पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया सन 2023-24 मध्ये निवड झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गैरप्रकारातील समाविष्ट उमेदवारांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे बाबत परीक्षा परिषदेचे परिपत्रक

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या आयुक्तांनी दिनांक 17 मे 2024 रोजी पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांना उद्देशून निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया सन 2023-24 मध्ये निवड झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गैरप्रकारातील समाविष्ट उमेदवारांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे बाबत पुढील प्रमाणे विनंती केली आहे. 


शिक्षक पात्रता परीक्षा सन 2019 व सन 2018 मधील गैरप्रकाराबाबत सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर, पुणे या ठिकाणी अनुक्रमे गु.र.नं. 56/2021 व 58/2021 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2019 मधील गैरप्रकारामध्ये 7874 परीक्षार्थी व शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2018 मधील गैरप्रकारामध्ये 1663 परीक्षार्थी असे एकूण 9537 परीक्षार्थी समाविष्ट असून संबंधितांची दि.3/8/2022 व 14/10/2022 रोजीच्या या कार्यालयाच्या आदेशान्वये गैरप्रकारातील परीक्षार्थीची सदर परीक्षेतील संपादनूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले आहे. परंतु सदरचे परीक्षार्थी पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियामध्ये मा. न्यायालयाच्या आदेशान्वये स्व-प्रमाणपत्र भरून समाविष्ट होऊन, त्यापैकी काही उमेदवारांची सदर भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक म्हणून निवड झाली आहे.


उपरोक्त संदर्भीय पत्र क्र.2 अन्वये गैरमार्ग अवलंबिणाऱ्या संबंधित उमेदवारांवर गुन्हे नोंदविणेबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत आणि याबाबत सायबर गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्याशी पत्रव्यवहार देखील केलेला/सुरू आहे. या अनुषंगाने या कार्यालयाने संदर्भीय पत्र क्र.3 अन्वये दाखल गुन्ह्यामधील चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना चारित्र्य पडताळणीचा अहवाल देण्यात येऊ नये असे कळविलेले आहे. तथापि चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा पोलिसांचा असून त्यास अनुसरून पुढीलप्रमाणे खुलासा करण्यात येत आहे :-


TET गैरप्रकारातील एकूण 9537 उमेदवारांची यादी आपणाकडूनच प्राप्त झालेली असून राज्यातील सर्व पोलीस स्टेशनला जिल्हा कार्यालयामार्फत आपण उपलब्ध करून द्यावी आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) गैर प्रकारामध्ये दाखल गुन्ह्यामधील (गु.र.नं. 56/2021 व 58/2021) समाविष्ट असलेल्या उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी साठीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर, संबंधित उमेदवाराची वस्तुस्थिती पाहून नियमानुसार आपल्या स्तरावर चारित्र्य पडताळणीची कार्यवाही करावी अशी आपणास विनंती करण्यात येत आहे.


आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.


संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.