U-DISE+ सन २०२३-२४ Student Portal मधील विद्यार्थ्यांची माहिती दुरुस्त करणेबाबत MPSP ने दिनांक 15 मे 2019 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
दि.१५/०५/२०२४ रोजीच्या U-DISE+ प्रणालीमधील अहवालानुसार Student Portal मध्ये काही विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे जन्मदिनांक अचूक नोंदविलेली नाही व काही विद्यार्थ्यांचे लिंग अचूक नोंदविलेले नाही. या दोन्ही बाबींची दुरुस्ती संबंधित शाळांकडून करुन घेणे आवश्यक आहे. तसेच Drop Box मधील विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या शाळांमध्ये नोंदविणे व विद्यार्थ्यांचे आधार Validation पूर्ण करणे महत्वाचे आहे. यासाठी U-DISE प्रणालीच्या Student Portal मध्ये माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दि. १८/०५/२०२४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी केंद्र शासनाला विद्यार्थ्यांची माहिती अचूक उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्या स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
सोबत : U-DISE प्रणालीमधील शाळानिहाय अहवाल.
(प्रदीपकुमार डॉगे, मा.प्र.से.)
राज्य पक्रल्प संचालक म.प्रा.शि.प. मुंबई
प्रत माहितीस्तव सविनय सादर :
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२) मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत कार्यवाहीस्तव :
१) शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
२) शिक्षणाधिकारी (प्राथ), जिल्हा परिषद, सर्व
३) प्रशासनाधिकारी / शिक्षणाधिकारी, महानगरपालिका, सर्व
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments