विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्या/पदस्थापनांबाबत ग्रामविकास विभागाने दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
संदर्भ :- १. निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.४३७/६/१/आयएनएसटी/ईसीआय/एफयुएनसीटी/एमसीसी/२०२४, दि.३१.०७.२०२४ २. मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य कार्यालय पत्र क्र. जीईएन- २०२४/प्र.क.०६/२४/निवडणूक, दि.०५.०८.२०२४.
महोदय,
मा. भारत निवडणूक आयोगाने उपरोक्त संदर्भ क्र. १ येथील दि.३१.०७.२०२४ रोजीच्या पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्या/पदस्थापनांबाबत सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार विभागांतर्गत निवडणूकीशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या/ पदस्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडुन तपशिल उपलब्ध करुन घेण्याबाबतच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे उपरोक्त संदर्भ क्र.२ येथील दि.०५.०८.२०२४ रोजीच्या पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत.
२. त्यानुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र विकास सेवा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी/प्रकल्प संचालक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, गट-अ व सहायक गट विकास अधिकारी, गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सोपविण्यात आलेल्या निवडणूक विषयक कामकाजाचा तपशील तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा.
३. यासंदर्भात नमूद करण्यात येते की, ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील उपरोक्त अधिकाऱ्यांपैकी काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ साठी सोपविण्यात आलेल्या निवडणूक विषयक कामकाजामध्ये काही कालावधी नंतर / वारंवार बदल केल्याचे तसेच रद्द केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विभागाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार केलेल्या बदल्यांबाबत न्यायालयीन प्रकरणांना सामोरे जावे लागले आहे. ही बाब विचारात घेवून, आपल्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी/प्रकल्प संचालक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, गट-अ व सहायक गट विकास अधिकारी, गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांना सोपविण्यात येणारे निवडणूक विषयक कामकाज कालपरत्वे बदलण्यात येणार नाही, याबाबत खातरजमा करावी, तसेच अपरिहार्य कारणास्तव संबंधित अधिकाऱ्यांच्या निवडणूक विषयक कामकाजामध्ये बदल केल्यास विभागास तातडीने अवगत करावे, ही विनंती.
(पं. खा जाधव)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ रूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दि. दिनांक : ०५ ऑगस्ट, २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदली/पदस्थापने बाबत १. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२. २. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
मा. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक ३१ जुलै, २०२४ रोजीच्या पत्रान्वये, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदली / पदस्थापनेबाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. सदर पत्राची प्रत सोबत जोडली आहे.
०२. उक्त पत्रान्वये मा. भारत निवडणूक आयोगाने पत्रातील बदल्या / पदस्थापना संबंधीच्या सूचना लागू होतील वा होणार नाहीत अशा अधिकाऱ्यांची पदनामे निश्चित केली आहेत. आपल्या विभागांतर्गत निवडणूकीशी संबंधित असलेल्या अशा सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या / पदस्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडून तपशील उपलब्ध करून घेण्यात यावा. मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि. ३१ जुलै, २०२४ रोजीच्या पत्रामध्ये नमूद केलेल्या सर्व बाबीची बदल्या / पदस्थापना करतांना विशेष दक्षता घेण्यात यावी. ०३. मा. भारत निवडणूक आयोगाला यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट, २०२४ पर्यंत अहवाल सादर करावयाचा असल्याने या सर्व बदल्या / पदस्थापनांबाबतची कार्यवाही दिनांक १६ ऑगस्ट, २०२४ पूर्वी करण्यात येऊन सदरचा अहवाल दिनांक १९ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयास सादर करण्यात यावा, तसेच त्याची एक प्रत या कार्यालयास सादर करण्यात यावी.
०४. मतदार यादींचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिनांक ०६.०८.२०२४ ते ३०.०८.२०२४ या कालावधीत पार पडणार असल्याने मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी व सदर पुनरिक्षण कार्यक्रमाशी संबंधीत अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करतांना मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि. ३१ जुलै, २०२४ रोजीच्या पत्रामध्ये नमूद केलेल्या परि. ७ चे काटेकोरपणे पालन व्हावे. ०५. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांची त्वरीत अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे, ही विनंती.
आपला
(एस. चोक्कलिंगम)
प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य
प्रत.
सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,
वरील आदेशानुसार जर बदल्यात करायच्या झाल्यास त्या दिनांक 16 ऑगस्ट 2024 पूर्वी कराव्या लागतील.
त्यानंतर बदल्या करता येणार नाही
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 17 मे 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :
१) शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/ टिएनटी-१, दि.२१.६.२०२३
२) शासनाचे समक्रमांकित दि.११.३.२०२४ रोजीचे पत्र.
३) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/पदभरती/२०२४/२७७०, दि.१९.४.२०२४ रोजीचे पत्र.
महोदय,
उपरोक्त संदर्भ क्र. १ येथील शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय तसेच संदर्भ क्र. २ व ३ येथील पत्रे कृपया पहावीत.
२. उपरोक्त नमूद संदर्भीय शासन निर्णय व पत्रांनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
आपला,
(नितीन पवार)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
सोबत :- संदर्भीय शासन निर्णय व पत्रे.
प्रत :- १) उप सचिव (टिएनटी-१), शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई. २) निवडनस्ती.
दिनांक आठ मार्च 2024 रोजी चे परिपत्रक
दिनांक 21 जून 2023 रोजी चा शासन निर्णय पाहण्यासाठी👇
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments