महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिनांक 30 मे 2024 रोजी सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय मंडळे, यांना दहावीच्या पुरवणी परीक्षा व श्रेणी सुधार परीक्षा ऑनलाईन अर्ज करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२४ परीक्षेचा निकाल दिनांक २७/०५/२०२४ रोजी ऑनलाईन जाहीर झालेला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, III विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit नेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने इयत्ता १०वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.
झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ट न झालेले), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे. ।।। विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन अर्ज भरण तारखा.
नियमित
पध्दतीने भरावयाच्या तारखा शुकवार दिनांक ३१/०५/२०२४ ते
मंगळवार, दिनांक ११/०६/२०२४
विलंब
बुधवार, दिनांक १२/०६/२०२४ ते सोमवार, दिनांक १७/०६/२०२४
माध्यमिक शाळानी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा
शनिवार, दि. ०१/०६/२०२४ ते बुधवार, दि. १९/०६/२०२४
नियमित शुल्क
माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख
शुक्रवार, दि.२१/०६/२०२४
सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये होणान्या परीक्षेची आवेदप्रत्रे त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फतच भरावीत. सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी विभारात घेणे आवश्यक आहे- १ ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना मार्च २०२४ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल.
२ उपरोक्त परीक्षेस प्रथमतः प्रविष्ट झालेल्या व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या मार्च २०२४ परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२४ व मार्च २०२५ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी.
३ पुणे, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी निर्धारित शुल्क बैंक ऑफ इंडियाच्या (Bank Of India) Virtual Account द्वारे मंडळाच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे जमा कराव्यात. मुंबई, नागपूर व लातूर विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी निर्धारित शुल्क एच डी.एफ.सी. (HDFC ४ Bank) बँकेत Virtual Account द्वारे मंडळाच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे जमा कराव्यात.
. अमरावती, नाशिक व कोकण विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी निर्धारित शुल्क अॅक्सिस (Axis Bank) ५ बँकेत Virtual Account द्वारे मंडळाच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे जमा कराव्यात.
६ नियमित व विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेच भरण्यात यावे.
७ परीक्षा शुल्क NEFT/RTGS द्वारे भरणा केल्यानंतर सदर शुल्क पुनःश्च शाळेच्या खात्यावर जमा झालेले नाही व ते मडळाच्या खात्यावर वर्ग/जमा झालेले आहे, याची खात्री करावी.
८ आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखामध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.
(अनुराधा ओक) सचिव,
राज्य मंडळ, पुणे-४
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments