्कम अदा करण्यात येईल.

५. सदर योजनेबाबत / प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकार मा. महासंचालक, बार्टी व शासनास राहतील.

* इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. १३/०६/२०२४ पासून https://jee-neet.barti.co.in/public/ या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करावी.



सूचना

दिनांक:-१४/०६/२०२४

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी JEE-१०० व NEET-१०० जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. याबाबतची जाहिरात बार्टी संकेतस्थळावर दिनांक १३ जून २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी लिक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर लिंक मध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करताना प्रशिक्षणाचे ठिकाण तसेच प्रशिक्षण केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण ठिकाण, प्रशिक्षण केंद्राचे नाव व प्रशिक्षण केंद्र पत्ता खालीलप्रमाणे


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.